24/11/2021
कु. आकांक्षास
गोड गोड आशीर्वाद
सर्वप्रथम रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा !!!
आत्ता आत्ता पायात पायात घुटमळणारी , सगळ्या घरात छोट्या छोट्या पावलांनी दुडूदुडू धावत , जिवाच्या आकांताने दाद्याबरोबर गोंधळ म्हणण्यापेक्षा अगदी धुडगूस घालणारी तक्या आज पंचवीस वर्षांची झाली यावर विश्वासच बसत नाही . अगदी पहिल्यापासून आशिष जगमित्र होता तर आई - पप्पा - दादा एवढ्याच चौकटीत रमणारी तू !
जन्मल्यावर पहिल्यांदा अगदी पाचवेच दिवशी पप्पाकडे पाहून तू हसलीस आणि आम्हाला वाटल की तू काही ते कळून हसली नसावीस , बाळाला सटवाई हसवते तस असेल ते , पण पुढे रोजच तू फक्त पप्पांकडे पाहून अगदी समजून हसायचीस आणि आम्हाला त्याचं खूप आश्चर्य वाटायचे हे कमी म्हणून की काय तीन आठवड्यांतच तू त्यांना पाहून हुंकार द्यायला लागलीस . आम्ही सगळे आवकच झालो , अस हे बाप-लेकीच जगातील सुंदर नात !! तुझा जन्म पंधरा वीस दिवस उशिरा झाला होता तर काका गमतीने म्हणायचे तिची एक महिना पोटात जास्त वाढ झाली आहे त्यामुळे तिला समज जरा जास्त आहे .
अजूनही तुझ्या वयापेक्षा जास्त समज असल्यासारखीच तू शहण्यासारखी वागतेस .
लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच गायन , नृत्य , चित्रकला , वक्तृत्व , अभिनय या सर्व कलामध्ये तू तरबेजच आहेस . स्पर्धा परीक्षा , स्कॉलरशिप आणि दरवर्षीच्या परीक्षा प्रत्येक ठिकाणची पारितोषिक पटकावत असायचीस . तुझ्या certificates आणि trophy नी तर फाईल आणि शोकेस खचाखच भरले आहेत . आम्हला ते अभिमानास्पद वाटते . हे कमी की काय म्हणून जगातील सर्वात मोठी सुगरण म्हणून मान्यता पावलेली माझी आई तिच्याकडून पाककलेच्या विद्यापीठातून तू मान्यता मिळवलीस आणि अगदी पुरण पोळी सुद्धा झकास बनवतेस . आता सध्या तर तू तुझ्या उच्च शिक्षणाच्या जोरावर मिळवलेला जॉब आणि जोडीला तुझी अभिनयाची सुप्त इच्छा जोपासण्याचे काम करतेस .
तुझ्या लहानपणीचे काही गमतीदार प्रसंग आजूनही आठवले तर हसायला येते .
काहीही मनाविरुद्ध झालं की पहिलं रडायला सुरुवात करायची आणि आम्ही रागावलो की म्हणायचीस
" मी रडत नाही माझे डोळे रडतात मी काय करू ".
पप्पा बाहेर निघाले की त्यांच्या आधी आवरून तू चप्पल घालून बाहेर जाऊन उभी राहायची त्यामुळे तुला बरोबर नेण्याशिवाय पर्याय नसे . एवढंच काय तर दादाला सोडताना पण तू बरोबर जयचीसच . थंडीच्या दिवसात सकाळी साडेसहाला दादाला ट्युशनला सोडायला पप्पाना जावं लागे . अजिबात आवाज न करता तुला चुकवून जायचा प्रयत्न असायचा पण तुला कसं समजायचं माहीत नाही ते निघण्यापूर्वी बरोबर दोन मिनिटे आधी उठून स्वेटर टोपी घालत तू पळत जावून गाडीवर बसायचीस .
कोणताही नाद इतका करायचा आणि कंटाळा आला की मला काहीच माहीत नाही असे दाखवत सोडून द्यायचा . भरतनाट्यम शिकण्याचा इतका हट्ट केला घुंगरू पूजा केली तीन परीक्षा दिल्या पण तुला क्लासचा कंटाळा आला आणि काहीतरी बहाणा करत क्लासला तू दांड्या मारायला सुरुवात केलीस आणि नंतर आम्हाला न बोलता परस्पर मैत्रिणीकडून सराना तू डान्स क्लास बंद केल्याचा निरोप पाठवलास .
एकदा घेरडीच्या आजोबांना सोडायला पप्पाबरोबर तू स्टँडवर गेली होतीस व तिथूनच आंगवरच्या कपड्यानिशी
" मला आजीकडे यायचं " म्हणत त्यांच्याबरोबर घेरडीला गेली होतीस .
सातवीत असताना दहाबारा मुलींचा ग्रुप करून तू दिल्ली ट्रीपचा प्लॅन केलेलास . शाळा सुटण्याच्या वेळी सगळ्या मुलींना न्यायला आया येऊन बसलेल्या असायच्या माझी बँक करून मी न्यायला यायचे कधीतरी माझी सगळ्यांची भेट व्हायची तर तेव्हा सगळ्यांनी सांगितलं होत तुमची आकांक्षा मुलींच्या डोक्यात काहीही भरवून देते पोरी उगाच हट्ट करत बसतात बघा .
तुझे गुण मात्र मॅडम कौतुकाने सांगायच्या त्या म्हणायच्या
" जरा आगाऊ आहे पण हुशार आहे सतत पोरींचा घोळका हिच्या मागे असतो चमकणार आहे बघा ही ".
आमच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तू स्वतः तयार केलेले ग्रीटिंग आणि तू लिहिलेल्या भावना ग्रेटच होत ते !
दाद्यावर जीवापाड प्रेम करणारी तू ! त्याचा वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने एकदा तू केलेलास
दादा म्हणजे तुझ्यासाठी जिवश्य कंठश्य त्याची अर्धांगिनी कीर्ती ! ती म्हणजे तुझ्यासाठी एक रेशीम धागाच ! तिच्या पंचविसाव्या वाढदिवसा दिवशी तू केलेलं सेलिब्रेशन अहाहा ! आणि नंतर त्यांचा साखरपुडा त्याची तयारी त्यावेळचा तू बसवलेला डान्स , आणि लग्न होईपर्यंत प्रत्येक इव्हेंट खुलवण्यासाठी मला सांगत केलेले सुरेख नियोजन व्वा !!
त्यानंतर कोरोना कालावधीत तुम्ही तिघेही बार्शीला आलात आणि आपलं आख्ख कुटुंब जवळजवळ दोन वर्ष झाली एकत्र राहते आहे . शिक्षणाच्या निमित्ताने आधी आशिष नंतर तू बाहेर पडलात आणि बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र राहिलो त्या कालावधीत अनेक प्रसंग घडले .ज्योती मावशीच्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाचे आपण केलेले ई-सेलिब्रेशन आणि त्यासाठी तू काढलेल्या वेगवेगळ्या भन्नाट कल्पना ! मजा आली
नेहमीच कोणालाही सरप्राइज देणं हा तुझा आवडीचा छंद आहे . त्यातल्या त्यात वाढदिवस हा तुझ्या आवडीचा विषय आहे . आपल्याकडे वाढदिवस करत नाहीत याचा तुला लहानपणापासूनच खूप राग यायचा पण हल्ली या आठदहा वर्षात तुझ्या मनाप्रमाणे करायचं म्हणत आपण तोही करायला सुरुवात केली .
तुझ्या आजच्या स्पेशल रौप्य महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्याची उजळणी झाली . सर्वच क्षेत्रातील हुशारी याबरोबरच अंगी असलेला सुसंस्कृतपणा यामुळे मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो .
दादा आणि तू तुमच्या दोघात एक मोठा फरक म्हणजे सगळ्या गोष्टी तो सहज घेतो त्यामुळे त्याला त्रास होत नाही पण तेही काही फार चांगले नाही . तुझं मात्र सगळ शिस्तीत ठरलेलं असतं . तू सहसा कोणामध्ये ढवळाढवळ करत नाहीस त्यामुळे तुला पण कोणी ढवळाढवळ केलेली आवडत नाही . तोही चांगलाच गुण आहे खरं . कारण मला एका गोष्टीचं इतके कौतुक वाटते की आशिषपेक्षा कीर्तीचा आग्रह होता की तू त्यांच्याजवळ राहावे , मला कीर्तीपण बोलली होती की
" आई आकांक्षा नणंद कमी आणि बेस्टफ्रेंड जास्त वाटते . ती किती समजूतदारपणाने आणि धोरणाने वागते , आम्हाला तिचा काही त्रास होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेते . उलट मदत कशी होईल हे पहाते . आणि मी खरंच नशीबवान आहे कारण अशी ज्यांची मुलगी आहे त्यांची मी सून झाले आहे . काहीही न सांगता तुम्ही दोघीपण मला कशात आनंद मिळतो हे शोधत असता आणि प्रयत्नपूर्वक तसे वागता याचा मला खूप आनंद होतो . माझ्या मैत्रिणी म्हणतात अशी माणसं आपल्या आयुष्यात येणे यासाठी नशीब लागते त्यामुळे आकांक्षाचे लग्न होईपर्यंत आकांक्षा आमच्याबरोबर राहिली पाहिजे हे पहा ".
तेव्हा माझी खात्री पटली की माणूस म्हणून तुला जस स्वातंत्र्य हवे असते तसे दुसऱ्याला मिळावे यासाठी तू दक्ष असतेस .
आणि नाही नाही म्हणत आता तू दादाजवळ राहतेस . तू माझं पण खूप मोठं काम हलकं केलं होते ते म्हणजे आजकालच्या मुलींची मानसिकता कशी असते त्याप्रमाणे मला तुझे बोलणे कीर्ती बरोबर वागताना दिशादर्शकच ठरले . तसा माझा संघटनेच्या माध्यमातून तुमच्या वयाच्या मुलींमध्ये वावर असतोच पण तुझ्यामुळे मला आणखी सोपं गेलं आणि मी छान सासू होऊ शकले की जे आजकाल दुर्मिळ होत चालले आहे . एवढंच काय पण कीर्तीची आई सुद्धा मनापासून सांगते
" आम्हाला कीर्तीची अजिबात काळजी नाही आशिष तर सोळा आणे खणखणीत नाणं आहे . त्याचा कोणताच अट्टाहास नसतो तो नेहमीच कीर्तीला म्हणतो तुला कसे बरे वाटेल तसे कर कोणीही तुझ्याकडुन अस्सच कर अशी अपेक्षा करणार नाहीत . हे सगळे आम्हाला कीर्तीकडून समजते . आकांक्षा तर मला माझी तिसरी मुलगीच वाटते मला आमच्याकडे सगळे म्हणतात सगळ्यांना सांगू नकोस कीर्तीचे कौतुक , दृष्ट लगण्यासारखी माणसे तिला मिळाली आहेत ".
तेव्हा खरच खूप चांगले वाटते . जरी जगाची रीत असली तरी वयाची पंचवीस वर्षे एका संस्कृतीत वाढलेल्या मुलीने दुसऱ्या घरात जाऊन आपले आयुष्य घडवणे ही सोपी गोष्ट नसते . त्यामुळे आज माझे परमेश्र्वराकडे एवढं एक मागणं आहे की देवा कीर्ती सारखे सुखी , समाधानी , आनंदी आणि भरभराटीचे आयुष्य आकांक्षालाही लाभो . असो शेवटी हा परमेश्वरी खेळ आहे .
आई म्हणून तुझं फक्त गुणगान करावे असे नाही . तुझ्यातला खटकणारा गुण म्हणजे लहानपणापासूनच तू सनकी , हट्टी आणि आग्रही आहेस पण हट्टीपणावर कसा ताबा मिळवायचा हे मात्र तू फार छान पद्धतीने हाताळले आहेस आणि तेही कौतुकास्पद आहे की जे तुला तुझ्या आयुष्यात सुखी कसं राहायचं यासाठी मदतच करणार आहे . आणि हे तुला खूप लहान असताना माझ्या आईने समजावून सांगितले आहे . विशेष म्हणजे याबाबतीत तू आजीचे ( माझ्या आईचे ) उपदेश मानलेस आजही ते आचरणात आणत असतेस. ते तुझ्यासाठी हिताचे आहे .
मुलं घडविण्यात आईवडिलांची मेहनत असतेच पण तुझ्या बाबतीत माझ्या आईचा खूप छान सहभाग आहे आणि तुलाही ते पावलोपावली जाणवत असते त्यामुळे आजी हा तुझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे . सकारात्मकता आणि सुगरण पणा या दोन्हींची शिदोरी तुला माझ्या आईकडूनच मिळाली हे खरे ! आपण एकटे आपले मालक नसतो . सुख असो वा कठीण प्रसंग असो आपल्याबरोबर आपल आख्ख कुटुंब त्यात आपल्याबरोबर असते हा सर्वसमावेशक विचार नेहमी डोक्यात ठेवायचा म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतात .
असो , आता तू आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहेस . तुला हा शब्दरुपी पुष्पगुच्छ देत परमेश्वराने सर्व सुखे तुझ्या झोळीत ओतावीत हीच अपेक्षा . तुझ्या भोवती असणाऱ्या माणसांचे आयुष्य नेहमीच सुगंधी होऊन जाते असाच सुगंध आयुष्यभर दरवळत राहो . नेहमीच तुझ्याकडून सत्कर्म घडो , घवघवीत यश मिळो , सुखी , समाधानी , आनंदी , आरोग्यदायी आयुष्य तुला लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
28/10/2023
चि. कार्तिक ,
अनेक शुभाशीर्वाद
सर्वप्रथम तुला रौप्यमहोत्सवी वाढदिसानिमित्त आभाळभरुन शुभेच्छा .
तुला सुखी , समाधानी , संपन्न , आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो .
तशी आत्ताआत्ताच आपली ओळख आणि मग भेट झाली पण आपली खूप जुनी ओळख असल्यासारखा भास झाला ! प्रत्येक आई वडिलांना आपले मूल सुखी समाधानी असावे असे वाटत असते . माझ्या दृष्टीने आशिष-कीर्ती ही अनुरुप जोडी आहे तसेच आकांक्षा पण आयुष्यात व्यवस्थित सेटल व्हावी असे वाटत होते . तिला अनुरुप , निर्व्यसनी , सुसंस्कृत मुलगा मिळाला पाहिजे अशा माफक अपेक्षा आहेत आमच्या .
त्या मला तुझ्यात दिसल्या असो , मला जेव्हा आकांक्षाने अत्यंत संयमाने फोनवर तुझ्याविषयी सांगितले तेव्हा तुला पाहण्याची , भेटण्याची ओढ लागली . लग्नाच्या बाबतीत एकदम निवांत असणारी मुलगी एखादा मुलगा पहा म्हणून स्वतः हून सुचवते तेव्हाच वाटलं याला तर भेटलच पाहिजे . प्रत्येक आईला जगात एक नंबर आपले मूल आहे असेच वाटत असते पण खरचच आकांक्षा तशी चौकोनी चिरा आहे . आणि सर्वगुण संपन्न असणे ही गोष्ट पण लग्न ठरवताना तारेवरची कसरत असते . ती कलाकार आहे मग त्यात सगळ्या कला आल्या अभ्यास , करियर , नृत्य , गायन , चित्रकला , वक्तृत्व , पाककला , उत्साहीपणा , सौंदर्यदृष्टी , वाचन , थोडेफार लेखन हजरजबाबीपणा , चिडकेपणा , रडकेपणा आणखीच बरच काही .....
आमचे सर्व नातेवाईक तिला
" बावन्न कशी सोन "
असे म्हणतात .
मजेने
" हिला अनुरुप नवरा कुठे शोधावा बाई "
असेही म्हणायचे .
काहीही करायचा तिने ध्यास घेतला की तो पूर्णत्वास नेणे हा तिचा स्वभाव लहानपणापासून आहे . तशी ती हट्टी पण आहे बरका .
या सर्व गुणदोषांची पारख करणारा आणि त्याला वाव देणारा , त्यासाठी साथ देणारा साथीदार , त्याचे कुटुंब असावे अशी अपेक्षा होती . कारण लग्न जरी दोघांचे झाले तरी त्यानिमित्ताने दोन कुटुंबे जोडली जातात .
मुलगा कसा असावा याचे तिचे काही निकष होते . ते गुण तुझ्यात तिला दिसले असणार म्हणूनच गोष्टी पुढे गेल्या . निवड तिच्याकडून झाली ही पण समाधानाची गोष्ट आहे . आपला अजून फारसा संपर्क आला नाही पण पाहताक्षणी आपल्या मुलीचा जोडीदार म्हणून मलापण तू आवडलास . पण त्यादरम्यान घरात बारसे ठरलेले होते त्यामुळे हलता येणार नव्हते . पुन्हा पक्षपंधरवडा , नवरात्र या गोष्टींचा विचारविनिमय दोन्ही कुटुंबांनी केला आणि आपली पहिली भेट आगदी धावपळीत झाली . तुमचे एकूणच कुटुंब , आई-बाबा , कपिल पण मला लिब्रल , कलेची जाण असणारे आणि सपोर्ट करणारे वाटले . तू पण डान्स करतोस , एकांकिकेत काम केले आहेस पण फोकस करियरवर आहे असे आकांक्षा सांगते . काळाप्रमाणे वागत गेल्यास गोष्टी सोप्या होतात . प्रत्यक्ष भेटीमुळे स्पष्टता आली पुढच्या गोष्टी ठरवणे सुलभ गेले . आता लवकरच आपली दुसरी भेट होईल तेव्हा सविस्तर बोलूच .
पुनश्च एकदा तुला वाढदिसानिमित्त भावी आयुष्यासाठी तुझ्या सर्व इच्छा , मनोकामना पूर्ण होवोत हीच श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏
💐💐🎂🎂🍫🍫🥳🥳

23/07/2024
कर्तिकच्या बाबांच्या पत्रास उत्तर
नमस्कार
लग्न झाल्यापासून लग्न सोहळा खूप छान झाला या आशयाचे अनेकजणांचे फोन आले . तुम्ही तर आगदी सविस्तर पत्रच लिहिले आहे .
प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचे कौतुक व्हावे , कशातच कमतरता राहू नये असेच वाटत असते . त्यादृष्टीने आपण दोघांनीही प्रयत्न केला . आनंद तर सगळ्यांनी लुटला पण तो भरभरुन शब्दात तुम्ही व्यक्त केलात त्यासाठी पण मन मोठं असावं लागतं .
तुम्ही पण इतक्या लोकांना घेऊन इतक्या दूरवरचा प्रवास अगदी ठरल्याप्रमाणे काटेकोर वेळेत केला . तसेच त्या 24 तासात ठरल्याप्रमाणे आपण वेळेचं बंधन पाळले त्यामुळे सगळे सुरळीत पार पडले .
नव्या सुनेला घरी नेणे , तिचे स्वागत , कौतुक करणे तसेच रिसेप्शनसाठी तर राधिका ताई खूपच उत्सुक होत्या . तेही खूप मस्त झाले , आम्हाला सुरवातीपासूनच त्यांचा
" तुम्ही सगळ्यांनी रिसेप्शनसाठी आलच पाहिजे "
हा गोड आग्रह होता त्यामुळे दुसरेच दिवशी आम्ही निघालो . पण त्यामुळे आम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी , कार्तिक-कपिल विषयी त्यांच्या हुशारीविषयी अनेकांकडून कौतुक ऐकायला मिळाले . कपिल तर बेभानपणे पण अतिशय उत्साहात काम करत होता . आदले दिवशी त्याने अरेंज केलेलं संगीतसंध्या सर्वांना आनंद देऊन गेले .
काय असेल ते आपण आपल्या मुलांसाठीच केलं . आपण एकमेकांचा आदर करतो हीच गोष्ट पुढच्या नात्याची विण घट्ट होण्यासाठी उपयोगी पडत असते . असेच प्रेम असू द्यावे , लोभ असावा तो वाढावा .
धन्यवाद
श्री. अनिल आणि सौ. सरिता कुलकर्णी
बार्शी
दिनांक 12/10/2024
सौ. आकांक्षा आणि कार्तिक
सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या सोन्यासारख्या शुभेच्छा 💐.
नवरात्री सेलिब्रेशन एकदम झकासपणे पार पडले त्याबद्दल खूप खूप खूप खूप अभिनंदन आणि मनापासून कौतुक !
सुरुवातीला कीर्तीने कौतुक केले , मधे बाबांचे बूस्ट मिळाले रोज दोन्ही कुटुंबे , नातेवाईक , आप्तेष्ट , स्नेही यांच्याकडून आतुरतेने वाट पाहणे आणि पाहायला मिळाले की होणारा कौतुकाचा वर्षाव सारे काही आनंद देणारे होते . मग म्हणलं शेवट ( सुरुवात )🥰 गोड आपण करावा .
हा उपक्रम राबवत असताना या नऊ दिवसामध्ये आकांक्षा तू एकूण 19 व्यक्तिरेखा सादर केल्यास , 19 व्यक्तीचे आवाज काढलेस आणि 21 वेशभूषा केल्यास !! फक्त अभिनय नाही तर तो करत विविध सामाजिक विषय हाताळत एक संदेश देण्याचा प्रयत्न केलास
हॅट्स ऑफ 👮
याला खांद्याला खांदा लाऊन भरभरुन साथ मिळाली ती कर्तिकची 👩❤️👨
त्याच्यासुद्धा तीन व्यक्तिरेखा , पाच ठिकाणी आवाज आणि अथक परिश्रम . दोघांनी मिळून स्क्रिप्ट लेखन , आयडिया , शूटिंग , एडिटिंग आणि एवढे करुन ते दीड मिनिटाच्या रीलमध्ये बसवायचं आणि बरोबर त्या टायमिंगला ते पोस्ट करायचं ही काही खाऊची गोष्ट नव्हती . एखादी फिल्म असते त्यात वेगवेगळे लोक वेगवेगळी कामे करतात हे सगळे दोघांनीच करायचे ( फक्त दोघे नव्हे बरं मध्येच कपिल डोकावून गेला आशिष कीर्ती तर पहिल्यापासून भक्कमपणे तुझ्या साथीला आहेत ते तुझे डावे उजवे हात आहेत आणि दोन्ही आई वडिलांचा पाठिंबा तर आहेच नव्हे दोन्ही फॅमिली ही तुमची support systym आहे.) हे खरच खूप आचंबित करणारे आहे . त्यात तुमचे बिझी असलेले शेड्युल ! लग्न होऊन अजून तीन महिने व्हायचे आहेत अजून तुमचेच रूटीन बसत आहे सगळी धावाधाव आहे त्यात हे इतक्या सुंदर पद्धतीने झालं आहे ते शब्दात सांगणे कठीण . आवड असली की सवड मिळते हे याठिकाणी सिद्ध झाले . यादरम्यान मीडियाचा पण चांगला प्रतिसाद मिळाला .
तुमची अशीच प्रगती होत राहो , मनासारख्या संधी मिळोत , यशाचे उच्च शिखर गाठता येवो हीच आज दसऱ्याच्या निमित्ताने अजून एकदा शुभेच्छा आणि श्री. स्वामी समर्थचरणी प्रार्थना 🙏🙏 ☺️☺️
सौ. सरिता कुलकर्णी
28/10/2024
चि. कार्तिक यास
सर्वप्रथम तुला वाढिवसानिमित्त आभाळभरुन शुभेच्छा
💐💐💐💐
तुला सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे आयुष्य लाभो ही श्री. स्वामी समर्थ चरणी प्रार्थना .
🙏🙏🙏🙏
लग्नानंतरचा तुझा हा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे स्पेशल तर असणारच . आपली ओळख होऊन एक वर्ष होऊन गेले . आपण अनेकदा भेटलो बरेचदा फोनवर बोलतो पण मला बऱ्याचदा पत्र लिहायला जरा जास्त आवडतं स्पेशली वाढदिसानिमित्त तर जरा जास्तच कारण आपण आपल्या भावना त्यातून छान प्रकारे मांडू शकतो दोघांतील सुसंवाद अर्थपुर्ण होऊ शकतो कारण आपण पत्र पुन्हापुन्हा वाचतो . बोलताना काही गोष्टी राहून जातात बोललेल्या विसरतात म्हणून माझा हा आवडीचा छंद आहे .
🥰🥰🥰🥰
आकांक्षा तर memorable वाढदिवस आगदी खास करत आसते . मग तो पहिला असो की पंचवीसावा असो आटापिटा चाललेला असतो तिचा . गेल्यावर्षी पंचवीसावा झाला यावर्षी पहिला ! मग कसं आहे गिफ्ट आवडलं ना ?
बरं कसं वाटते नवीन संसार करताना ?
जीवनशैली एकदम 360 मध्ये फिरते ना !
प्रायोरिटीज बदलतात वेगळेच रुटीन सुरु होते . करियर , पॅशन , पळापळी , धावपळ , कसरत , एन्जॉयमेंट या सगळ्याचा कसा क्रम लावायचा याची कसरत होते . काय करावे काय सोडावे समजत नाही . आणि म्हणूनच लग्नाविषयी अनेक गमतीशीर म्हणी आहेत .
अजून एक म्हणजे यानिमित्ताने मला एक उदाहरण द्यावेसे वाटते . ठराविक ओव्हरची मॅच असते तेव्हा सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये भक्कम धावसंख्या असेल तर विजय टप्प्यात असतो त्याची खात्री असते . आणि म्हणून सचिन तेंडुलकर नेहमीच नंबर वन राहिला . त्याच्यापेक्षा जनतेला त्याच्यावर जास्त विश्वास असायचं . तसेच जीवनाचे असते तुमचे आत्ताचे वय असे आहे की you should have to focus on your career and passion right now .
एकदा का तुमच्या मनाप्रमाणे यशाचे शिखर गाठले , अपेक्षित उंचीवर गेलं की पुढच्या गोष्टी आपोआप होतात . मग आपण त्याप्रमाणे आपल्या रुटीनचा sequence ठरवायचा . आमच्या संघटनेत नेहमीच सगळ्या मुलींना , महिलांना आवर्जून सांगितले जाते की
" तुम्ही सुपरवुमन बनण्याचा प्रयत्न करु नाकात . त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो ".
मला वाटतं हे मुलांसाठी सुद्धा लागू होते . आजकाल करिअर करणे सोपे नाही , प्रामुख्याने आयटी मध्ये आणि तेही युनिक व्हावे वाटत असेल तर तुम्हाला योगदान द्यावेच लागते . तुमचा त्याठिकाणी कस लागतो . त्यासाठी वेळ द्यावा लागतो अभ्यास करावा लगतो आणि सध्या ती तुमची प्रायोरिटी आहे . ते करत असताना काही गोष्टी नेटाने करणे ते करत असताना काही करु ना शकणे हे स्वाभाविक आहे . कुठेतरी addition करायचे असेल तर काहीतरी delet करावे लागते . फक्त addition करायचे झाल्यास hang होते हे तर माहिती आहे तुम्हाला 🤭🤭🤭असो तुम्ही दोघेही आटोकाट तो प्रयत्न करताय त्याला यश नक्कीच मिळेल . फक्त त्यासाठी तुमच्या रुटीनचा sequence आणि time management ठरवणे गरजेचे असते . मग यश आपल्या हाताशी येते .
मस्त रहा , स्वस्थ राहा तब्ब्येती महत्त्वाच्या ते सांभाळत सारं काही करा , व्यायाम करा . बाकी मस्त प्रत्यक्ष भेटीत बोलूच .
आणखी एकदा वाढिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा सर्व मनोकामना पुर्ण होवोत हीच प्रार्थना .
Enjoyyyyyy your day
👩❤️👨👩❤️👨👩❤️👨👩❤️👨👩❤️👨
13/07/2025
चि.कार्तिक आणि सौ. आकांक्षा
अ. अ. उत्तम आशीर्वाद
सर्वप्रथम तुम्हाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आभाळभरुन शुभेच्छा , उभयतांना सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे सुंदर दिर्घायुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना !
🙏🙏🙏🙏
आत्रेयला म्हणत म्हणत तुमच्या लग्नाला सुद्धा एक वर्ष कधी पुर्ण झाले समजलेच नाही . खूपच धावपळीत हे वर्ष संपले एवढे खरे !
😍😍😍😊😊😊
मग आज काय स्पेशल ठरवले आहे ? आकांक्षाला काहीतरी suprise ठरवायची सवय आहे कार्तिकही मला तसाच दिसतोय त्यामुळे तुम्ही काय केले असेल याचा मला तरी अंदाज नाही . काहीही ठरवलेले असो तुमचा आजचा दिवस स्वस्थ आणि मस्त जावो .
Enjoy your day
❤️❤️❤️❤️
इथून पुढचे आयुष्य तुम्हाला हवे तसे लाभो , ठरवलेल्या सर्व गोष्टी पुर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा !!
गेल्या वर्षी याचदिवशी तुम्ही काही स्वप्ने उराशी बाळगत एकमेकांचे झालात . आता त्याची ॲनिवर्सरी करताय . कसं वाटतं मग ? काय काय गोल ठरवले होते , काय काय कमिटमेंट होत्या , काय काय पुर्ण झाले , पाइपलाईन मध्ये काय काय आहे आणि काळाच्या ओघात विसर कशाचा पडला याचाही लेखाजोखा तुमचा तुम्ही घेतला पाहिजे . त्यात काही मिस होते का पहायला हवं आणि त्याच्यात सुधारणा व्हायला हवी .
आजच्या दिवशी मी एकच गोष्ट सांगणार आहे त्याच जमल्यास रोज स्मरण करा किंवा आठवड्यातून एकदा तरी नक्कीच स्वतःला विचारा .
माणसाच्या आयुष्यात तीन टप्पे असतात एक बालपण दुसरे तरुण आणि प्रौढ तर तिसरे म्हातारपण . पहिला टप्पा तुमच्यासाठी आपोआप पुढे सरकत जातो त्यात तुम्हाला विशेष काही करावं लागत नाही . पण आता तुम्ही मधल्या आणि महत्वाच्या टप्प्यात आहात की जो तुमचा तुम्हाला स्वतः घडवावा लागतो आम्ही पालक म्हणून आमचा supportive रोल राहतो तो आम्ही नक्की करु. पुर्वीचा जमाना वेगळा होता आता तसा नाही जीवन धकाधकीचे झाले आहे , प्रायोरिटीज बदललेल्या आहेत त्यामुळे महत्त्व तुमच्या पिढीला आलेले आहे . त्यात तुम्ही पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहता त्याप्रमाणे लाईफ स्टाईल मेन्टेन करावी लागेल .मुख्य म्हणजे आत्ता तुमच्या तरुणपणातील खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे शिक्षण झालं , नोकरी लागली , लग्न झालं म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं होत नाही तर या फक्त बेसिक गोष्टी झाल्या . खऱ्या जीवनाला आत्ता कुठे सुरुवात होते . एक आयडियल जीवन जगायचं असेल तर आता तुम्हाला काय अचिव्ह करायचं यावर फोकस केला पाहिजे यासाठी उत्तम आदर्श म्हणजे आशिष आणि किर्ती आहेत ! ते योग्य दिशेने वाटचाल करत आहेत , त्यांना आम्ही फक्त दिशा दाखवत राहिलो त्याप्रमाणे त्यांनी स्वतःवर फोकस केला आता स्मुथ चालते गाडी .
आकांक्षा तर खूपच महत्वाकांक्षी मुलगी आहे सर्वसामान्य जगणे तिला मान्य नाही त्यामुळेच तिला लहानपणापासून पोषक वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे , आणि तिला हवे ते करु देणे हा अलिखित नियम होता . मला कार्तिकपण ध्येयवादी असावा असे जाणवते , त्याच्यामध्ये मला चमक दिसते , स्पार्क दिसतो कदाचित यामुळेच तुम्ही एकत्र आला असाल . फक्त गोल ठरवून होत नाही त्याचे दृश्य परिणाम पण आता दिसायला हवेत , दोघांनी एकमेकांना पूरक वातावरण निर्माण करुन देऊन , एकमेकांची मूल्ये जपत तुमचा विकास घडवून आणायचा आहे , तुमच्याकडे असलेल्या असामान्य गुणांचा विसर पडू देऊ नकात , तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे त्याचा रोज अभ्यास केला पाहिजे , तुमचे रोजचे रुटीन सांभाळत त्याला वेळ द्या . स्पेशलायझेशन तर हवंच , तरच तुम्ही पुढे सरकता . सगळ्यां सारखे काम करत राहिलात तर फारसे हातात येत नाही कॉमन लाईफ जगावे लागते .
पाच दहा वर्षे कष्ट घ्या आणि पुढचे पन्नास वर्षे सुखी , समाधानी , आपल्याला हवे ते मिळवले या भावनेने आयुष्य जगा . अभ्यास , चिंतन , मनन फक्त विद्यार्थीदशेत करावे असे नाही तर आपल्याला समाधान मिळेपर्यंत करावे , आत्ता तर तुम्ही करावेच कारण आता तुम्ही पोटेन्शियल असलेल्या वयात आहात , आकांक्षाची बकेट लिस्ट मला माहित आहे , कार्तिकची पण असणार त्यासाठी हे सगळे आवश्यक आहे .
पण त्यासाठी आज स्वतःला नियमावलीत बांधव लागेल , प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील . काही addition तर काही deletion होत राहणार हा तर निसर्गनियम आहे . आपण सगळच नाही करु शकत त्यासाठी ideal राहिलं पाहिजे असही नाही . काहीवेळेस स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे असते तरच हे साध्य होऊ शकते . हे करत असताना तब्ब्येत पण तेवढीच महत्वाची आहे हे लक्षात ठेवा . तुमचे जीवन पण तुम्ही एन्जॉय केलंच पाहिजे . आता कसं आहे तुमच्या नोकऱ्या , जबाबदाऱ्या , रोजचे जाणेयेणे यात दिवस जातो . पण टाईम मॅनेजमेंट करायला शिका , वायफळ गोष्टीत वेळ घालवू नका , एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्या , चैतन्य द्या , आनंद द्या , आदर द्या , चर्चा करा आणि मग पाहा तुम्हाला हवं ते साध्य करता येईल . आणि आम्ही फक्त मार्गदर्शन करु शकतो प्रत्यक्ष अंमलबजावणी तुम्हाला करावी लागते .
तुम्ही ते नक्की कराल याची खात्री आहे .
लास्ट बट नॉट लिस्ट आता आपण भेटू तेव्हा मी दोघांचेही क्रॉस व्हेरिफिकेशन घेणार आहे 🤣🤣
बौद्धिक खूप झाले आता एकदम चील मारा
❤️❤️❤️❤️
पुनश्च एकदा आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा , इथून पुढील वाटचालीसाठी
All the best !
👍👍👍👍👍
😍😍😍😍😍
तुमचीच
आई
कार्तिकचे आकांक्षास पत्र
Hello Bayko,
Kashi Ahes ?
Aaj 1 Varsha zala Aplya lagnala.
Khup cheesy vatel pan kharach asa vattay barech Varsha zale Aplya lagnala.
He patra lihayla ghetla ani mhantla chala mag chya eka Varshat kay kay moments ghadlya tyachi ek ujalni karavi.
Switzerland trip,
Mangalagaur,
Gauri-Ganpati,
Navratri videos,
Apla ghar setup,
Garba night,
Diwali Stall in office,
Apla pahila extra baghitlela natak var varche vadhuvar,
Maza birthday, cake & bapreeee IPhone,
Mazi dental treatment
Pahili Diwali Akola & barshi
Lagech tuzya bday chi Tamilnadu trip
LASIK surgery
Pahili sankarant
Holi
ARAI
Barshi Shet Visit
International trip
Eye surgery
Daily Yoga & yoga day
Jar tar chi goshta etc etc
He sagla baghun asa vattay ki Apan Universal madhlya Cyclone ride peksha mothi ani bhari ride keliye. I mean really, it has been a roller coaster of emotions and a series of special moments.
Apan ekmekana bhetun ata 2 Varsha houn gele, but atta atta kuthe ekmekana actually olkhayla lagloy asa vattay.
Apan doghahi vegveglya vatavaranat vadhloy. Apla culture ani traditions jari sarkha asla tari te palaychya ani sajra karaychya paddhati jara veglya ahet.
Ya var 2 states sarkha 2 pradesh asa movie kadhayla harkat nahi.
Jokes, apart, Hyamulech, Sansaraychya hya Multi-National company madhe Aplya Fresher Jodi la suruvatila jara sagla Navin adopt karayla thoda vel lagla.
Veglya experiences cha Anubhav ala. Ekhadya vishayavar ekmekanche kay Mat ahet he kalala. Vicharsarni, approach kalale.
Ani tuza barobar ki maza barobar hya peksha barobar chukichya palikadle , Aplya doghansathi soyiskar ase Suvarna madhya kadhayla apan shiklo. Aplya doghansathi best Ase decision apan ghyayla shiklo.
Ekmekana jast samjun ghyayla shiklo.
Ani Fresher varun 1 Varshachach, pan extraordinary ani दांडगा experience aslele couple mhanun grow zalo.
Tu survatila mhanaychis, Kartik tu manat khup goshti thevtos, tuzya manat kay challay he mala kasa kalnar.
Eka arthi mala Patla te, ani mi jast tuzya samor vyakta vhayla laglo, clear bolayla laglo. Tyamule conversations ani expectations clear vhayla lagle.
Ani parallely tu, mazya manatlya goshti olkhayla shiklis. Hyacha far kautuk vatta mala.
Mala Aplyadoghanchi saglyat best goshta avadte ti mhanje doghahi firayla, adventure karayla, Navin goshti nirbhidpane try out karayla ekdum tayar asto.
Fakt kunitari karuya ka? / karaycha ka? Mhanaychi der, ani apan lagech ready.
Ani ajun ek mhanje,
jevha mi Ekta Astana maze gharche mala sangtat ki, “Bara zala, Aakanksha milali aplyala, ani tuza kautuk karat” ani tasach tu sangtes mala ki kasa tuzya ghari maza kautuk kartat, he ek family Validation milalyavar aplya Arranged Love marriage baddal bhari vatta. Ani asa vatta ki hya Genz generation madhe kharach apan ek bhari life partner choose kelay. (Aga hooo, tuza ghar maza ghar asa nahi, donhi Aplya doghanchehi ghar ahet).
Aplya building cha Paya ata majboot zalay asa mhanayla kahi harkat nai.
Bharpur individual ani couple goals planned ahet, te ekmekachya support ni achive karu ani ek ek floor majboot banvat jau.
Chala, bharpur lihila.
Btw, Thanks for coming into my life !
Ani ho rahilach, Happy First Marriage Anniversary ❤️
Shevti ek ukhana,
एक वर्षात कळालं – संसार म्हणजे teamwork,
Aakanksha बोलते आणि मी "Hmm" म्हणतो – that's how things work!
आकांक्षाची स्पेशल गाणी
1) मराठी
1) मोगरा फुलला
रचना ः संत ज्ञानेश्वर संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
स्वर ः लता मंगेशकर
ताल : केरवा राग :
मोगरा फुलला , मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियासी आला II धृ II
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी
मोगरा फुलला...... II 1 II
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बापरखुमा देवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला ......II 2 II
2) भरजरी ग पितांबर दिला फाडून
चित्रपट : श्यामची आई
गीतकार : प्र. के. अत्रे संंगीतकार :
स्वर : आशा भोसले
ताल : राग : जयजयवंती
भरजरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदिसी बंधू शोभे नारायण 2
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरीचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली 2
" शालू नि पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हांसी मी ?"
पाठची बहिण झाली वैरीण
द्रौपदीसी ........
द्रौपदी बोलली " हरिची मी कोण
परि मला त्यांने मानिली बहिण 2
काळजाची चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज 2
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदीसी .........
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खूण
धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण
प्रीती जी करती जगी लाभावीण 2
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसी .......
3) कृष्णा नाही कान्हा नाही
पारंपारिक गौळण
ताल : भजनी ठेका
कृष्णा नाही कान्हा नाही
इथं कशाला थांबायच 2
ग गौळणींनो मथुरेला जायाच 3
दही दूध घेऊनी मथुरेला जायाचं 2
दही दूध घेऊन मथुरेला जायाचं नी आनंदाने विकायचं ग गौळणींनो.....II1II
कृष्ण सख्याची पडता गाठ 2
कृष्ण सख्याची पडता गाठ
आनंदाने नाचायचं ग गौळणीनो II 2II
एका जनार्दनी कृष्ण कृपेने 2
एका जनार्दनी कृष्ण कृपेने
हरीचरणासी लागायचं ग गौळणींनो II 3 II
4 ) चांदणे चाहूल होती कोवळ्या .....
5 ) माझी रेणुका माऊली