लाॕकडाऊन डायरी प्रकरण 2
भाग 6 ते 10
क्रमशः भाग 6
आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन !! आज पुन्हा मनिष म्हणतोय आई काहीही असो तेव्हा जरा झाली चिडचीड पण बार्शीला आलो ते फार बरं झालं बाबा ! आकांक्षा व कीर्तीला पण असच वाटतय . इकडे आल्यामुळे खुप काही साध्य झालं असे वाटतेय सगळ्यांना . थोडासा इकडचा उन्हाळा त्रासदायक आहे .विशेषतः कीर्तीला हे नविन आहे. पाणीप्रश्न आणि उन्हाळा ! सरबत ,थंड कलिंगडं , द्राक्ष याचा मारा व कुलर एवढाच एक उपाय करु शकतो .यांचे बार्शीला इतके रहाणे पडेल असे कधी वाटलेच नाही. नाहीतर एसी बसवून घेतला असता. खरा उपयोग पुण्यात होणार आसे वाटले होते . आता सध्यातरी दुकाने बंदच त्यामुळे काहीच करता येत नाही आसो.सध्या परिस्थितीत जे आहे ते खुप चांगले आहे आसुदेत असे म्हणतात मुले. आता माझी रोज सकाळी 8 ची बँक ! आता पुन्हा रुटीन चेंज केलं . रात्रीच कट्टा पुसून सगळी सकाळची जय्यत तयारी कट्ट्यावर व फ्रीजमध्ये करुन ठेवायची . हे पण आशिष-कीर्तीला आतिशय उपयोगी पडणारे प्रात्यक्षिकच होतं . कारण काकू नसतील तर त्यांना हेच करावे लागणार . त्यामुळे अच्छा असं केल तर होतय की असा त्यांचा संवाद होतोय . सकाळचा चहा 5 जणांचा नाष्टा , भात-आमटी , भाजी व 2 पोळ्या एवढं सगळं 7.30 ला तयार असावं लागतेय . मग राहिलेल्या पोळ्यात आकांक्षाची मदत आसं काहीसे होतेय .तेही 1/2 दिवसात छान बसले रुटीन . मी बँकेत जायला निघते तर लोक दारात ब्रश करायला उभे राहिलेले दिसतात. असो. मला घरी जायला दुपारचे 2.30 वाजतात. त्यानिमीत्ताने रोज एक वेगळी जबाबदारी तिच्यावर सोपवायचं काम चालू आहे. पालेभाजी तिला आवडत, नाही पण करेल तेव्हा मी खाणार आसं तिने सांगून ठेवलय त्यामुळे कोणालाही काहीच न विचारता शक्य असेल ते करणे चालू आहे त्यामुळे कोणालातरी नआवडणारा तोच दुस-याला खूप आवडणारा पदार्थ होतो . चला त्यातही मजा आहे . मनाला मुरड घालणे हे फक्त सगळे एकत्र असतील तरच शक्य होतं .एरव्ही आपण स्वतःच्या आवडीचच करतोच की ! मला पुर्वीचा जमाना आठवायला लागला . मी आत्त्याकडे शिकायला होते त्या सांगायच्या आम्ही सात जावा होतो.अबब!! खुप काही सांगायच्या त्या . लहानपणी सुद्धा घेरडीत सुट्टीत आतेमामे भावंड येणं आम्ही मामाकडे सुट्टीला जाणं असायचं.मामा पण यायचा आक्की , तायडी सहकुटुंब यायच्या आंब्याचा रस पोळ्या , भजी, हुरड्याच्या घुग-या , पापड कुरडया . आईच्या हातचं रोज काहीतरी नविन चटकदार जेवण. काका , फक्कड काका, मोहन आण्णा , पंत काका सगळ्यांनी आंबे डालींनी घेणं आणि त्याची आढी घालणं . सगळ्यांना एकत्र जमा करायचा आट्टाहास काकांचा असायचा आई पण खुश असायची पण कष्ट खूप पडायचे तिला . सगळे आले न रस भजी असली की मोठी पोळ्यांची चवड लागायची. दमायला व्हायचं तिला . सगळ्या मुलींनी करायचं असा काकांचा शिरस्ता असायचा पण कमीजास्त आहे नाही पहाणं जबाबदारी तिच्यावर असायची. पुन्हा आक्की वारली . मग मायडीचं लग्न झालं ती पण सहकुटुंब आंब्याच्या दिवसात असायची स्वतःच्या 5 मुली 6 नाती 1 नातू आणि इतर पाहुणे वेगळेच 5 खणी स्वयंपाक घर 4 खणी सोपा आंगण समोर एकावर एक दोन खोल्या एवढं घर आणि खुप सारी माणसं असायची . रात्री लाईट नसणं वाड्यातल्या सगळ्यांनी महादेवाला जाऊन आलं की आंगणात संध्याकाळी 7 वाजताच आपाआपली जागा पकडून ठेवणं. आम्ही लहान होतो तेव्हातर गुलाब आण्णा किंवा मावशींनी गोष्टी सांगायच्या . आम्ही सगळ्यांनी त्यांच्याभोवती घोळका करुन बसयचं हा नित्यनेम होता . आजकालच्या मुलांना वाडासांस्कृती अनुभवायला नाही मिळत पण या करोनामुळे कुटुंबाला तरी एकत्र रहायला आलं. या बंदमुळे खुप नुकसान होणार असं म्हणतात पण विचार केला तर हेही नक्की आहे की आपण ठरवुनसुद्धा आशा प्रकारे जिवन जगणे केवळ कल्पनातीत राहिलं असतं . पैसा मिळवायला उभ आयुष्य आहे . सध्या जे अमुल्य क्षण उपभोगता येतात ते का घालवावे . मनमुराद आनंद लुटावा त्याचा !!
क्रमशः भाग 7
आज बँकेतुन दुपारी घरी गेले. आंघोळ झाली . मला कीर्ती समोर दिसली नाही म्हणून मी रुममध्ये डोकावलं . तर ती काम करत होती म्हणलं असेल थोडफार जास्तीच काम . पण चेहरा पण छोटासा वाटला तिचा. तब्बेत बरी नसावी असं वाटलं . मी तिथेच थांबले तर मनिषने सांगितले तिच्या मानलेल्या आजोबांचे म्हणजे भाऊकाकांच आज दुपारी पुण्यात निधन झाले आहे . आणि लॉकडाऊनमुळे कोणालाच जाता येणार नव्हते . थोडफार तिच्याशी बोलले . मग मीपण आराम करायला गेले.
हल्ली आम्ही ब-याचदा कामं करतकरत मिरज घेरडी परांडा अशा खूप गप्पा मारल्यात. ह्याच आजोबांविषयी ती भरपूर सांगत होती मला
भाऊकाका आसं त्यांना म्हणायचे. ते तिच्या आजोबांचे मित्र ! कीर्तीची आजी लवकरच गेल्यामुळे घरात तिचे आजोबा काका आत्या आणि बाबा होते. भाऊकाकांनी लग्न केलेलं नव्हते. ब्रम्हचारी होते ते मग मित्राला मदत करण्यासाठी ते यांच्याकडे रहायला आले. सर्वांत लहान कीर्तीचे बाबा होते आई नसल्यामुळे त्यांना भाऊकाकांचा खुप लळा लागला . आत्या व काकांचे लग्न झाले . दोघे मित्र सगळं करायचे पुढे बाबांच लग्न झाल्यावर आजोबा, भाऊकाका वआईबाबा एकत्र रहायचे . कीर्तीने जन्मापासूनच घरात दोन आजोबांना पाहिलय अनुभवलय . तिचे आजोबा गेले तरी यांनी भाऊकाकांना जाऊ दिलं नाही. केतकीला तर फक्त भाऊकाका हे एकच आजोबा म्हणून आठवतात. त्यांची शिस्त खूप होती . माया प्रेम पण तितकच दिलं . एवढेच नाही तर भांडणं , रुसणं पण व्हायचं घरात इतके ते घरचे सदस्य झाले होते. आलीकडे मुली मोठया झाल्यावर जवळच ते स्वतंत्र राहू लागले . पण रोजचं जाणयेण असायचं . लहानपणी आईची सकाळची कामं होईपर्यत या दोन्ही मुलींना घेऊन देवळं फिरुन व्हायची त्यांची . रात्री 8 वाजले की शिस्तबद्ध गादी, मच्छरदाणी लावुन द्यायची मग हीने झोपायचे. त्यामुळे मला लवकर झोपायची सवय आहे आसे कीर्ती म्हणते. असे अनेक लाड त्यांच्याकडून करुन घेतलेल्या आठवणी तिने परवाच सांगितल्या . यांच्या एका कुटुंबालाच नव्हे तर आत्या , काका आणि बाबांच्या पुर्ण मित्रपरिवारात ते सर्वांना आपलेसे वाटायचे. सर्वसमावेशक आसा त्यांचा स्वभाव होता. संपुर्ण आयुष्य त्यांचे मिरज सांगलीत गेल. आता 90 च्या पुढे वय गेलय, लकवा झाला. त्यांना एकटे ठेवायला नको म्हणून परवाच दीड महिन्यापुर्वी त्यांच्या भावाने त्यांना पुण्यात हलवलं . त्यांना अजिबात पुणे नकोस वाटतं असं ते सांगू लागले आणि लगेचच करोनाचं संकट आलं होतं . त्यामुळे कोणालाही काहीच करता येईना. हे सगळं ऐकून मला पण खूप कुतुहल वाटलं. अशाप्रकारे नात्यांची जपणूक विरळच ! क्वचितच असं पहायला मिळत . आणि तेच आजोबा गेल्याचं दुपारी समजलं होतं . झालं ते त्यांच्या दृष्टीने चांगले झालेय शरीर यातना नाही झाल्या त्यामुळे त्यांच सोनं झालं पण उगाचच 1/2 महिन्यासाठी ते पुण्यात गेले असं वाटतय सगळ्यांना . विशेष म्हणजे लग्नानंतर आशिष-किर्ती त्यांना भेटून पण आले. आशिषला ते बोलले सुद्धा होते !
आशिष हळुच सांगून गेला आई ती खूप रडली . हे पण म्हणाले ती अस्वस्थ आहे बोललीस का तू ? अजून नाही पण बोलते म्हणलं .मी उठून 4 वाजता सरबत प्यायला कीर्तीला बोलावले . तशी जरा गप्पच होती ती मग मीच तिला थोडेसे बोलत केलं .झालं हे ठीक आहे त्यांना क्लेश झाल्यापेक्षा ठीक आहे. वय पण खूप झालेय पण या परिस्थितीत असं व्हायला नको होतं. कोणीच जाऊ शकत नाही याची रुखरुख लागलीय तिला.हेच बाबांनी खूप मनाला लावून घेतलं असणार म्हणून तिला बाबांची काळजी वाटत होती . बाबा घडघड बोलत पण नाहीत पण खूप हळवे आहेत म्हणाली. थोड्या वेळाने फोन कर आईबाबांना मग तुला पण बरं वाटेल म्हणलं . तिचा फोन झाला आईंशी मी पण बोलले आमचं पण चहापाणी झालं . मग थोडी नॉर्मल वाटली ती . अशा घटनांचा विसर पडायला , पचनी पडायला काळ हेच औषध असते!
रात्री मग रोजच्याप्रमाणे झालं वातावरण . आज आकांक्षाने मी भाकरी करणार हे जाहिर केलं . ती पण भाकरी पहिल्यांदा करणार होती. झालं मग प्रयोग सुरु झाले आणि वातावरण निवळलं . हशा पिकला . बरं झालं आसं मला वाटलं .
क्रमशः भाग 8
आज तिसरा शनिवार त्यामुळे मला बँक तर आकांक्षाला क्लास होता. 2 दिवस सुट्टी देऊन पुन्हा क्लास सुरु झाल्यामुळे तीला थोडा लोड होता .
आशिष-किर्तीला सुट्टी . त्यामुळे माझ्या एकटीपुरतं नाष्ट्याला थालीपीठ करुन घेतलं बाकी काय करायचं ते कट्ट्यावर ठेवलं . कसं करायचं याच्या टीप्स दिल्या आहेत. सगळेजण मिळून करणार पण चार्ज कीर्तीकडे असणार .ह्यांचा शनिवार आहे त्यामुळे ह्यांना वेफर्स व तिघांचा नाष्टा आणि 5 जणांचा स्वयंपाक आकांक्षा व कीर्ती दोघी मिळून या दोघांना मदतीला घेऊन करणार आहेत . नाष्ट्याला घावन मिक्सींग करुन ठेवलय ते आज मनिष करणार आहे . तर जेवायला पोळी, आख्ख्या मसूरची भाजी, भात , गाजराची कोशिंबीर असा बेत आहे .
कालपासून कीर्तीच्या आजोबांचा विषय डोक्यात घोळत होता.मी विचारमग्न होत गेले की रक्ताच्या नात्याइतकीच किंबहुना काहीवेळा जास्तच जोडलेली नाती ही खूप घट्ट असतात का? काही कारणांनी भेट झाली नाही तरी अंतरीक ओढ किंवा जोडलेला धागा असतो तो हृदयाची तार छेडायची भूमिका करत असतो. 30 वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने बार्शी व मुलांसाठी म्हणून आमच्या आयुष्यात देशपांडे वाडा व कृष्णा आज्जी अविस्मरणीय आहेत. पुर्वी मँटर्नीटी लीव्ह 3 महिने असायची. मनिषचा जन्म झाला आडीच महिने मजेत गेले . बालपण , बारसं, कोडकौतुक घेरडी आणि परांडा ! आता जॉईन व्हायला फक्त 8 दिवस बाकी आसतांना रुटीन बसवायला बार्शीला आम्ही तिघे आलो . काहीही ठरवलेले नव्हतं , फारसं कळत पण नव्हतं . देशपांडे वाड्यात भाड्याने रहायचो. वाड्यात वातावरण घेरडीसारखं होत . घरमालकांना मुलबाळ नव्हते त्या एकूण 6 जणी जावा व 3 नणंदा असा मोठ्ठा परिवार होता . सगळेजण त्यांना बाबा-मम्मी म्हणायचे . नविनच लग्न होऊन आल्यामुळे त्यांनी आम्हांलापण त्यांच्या बहिणभावाच्या मुलांप्रमाणे मानलं . मगआमचेपण ते मम्मी बाबा झाले. मम्मींची एक जाऊ म्हणजे वर्षा काकू ! मग त्यांच कुटुंब तात्या, प्रसन्न आणि गौरी.मम्मी व वर्षा काकू ह्यांच्याबरोबर आमचा खूप स्नेह जडला होता. त्यामुळे बाळाला घेऊन परत आले की ही दोन कुटुंब आणि बाकीच्या जावा त्यांची मुलं , सागडे ताई , दिवटे काकू , सिंधूताई असे शेजारी सगळे जणू आदल्या जन्मीचे सोयरेच ! मग मी त्यांना बाळाला सांभाळायला बाई बघायला सांगितले . शोधत शोधत 8 दिवस नीघून गेले मम्मी म्हणाल्या आपण बाई पाहू ती मिळेपर्यंत तू माझ्याकडे मनिषला सोडून जा. 3 महिन्याच आतिशय खेळकर बाळसेदार गुटगुटीत बाळ घरी ठेवून ड्युटी सुरु झाली. मम्मी याला दिवसभर सांभाळायच्या वर्षा काकूंनी पण तितक्याच प्रेमाने अगदी वेळ काढून यायचं. सागडे ताईंनी त्याला फिरवून आणायचं आणि खेळवायला गौरी प्रसन्ना बाकी मुलं आसायची. जगमीत्र आहे तुझं बाळ असं म्हणायचे सगळे. मधल्या सुट्टीत मी घरी येऊन जायचे. बाई पहाण्यात 8 दिवस गेले माझ्या आधी मम्मी व वर्षा काकूंनाच बाई मनास येत नव्हती . काय कराव मोठ्ठा प्रश्न होता. रविवारी बोलत बसल्यावर मम्मीनी जाहिर करुन टाकलं एवढं छान बाळ कोणाच्याही हातात द्यायला मन धजत नाही . आणि आताच्या 8 दिवसाच्या अनुभवावरुन मी त्याला सांभाळू शकते असा मला विश्वास आहे . वर्षा आहे मदतीला कधी आम्ही दोघी गावाला गेलो तर प्रश्न पडेल अन्यथा तू चिंता सोड मनिष बाहेर कुठेही जाणार नाही ! आमचा आनंद गगनात मावेना. समर्थांवर सगळा भार सोपवला होता . त्यांनीच मार्ग काढला. आणि हे तीन महिन्याच बाळ मोठ्या गोतावळ्यात वाढू लागलं . तसं मम्मींच्या मोठ्या वहिनी नोकरी करत होत्या त्यांच्या तिन्ही मुलांचा सांभाव मम्मीनीच केला होता .आलिकडेच सगळे विभक्त रहायला लागले होते त्यामुळे त्यांना करमत नसे . त्या मनापासून मनिषला सांभाळू लागल्या . त्याचा गोंडसपणा वाढू लागला. 6 महिन्याच बाळ 9 महिन्याच म्हणून सांगायचं अशी सक्त ताकीद होती मम्मीची. त्याच्या बाळलीलामध्ये सगळे गुंग होते मला पण निर्धास्त वाटत होते. पुढे 3 वर्षात आमचा बंगला बांधूनआम्ही रहायला आलो. पण मनिषला रोज देशपांडे वाड्यात सोडायचं त्याचा शिशुविहारचा टांगा सुद्धा वाडा-शाळा-वाडा असा होता. रविवारी व सुट्टीदिवशी 5 वाजता त्याला वाड्यात न्यावच लागायचं इतकी सवय झाली होती. दुस-याचं बाळ रोज सांभाळणं म्हणजे तसं समाजात अवघडच की ! आणि देशपांडे कुटुंब गर्भश्रीमंत होतं . विघ्नसंतुष्टी लोक आसतातच की. तुम्ही मुलं सांभाळता का आसं विचारतात लोक असं कोणीतरी मुद्दाम विचारायचे. पण मम्मी ठाम होत्या कोणाचे सांभाळायचं असेल तर पाठवा माझ्याकडे पाहून घेईन मी म्हणायच्या. त्या खूप गुंतल्या होत्या मनिषमध्ये पण कटाक्षाने मी गुंतणार नाही असं सांगायच्या त्या . पुढेपुढे तर मम्मीपेक्षा बाबाच त्याच्यावर जीव ओवाळून टाकू लागले. 5 वर्षे हे रुटीन छान चालले आणि एक दिवस मम्मींना गाईने मारल्याचं निमित्त झालं शुगर डिटेक्ट झाली पण त्यांची औषधे चुकली त्या आजारात गुंततच गेल्या एकानंतर एक आजार उद्भवले. दरम्यान आकांक्षाचा जन्म झाला. त्यांनी आधीच सांगितलं मनीषचं करते पण आता लहान बाळाचं मला जमायचं _अवघड आहे . पुन्हा प्रश्न ! सहज वर्षा काकूंना बोलले . त्या लगेच म्हणाल्या मम्मींना शक्य नसेल तर सोड माझ्याकडे . मम्मींची तब्बेत खालावत गेली . मनिषची शाळा आता 11 ते 5 झाली रोज आकांक्षा आणि वेळ पडेल तसं मनिष दोघेपण_ वर्षाकाकूकडे . इथुन पुढे वर्षा काकूचं पर्व सुरु झालं.
क्रमशः भाग 9
मम्मीकडे मनिष 5 वर्षाचा कसा झाला समजले नाही. नंतर मात्र दिवसेंदिवस मम्मीचं आजारपण, दवाखाना वाढतच गेला त्यांच पहायला , मदतीला वर्षा काकू असायच्या तेव्हा तात्या नोकरीनिमीत्त कोकणात होते. वर्षा काकूंचा भाऊ खेड्यात होता त्यामुळे त्यांचे 2 भाचे, 1 भाची, गौरी , प्रसन्ना असे 6 जणं मिळून ते रहात होते. मम्मीचं करायचं आणि मनिषला पहायचं काम ब-यापैकी बाबा करायचे आणि कमीजास्त वर्षा काकू असं रुटीन झालं. आमचा काहीतर ऋणानुबंध असणार असे म्हणायचे सगळे . दरम्यान आकांक्षाचा जन्म झाला. ती जन्मता नाजूक होती.त्यावेळी बाळंतपणासाठी आई-काका व संजू बार्शीला येऊन राहिले होते. आम्ही वडिलांना काका म्हणायचो. प्रत्येकाच्या जिवनात आईवडिलांना विशेष महत्त्व असते नव्हे आयुष्याची , जिवनाची सुरुवाच त्यांच्या बोटाला धरुन होत असते. पण मला माझे आईवडील खूप वेगळे असल्याची नेहमी जाणीव होत रहाते. मी त्रयस्तपणे त्यांचा जिवनपट चाळत असते . मला तो छंदच जडलाय. चारचौघांसारखे ते मला कधी वाटलेच नाहीत त्यांची जिवनशैली म्हणण्यापेक्षा मानसिकता हटके होती . त्यामुळेच की काय त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या आम्ही 6 मुली म्हणजे त्यादोघांच अस्तित्व म्हणजे चमकदार हि-याच कोंदण आणि आम्ही मुली म्हणजे कोंदणाभोवती मोत्याची कुडी होतो. दुर्दैवाने एक मोती निखळला . काळाप्रमाणे कोंदण लुप्त झालंय पण त्याची किरणे मात्र मोत्यावर चमकतात त्या आम्ही पंचकन्या . हे कोंदण त्यांचे जिवन त्यांनी घालून दिलेले आदर्श मला विस्तृत स्वरुपात जगासमोर आणायचं आहेत .स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय ? याचा कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कृतीतून तो ते कसे जगले व कसे घडविले हा एक आजच्या काळात चिंतन करण्याचा भागा आहे . पाहू कसा योग येतो ते समर्थांनी बळ दिलं की सारं काही साध्य होतं . आसो.
तशी मी रजा आधीच घेतली होती पण 1 महिन्यांनी आकांक्षाचा जन्म झाला. खूप नाजूक पण खणखणीत आवाज विशेष म्हणजे 5 व्या दिवसापासून ती मनिष आणि पप्पांना ओळखू लागली, हसू लागली . सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आम्ही प्रयोग करुन पाहिले पण तिला खरचंच समजत होतं. काका म्हणायचे पोटातला एक महिना पकडा तिचा तिची बुद्धी एक महिन्यांनी मोठी आहे !! मजा यायची . मनिष फार खूश होता . इकडे बंगल्यात रहायला आल्यामुळे त्याला एकटं एकटं वाटायचं .मला खेळायला आली रे आसं म्हणायचा.
आकांक्षा 4 महिन्याची झाल्यावर मी जॉईन झाले. तोवर वर्षा काकूंंशी बोलणं झालं होतं. त्यांच्याकडे 8 वी ते 12 वीच्या दरम्यानचे ते 5 जण होते. त्यात दिवसभर आकांक्षा व शाळेच्या आधी नंतर सुट्टीदिवशी मनिष कधी त्यांच्याकडे कधी मम्मीकडे जायचा.असं रुटीन सुरु झालं .
क्रमशः भाग 10
आता स्वयंपाकाचं चक्र व्यवस्थित बसलं होतं . पण नेहमीची जिवनशैली व लॉकडाऊनमुळे जगत असलेली जिवनशैली यात जमिन अस्मानचा फरक जाणवत होता. माणूस यंत्रवत झालाय . मुख्य म्हणजे पैशाच्या बळावर आपल्या मनाला येईल तसं वागत आहे. पण करोनाने सगळ्यांना काही बाबतीत तरी एका समान पातळीवर आणून ठेवलंय . आपली स्वतःचीच कामं स्वतः करायला जड जाते . माणूस पैसा कमावतोय पण स्वावलंबीपणा लुप्त झालायं हे खरं ! जुन्या पिढीला थोडंस नावं ठेवत का होईना आपण आळशी झालो आहोत आसं वाटतंय . पण हे तात्कालिक असू शकते भविष्यात आपली मानसिकता पुर्वपदावर येणार नाही याची खात्री नाही . नव्हे स्वावलंबीपणाचे आत्ता गायलेले गोडवे तेव्हा टोचणार . पण करोना जिवनाची मुल्यं शिकवून मात्र नक्कीच जातोय !
आशिषला फोटोग्राफी आवडते . फक्त एवढेच आम्ही म्हणायचो . सध्या त्याचे रोज चाललेले प्रयोग पाहून मला तरी हरकायला होतं . पाणी , ग्लास,चाळणी किंवा शोभेसाठी म्हणून घेतलेला हत्ती ! तो गच्चीत नेऊन सुर्यास्त वेगवेगळ्या प्रकारे हत्तीभोवती पकडणे ! पाण्याच्या थेंबात सुर्य पकडणे . आडकित्त्यात सुर्य पकडणे आणि एक क्षण पकडण्यासाठी तासंतास गच्चीवर घालवणे .व्वा ! भन्नाट कल्पना वाटली मला ती . माणसाने कधीतरी स्वतःमध्ये पण डोकावायला वेळ दिला पाहिजे याची प्रचीती आली. काळाच्या ओघात स्वतःच्या छंदांना जोपासता आलं तर माणसात दडलेलं मूल तसंच रहातं . आता हेच पहा घरात खास सोलापूरला जाऊन हौसेनी आणलेला कँरम बोर्ड ! त्यांन घरातला कोपरा केव्हा गाठला लक्षातच नाही आलं . पण गेला महिनाभर झालं तो रोज निघतो आहे आणि या तिघांबरोबर हास्यकल्लोळात रोज एखादा तास यांचा कसा जातो समजत पण नाही . 7 वाजायची वाट पहात असतात ते . मानिष लहान असतांना त्याला शिकवत हे खेळायचे . सर्वसामान्यांप्रमाणे आमचं चौकौनी कुटुंब. मुलांचा आभ्यास घेणे . दोघांचीही नोकरी म्हणून यांनी सातत्याने मला मदत करणे . बंगला गावाबाहेर असल्याने गाडीशिवाय पर्याय नाही म्हणत 30 वर्षापूर्वी बार्शीत मला गाडी शिकण्यास प्रवृत्त करणे . पुढे शिक्षणानिमित्त मुलं बाहेर गेल्यावर माझी आवड लक्षात घेऊन मी पेटी वाजवणे, संघटनेत सक्रियपणे काम करणे सुरु केले . मी जे करते त्याला प्रोत्साहन देणे . अडथळा न आणता जमेल ती मदतच करणे . संजूसारख्या माझ्या बहिणीसाठी आतिशय मनापासून काही जबाबदाऱ्या उचलणं . तिच वागण्याची लकब परांडा कुटुंबातील प्रत्येकासाठीच आई-वडील , बहिण-भाऊ आणि त्याची कुठेही वाच्यता न करणं . ह्यांच जिवन सामान्य नव्हतं काही न काही कारणांमुळे आडथळ्यांची शर्यत झालं होतं .त्यामुळे आई-काका आणि हे या तिनही व्यक्तींच की ज्यांच्या वाट्याला चारचौघांसारखे नाही तर वेगळं जिवन आलं आणि ते जगले मी जवळून पाहिलं , अनुभवलं त्यांना माझ्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ह्यांच्यातला मला टोचणारा भाग म्हणलं तर माझ्या दृष्टीने ह्यांची आतिस्वच्छता व इतरांच जीव ओतून सगळं पहायचं पण स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष ! या दोन गोष्टी जर त्यांनी बदलल्या तर इतरांपेक्षा त्यांना स्वतःला त्याचा फायदा होईल.
पण हे मात्र नक्की की या सगळ्याचा परिणाम मुलांच्यात दिसून येतो . सुसंस्कृतपणा आपोआप त्यांच्यात उतरला आहे .तशीच कीर्तीसारखी जोड हीपण परमेश्वराचीच इच्छा आणि कृपा पण !!
No comments:
Post a Comment