पपा काकी आणि पंचकन्या स्पेशल
1) अनारसे
रेशनचे / जुने तांदूळ असल्यास चांगलेच .
तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून तीन दिवस भिजत ठेवावे , झाकण म्हणून दुधाची जाळी वापरावी . रोज सकाळी संध्याकाळी पाणी बदलावे .
चौथे दिवशी तांदूळ धुवून जाळीत उपसून ठेवावे पूर्ण निथळल्यावर सुती कपड्यावर पसरुन ठेवावे .
3/4 तास सुकले की गार असतानाच मिक्सरमधून काढावे . पीठ चाळून घ्यावे .
पिठाचे तीन भाग करावे एका भागा एवढा चिरलेला / किसलेला गूळ पिठात छान मिक्स करावा . त्याचे लाडू करून ठेवावे .
वातावरणाप्रमाणे पीठ बाहेर किंवा फ्रिजमध्ये ठेवावे शक्यतो बाहेर ठेवावे .
मिक्स केलेलं पीठ किमान एक दिवस मुरू द्यावे .
पीठ खूप कोरडे असल्यास दुधाचा हात लावावा आणि पीठ मळून घ्यावे .
पेढ्याऐवढे गोळे करून हाताला तेल लाऊन हातावर गोळा करावा आणि थोडंसं पुरीसारखा करावा आणि खसखशीवर थापावा बोटाला तेल लावावे .
खसखस बाजू वर ठेऊन छान गरम तेलात सोडावे आणि झाऱ्याने त्यावर तेल ढकलत राहावे मंद आचेवर अनारसा तळून जाळीत उभा करावा . अनारसा थंड झाल्यावर तेल निथळल्यावर बंद डब्यात ठेवावा .
2) गुलाबजामून
एक किलो खवा , पाव किलो मैदा चहाचा चमचा भरुन बेकिंग पावडर
सगळे छान मळून ठेवायचे .
एक किलो साखरेचा कच्चा पाक करायचा त्यात वेलची पूड घालायची .नंतर छान जामून वळायचे तेल तापवून झाले की मंद आच करून त्यात तळून गरम गरम पाकात टाकायचे
गॅस बारीक मोठा करत राहायचं . हीट लागली पाहिजे पण चॉकलेटी नाही करायचे
3) काळा मसाला
4) मेतकूट
5) चटणीपूड
साहित्य :-
हरभरा डाळ एक वाटी
उडीद डाळ एक वाटी
खोबऱ्याचा कीस एक वाटी
तीळ आर्धी वाटी
आर्धी वाटी चिंच
आर्धी वाटी गुळ
छोटी वाटी धने
अर्धी छोटी वाटी जिरे
छोटा चमचा मेथ्या , खसखस
एक वाटी कढीपत्ता
लाल तिखट / सुक्या लाल मिरच्या , मीठ
कृती :-
दोन्ही डाळी खमंग भाजून घ्याव्या , तीळ खोबरे गुलाबी होईस्तोवर भाजावे , धने , जिरे , चिंच , मेथ्या, कढीपत्ता तळून घ्यावे . ( सर्व पदार्थ तळून सुद्धा चटणी पूड करता येते पण जास्त दिवस टिकत नाही वास येतो . लगेच संपणार असल्यास तळून करावी फारच खमंग होते ).
सर्व पदार्थ गार झाल्यावर वेगवेगळे मिक्सर मधून काढून एकत्र करून पुन्हा एकदा मिक्सरवर हलकेच फिरवावे .
6) डांगर
एक वाटी उडीद डाळ , पाव वाटी चणा डाळ अर्धीपावं वाटी धने , त्याच्या निम्मे जरे आणि जिऱ्या एवढेच तांदूळ...
चवीप्रमाणे लाल सुक्या मिरच्या किंवा विकतचे लाल तिखट आणि मीठ
वरील सर्व पदार्थ वेगवेगळे खमंग भाजून घेणे . सर्व पदार्थ मिक्सर मधून रवाळ काढणे .
बारीक कांदा अन भरपूर कोथिंबीर चिरून चिंचेच्या कोळात किंवा दह्यात आर्धा तास भिजवून ठेवावे वरुन चरचरीत हिंग कडीपत्ता घालून फोडणी द्यायची . आवडत असल्यास चवीला गुळ किंवा साखर घालावी . भाकरीबरोबर खाण्यासाठी भाजीला पर्याय म्हणून हा एक उपाय आहे .
उडीद डाळीऐवजी आख्खे उडीद खमंग भाजून थोडं भरडून साल काढून वापरल्यास डांगर जास्त खमंग लागतो .
7) भरली मिरची
साधारणपणे जानेवारी ते मार्च दरम्यान या मिरच्या कराव्यात . लांब , सरळ , जाड हिरव्या ताज्या मिरच्या दोन किलो . दोन वाट्या मोहरी ,
8) डींकाचे लाडू
9) आळीवाचे लाडू
10) मेथांबा
साहित्य : - कडक आणि तयार आंबट कैरी , अर्धा किलो गूळ , एक पळी मेथ्या , दोन तोळे खडा हिंग , अंबरी लाल तिखट , मीठ , हळद , तेल , जिरे , मोहरी .
कृती : सर्वप्रथम गुळ फोडून घ्यावा गुळाच्या ढीगाच्या तिप्पट कैरीच्या चकत्या घ्याव्या . साल काढलेल्या कैरीच्या थोड्याशा जाडसर चकत्या करून घ्याव्या .
तेल तापवून त्यात मेथ्या तळून घ्याव्या गरम तेलात हिंग खडे टाकावे ते थोडेसे फुलवून घ्यावे . गार झाल्यावर आधी हिंग मिक्सर मधून रवाळ पूड करून काढावी नंतर मेथ्याची जाडसर पूड करून घ्यावी . मेथीची 1/4 पूड आणि निम्मं लाल तिखट कैरीच्या चकत्यावर टाकून ते मिक्स करून ठेवावे .
गुळात तिप्पट पाणी घालून बारीक गॅसवर हलवत राहावे . दुसऱ्या गॅसवर पातेल्यात तीन ते चार डाव तेल घालावे तेल चांगले गरम झाल्यावर मोहरी तडतडू लागली की गॅस बारीक करावा मग फोडणीत जिरे , हळद , हिंग , राहिलेले निम्मे लाल तिखट , 3/4 मेथी पूड क्रमाने घालावे आणि लगेच कैरीच्या चकत्या घालून परतत राहावे आता त्या मिश्रणावर मीठ घालावे आणि परतावे . फोडींचा रंग बदलल्यावर त्यात गुळाचे उकळते पाणी ओतावे .
गॅस मोठा करून एक उकळी येऊ द्यावी व गॅस बारीक करावा . चव पाहून आवश्यकतेनुसार तिखट मीठ गूळ घालावे . मंद आचेवर 10 मिनिट उकळू द्यावे . पाण्याला दाटपणा आल्यावर गॅस बंद करून वर जाळी टाकून ठेवावी .
दुसरे दिवशी मोठ्या तोंडाच्या काचेच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये ठेवावा . स्थिर झाल्यावर वापरण्यासाठी छोट्या बरणीत काढताना तेलाचा तवंग बाजूला सारून काढावा .
तेल वरती असेल तर सहा महिने मेथांबा टिकतो .
11) करंजी
12) खव्याच्या वड्या
13) सुरळीच्या वड्या
14) सांडगे
1 : मसाले बनवा घरच्या घरी
1) गोडा मसाला (काळा मसाला)
साहित्य :- धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम. कृती :- खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.
2) पंजाबी गरम मसाला
साहित्य :- 1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी, अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग, 5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.
कृती :- जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्सरवर पूड करून घ्या. टीप - हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.
3) कांदा लसूण मसाला
साहित्य :- 2 ते 3 कांदे, 15-20 लसूण पाकळ्या, 150 ग्रॅम धणे, 150 ग्रॅम सुक्या मिरच्या, 2 ते 3 दालचिनी, 2 हळकुंडे, 1 टी स्पून लवंगा, 10-12 तमालपत्रे, 10 मसाला वेलदोडे, 1 टी स्पून काळे मिरे, 5 टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे, 10 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम बाद्यान, 5 ग्रॅम नागकेशर, 5 टी स्पून खसखस व 100 ग्रॅम तीळ.
कृती :- वरील सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर एकत्र करून मिक्सरवर बारीक करा. (विविध प्रकारच्या रस्साभाज्या व मांसाहारी पदार्थांसाठी उपयोगी.)
4) स्पेशल गरम मसाला
साहित्य :- पाव किलो काळे मिरे, 100 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 100 ग्रॅम बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 4-5 हिरवे वेलदोडे, 2 ग्रॅम दगडफूल, अर्धे जायफळ, 2 ते 3 बाद्यान (बदामफुले).
कृती :- सर्व साहित्य कोरडेच वेगवेगळे भाजून घ्या व पूड करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
5) मालवणी मसाला
साहित्य :- अर्धा किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम दालचिनी, लवंगा, बाद्यान, नागकेशर, तमालपत्रे, जिरे, मोहरी, काळे मिरे, बडीशेप, 4-5 मसाला वेलदोडे, 5 ग्रॅम जायपत्री, 5 ग्रॅम शहाजिरे.
कृती :- सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून घेऊन त्याची बारीक पूड करून ठेवा.
6) कोकणी मसाला
साहित्य : - पाव किलो लाल सुक्या मिरच्या, पाव किलो धणे, प्रत्येकी 10 ग्रॅम लवंगा, जिरे, काळे मिरे, मोहरी, प्रत्येकी 5 ग्रॅम दालचिनी, जायपत्री, शहाजिरे, मेथीदाणे, अर्धी वाटी खसखस, अर्धे जायफळ, 25 ग्रॅम बडीशेप.
कृती :- वरील सर्व साहित्य कोरडेच भाजा व बारीक पूड करून बरणीत भरून ठेवा.
7) कच्चा मसाला
साहित्य :- अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे, 5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.
कृती :- सर्व साहित्य कच्चेच मिक्सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.
8) चहाचा मसाला
साहित्य :- 150 ग्रॅम सुंठ, 50 ग्रॅम काळे मिरे, 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम हिरवे वेलदोडे व 1 जायफळ.
कृती :- वरील सर्व साहित्य किंचित भाजून गार करा व मिक्सरवर बारीक करा.
9) दूध मसाला
साहित्य :- बदाम 50 ग्रॅम, पिस्ते 50 ग्रॅम, काजू 25 ग्रॅम, चारोळी 25 ग्रॅम, 15-20 केशराच्या काड्या, अर्धे जायफळ, 1 टेबलस्पून वेलदोड्याची पूड.
कृती :- वरील साहित्याची बारीक पूड करा व दूध, बासुंदी, खीर, श्रीखंड इ. पदार्थांसाठी वापरा.
10) सांबार मसाला
साहित्य :- धणे पाव किलो, जिरे 100 ग्रॅम, चणा डाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, 1 टी स्पून काळे मिरे, हळद 2 टी स्पून, सुक्या मिरच्या 50 ग्रॅम, पाव वाटी कढीपत्त्याची पाने, अर्धा वाटी सुके खोबरे.
कृती :- प्रथम डाळी वेगवेगळ्या भाजून घ्या. (करपू देऊ नका.) उरलेले सर्व साहित्य थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. थंड झाल्यावर सर्व एकत्र करून मिक्सरवर बारीक करा व हवाबंद बरणीत भरून ठेवा.
11) पावभाजी मसाला
साहित्य :- लाल सुक्या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम, 15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा, 7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून, काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून, सुंठ पावडर 2 टी स्पून.
कृती :- सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. (कधी कधी बदल म्हणून नेहमीच्या भाज्यांमध्येही वापरता येतो.
12) चाट मसाला
साहित्य :- दोन टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 2 टेबलस्पून काळे मिरे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टी स्पून हिंग पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टी स्पून काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ.
कृती :- हिंगपूड थोडीथोडी तेलावर परतून घ्या. बाकी सर्व पावडरी सोडून इतर साहित्य किंचित भाजून घ्या व एकत्र करून गार झाल्यावर मिक्सरवर बारीक करा.
(फ्रूटचाट अगर सॅलडसाठी वापरा.)....