Monday, July 24, 2023

बाळासाठी गाणी

 तू खायबा साखर लोणी


माझिया बाळा

तू खायबा साखर लोणी

चक्री भोवर विटी दांडू

रंगीत गोट्या भवरी चेंडू

खेळसी खेळा तू.....माझीया ...


नवलक्ष गोपाळ गडी 

वाट पाहती यमुना स्थळी

मिळूनी मेळा तू.....माझीया .


बाळ मुकुंद खातो लोणी

कौतुक पाहे नंद राणी

भरुनी डोळा तू.....माझीया ...


भानुदास विनंती करी

प्रसाद द्यावा मज श्रीहरी

त्रिभुवन बाळा  तू.....माझीया ...


डाव्या गुढग्याने रंगतो

Friday, April 7, 2023

पारंपरिक ठेवाl


पारंपरिक ठेवा 

लग्नाची गाणी 


1) घाणा भरणे गीत

1) आधी मूळ धाडा गणेश मोरायला 

आधी मूळ धाडा अंबिका मातेला

यावे चिंतील्या कार्याला 

यावे चिंतील्या कार्याला 

मांडव घातीला चारी कोपरे साधून

उभा कंबर बांधून

गणराया उभा कंबर बांधून उभा कंबर बांधून 


मांडवाच्या दारी चिखल का ग झाला

नवऱ्या मुलीचा बाप न्हाला

मांडव घातीला नुसत्या जाईचा / चाफ्याचा 

छंद मुलीच्या आईचा / वहिनीचा

मांडवाच्या दारी हळदी बाईचं वाळवण 

नवऱ्या मुलीला केळवण

मांडवाच्या दारी कोण ग मिरवली

नवऱ्या मुलीची कुरवली

कोण ग आहे हौशी 

नवऱ्या मुलीची मावशी



2) पाच पानाचा ग विडा ,

त्यावर मोतियाचा घोस,

वर नेमिला गणेश , वर नेमीला गणेश,

ग गणपती आधी l

पाच पानाचा ग विडा,

वर चिकण सूपारी ,

आधी नेमिला व्यापारी, आधी नेमिला व्यापारी,

ग गणपती आधी l

मांडवाच्या ग दारी,

पहिली चिठ्ठी देव्हाऱ्याला,

मग समस्त सोयरयाला ,ग समस्त सोयरयाला

ग गणपती आधी. l


 2) हळदीचे गाणे 

U Tube

1) गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाली 

2) पिवळी पिवळी हळद लागली 

3) गुलाबाची कली बघ हलदीन माखली


3) लग्नाची मंगलाष्टक 


या हो या तुम्ही या कार्याला या हो या तुम्ही या कार्याला 

शुभमंगल बोला बोला शुभमंगल बोला ll धृ ll


प्रथम नमुया गजाननाला 

द्वितीय नमन ते सरस्वतीला 

कुलदेवता त्याही स्मरुया 

आशीर्वाद तोही घेऊया

शुभ या कार्याला 

बोला sssss ll 1 ll


पिता वधूचे.....असती

माता वधूची....असती

बहीण...आणि....असती

भाऊ वधूचा .....असतो

शुभ या कार्याला

 बोला ssss ll 2 ll


......... तूम्ही दोघे

आनंदाने स्वानंदाने

संसार करावा छान आपुला

नेहमी जागणे कर्तव्याला

हेतू मनी बाळगा sssss

बोला sssss ll 3 ll

 4 ) आंबा शिंपणी 

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा । 

फळाचा राजा कसा l अमरुत बरसतो

दारी ग माझ्या आई l कसा सावली धरतो ।

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा । ।१।।

घाल तोंडात साखर ।ओटीत अन्नपूर्णा ।

ओटी भर ग आई आता l नाजूक मालत्याने।

तोषवण्या घरदारा l मन मुरडीन मालत्यासम 

शिंपीला आई अंबा l शिंपीला अंबा ।। २ ।।

शेल्याचे टोक बाई l करते ग घाईघाई

 वंदून ग तुम्हाला l येते ग आता आई ।

शिंपीला अंबा आई l शिंपीला अंबा ।। ३।।

लंगड्या श्रीरंगाला l पतीराजाने लपवीले ।

गुढ संसाराचे l आपसूक कळले ।

शिंपीला अंबा बाई शिंपीला अंबा ।।

रचना - © मानसी केसकर

  दि. १८/१२/२०२२


5 ) सुनेचा गृहप्रवेश 

U Tube

मुली तू आलीस आपुल्या घरी


मुंजीची गाणी

मातृ भोजन 

ओम भवती भिक्षा म्हणती

भाग्य तुझे किती 

घालोनी लांगोटी दंड उभा घे हाती

मग म्हण रे ओम भवती भाग्य ...ll धृ ll

चटण्या अन कोशिंबिरी बहुप्रकारे केल्या खिरी

भोजनास गर्दी किती भाग्य तुझे किती ll 1 ll


मातेच्या ताटातूनी घास घे तू प्रेमाने

आजपासूनी उच्चिष्ट कधी न तुझ मिळे ll 2 ll


विनाविती तव पदकमाला मोद द्याल भगिनीला 

ममकाला शुभबाला भाग्य तुझे किती ll 3 ll


मुंजीची मंगलाष्टक


प्रथम वंदूनी निमंत्रिले त्या गिरिजा पुत्रा ते

शुभमंगल व्रतबंध बटूचे आज योजिले हे ll धृ ll


जमली सारी आप्त मंडळी गृह हर्षे भरले

मातपित्याचे हात आजला स्वागतास सजले

आनंदाने भरले डोळे

आनंदाने भरले डोळे अनुश्री मायेचे

शुभ मंगल.....ll 1 ll


मातृभोजनी माता भरवी प्रेमे पुत्रा ते

आराध्य रे तव आज पासूनी बाल्य सरायाचे

गायत्रीच्या मंत्र बळे तुज पुढेच जाण्याचे 

शुभमंगल......ll 2 ll


अवनी धरिती कोमल हस्ते मंगल कलशा ते

मंगल आक्षत उधळीत सारी देती आशिषा ते

कानी पडती मंगल स्वर हे सुरेल सनईचे

शुभमंगल......ll 3 ll


कानमंत्र हा धनू देतसे बाळ आराध्या रे

धर्माज्ञेचे पालन करुनी उचली पाऊला ते

बलशाली आन कीर्तिवंत तुज जगी व्हावयाचे 

शुभ मंगल...... ll 4 ll


प्रथम आश्रमी टाकी पाऊल 

प्रथम आश्रमी टाकी पाऊल घेऊनी दंडाते

भिक्षा पहिली मागण्यास तू न धरी लज्जे ते

दिसे आराध्य हा गोजिरवाणा रुप सावळ्याचे

शुभ मंगल .......ll 5 ll


मंगळागौरीची गाणी


रहिबाई ग रहिबाई  ग तुझा गजनी वाडा

वाड्याला वाड्याला

तुझ्या खिडक्या चार

खिडकीला खिडकीला

कुणी लाविले मोर 

मोराला मोराला 

तुझ्या रेशमी गोंडा 

हलतो कसा झुलतो कसा


माळ्याच्या मळ्यामंदी गोफण काठी

वांगी भरलेत देठोनदेठी

वांगी तोडून भरलाय हरा 

त्यावर झाकला साखरशेला 

साखरशेला वाऱ्याने गेला 

पगड फु बाई पगड फू

( भेंडी , काकडी , दोडका , भोपळा )


गोफ वीणू बाई गोफ वीणू

आर्ध्या रात्री गोफ विणू

गरे घ्या गरे पोटाला बरे

ना खाईल त्याची म्हातारी मरे

मेली तर मेली कटकट गेली


तिखट मीठ मसाला 

फोडणीचे पोहे कशाला 

आज वार सोमवार

शंकराला नमस्कार ....


मगर मशानो द्या माझी घागर

घागर बुडाली चुंबळ तरली

घरी माझी सासू खट्याळ 

मजला मारील 


आई मी येऊ का 

नको रे राजा 

बाजारात जाईन

केळ मी खाईन

साल तुला देईन 

चालेल तुला 


खुर्ची का मिरची जाशील कैसी


खीस बाई खिस


आडवळ घुम पडवळ घूम


किकीच पण बाई किकी

सुदंर मासा सुसू 

आल्या ग बाई गुजरणी गुजरणी

कापूस घ्या ग पिंजरूनी पिंजारूनी

कापूस पडला सरकीचा सारकीचा

पाऊस पडला मोत्याचा मोत्याचा


सलाम सालकी तुझी माझी पालखी

पगड फू बाई पगड फू

गेले होते रानी विसरले पाणी

पगड फू बाई पगड फू


लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या 

मामांनी दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या

एक सू सू दोन सू सू

आपण दोघी मैत्रिणी हिरवी साडी नेसू हिरवी साडी नेसू 


आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा

मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते 

लाल साडी नेसिन म्हणते 

आगोटा पागोटा


दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी

भीती तोड ग पोरी तू तर लई भारी


कटवट कणा 


नाच ग घुमा कशी मी नाचू 

या गावाचा त्या गावचा कासार नाही आला बांगडी नाही मला 

कशी मी नाचू


आग आग सुनबाई काय म्हणता सासूबाई 

माझ्या पाटल्या चोरल्यास का ग ,

का ग , का ग .


डोहाळ जेवण गाणी

1)  मोद होईल सखीला

 मोद होईल सखीला

नूतन गर्भिणीला ll धृ ll


पहिले दुसरे मासी तिजला

अन्नाचा तो विटची आला

भक्षी आम्रफला ll 1 ll


जाईजुई शेवंती आवडे

गुलाब निशिगंध नी केवडे

सुंदर बकुलफूला ll 2 ll


बागेमध्ये बांधून झुला प्रे

मे गाती ईश्वरीलीला 

वायू हलवी झुला ll 3 ll


विजयी बालक जन्मा यावे

स्वकुल उद्घरी सुस्वभावे

ही विनंती ईशाला ll 4 ll

 रचना:- पपा काकीच्या पोतडीतून

🤶🤶🤶🤶🤶🤶


2)  सांग गडे सांग काय आवडे तुला

सांग गडे सांग काय आवडे तुला 

तुजसाठी सजवूनिया बांधिला झुला ll धृ ll


बैस आशी थाटमाट पाहुदे मला

दृष्टीची तीट गडे लाऊदे तुला

मोदभरे सावकाश हलवी हिंदोळा ll 1 ll

मांगल्य दर्शवीती हिरवी कंकणे

गांधयुक्त पुष्पांची विविध भूषणे

चंदेरी शालूचा पदर झळकला ll 2 ll


विगुणीत हे भाग्य असे आज जाहले 

उदरी तुझ्या वाढतसे बाळ चिमुकले 

आनंदे सांभाळी वंश आपुला ll 3 ll


सौख्य सागरास तुझ्या भरती येऊदे 

कुलवंत शिलवंत बाळ होऊ दे

प्रार्थना अशी करुया भक्त वत्सला ll 4 ll


🤶🤶🤶🤶🤶🤶

🥰🥰🥰🥰🥰🥰


लाडक्या सुनेसाठी, सह्दयी सासूने

म्हटलेले .... " डोहाळे "


लिंबलोण उतराया या ग माझ्या सयांनो

आज माझी सोनसळी माहेराला जाय गो ।


मधुमास हुंगूनिया नार मुग्ध झाली

फळभार पेलूनिया सखी कशी डवरली ।


कातावली, खंतावली मास दोन होता 

कसनुशी मुद्रा झाली , खाता ग पीता ।


'नको' ' होय', अजीजीने हट्ट तीचा पुरवला

'कांत' हसे मनामधे, धन्यत्व तो पावला ।


तीनचार मासामासी घाबरली, बावरली

बाळाच्या चाहूलीने लेक कशी सुखावली ।


भारी वाटे, जड वाटे, फिरे गरागरा

काय दिसे कसे दिसे पुसते ती सानथोरा ।


पाचसहा मासी तिज जाणवली माया

थोड्याफार श्रमाने ती टिपते ग काया ।


शुष्क झाली, म्लान झाली, जडावली बाय

उष्ण जल आणा की ग शेकूदे ग पाय ।


सातव्याची छाया पडता सयी आतूरली

काही नको तुमचे आता भेटवा ग माऊली ।


जडभार ओटीपोट, सांभाळून जायsss 

'कुलदीप' लाव सदनी सांगते मी माय ।


या ग माझ्या सखयांनो आई ताई माई

ओटी भरुनी औक्षवा ग विनिते मी सई ।


सार्यांना ग लवूनी तू, पड त्यांच्या पाया

कुशी तुझ्या नांदतो ग " प्रभू रामराया " ।


. © मानसी केसकर

भ्रमण ७५८८३७५४३९


( सदर ओव्यांना पारंपरिक चाल आहे. त्या माझ्याच आहेत. नावासह शेयर 

केल्यास हरकत नाही. डोहाळे म्हणूनच

सादर करण्यासाठी रचल्या आहेत. )

🤶🤶🤶🤶🤶🤶


🥰🥰🥰🥰🥰🥰



बारशाची गाणी

1) आकाशाचा निळा पाळणा 

आकाशाचा निळा पाळणा वासुदेव झुलवी

अनंत रुपे जननी जगाची अनंतास डुलवी

बाळा जो जो रे 

बाळा जो जो रे ll धृ ll


निराकार तव ये साकारुनी

माय प्रसवते बाळ रुपातूनी

बोल बोबडे गोड ऐकुनी धरा तृप्त होई

अनंत रुपे......ll 1 ll


वात्सल्याची माय भवानी

बाळरुप भगवंत शोभती

आदिदेव तो धर्मासाठी पुन्हा जन्म घेई 

अनंत रुपे .....ll 2 ll


झुलवा झुलवा सखे पाळणा 

जन्म दिनी या रिझवी कृष्णा

गोपाळा गाऊनी महिमा मिळावा पुण्याई 

अनंत रुपे ......ll 3 ll


2) किती भाग्याचा पहिलाच पाळणा


किती भाग्याचा पहिलाच पाळणा

चिमुकला ग लाल बाळ तान्हा

दिला देवाने तुला नजराणा ll धृ ll


तुझ्यासाठी हा पाळणा कराचा

आणि करीन दिवा नेतराचा

रात्रंदिन रुपिन फुलावाणी जपीन

काळजाचा करीन मी बिछाना ll 1 ll


आली खुशीत बाळाची मावशी 

बघा दिसतेय भारीच हौशी

कडे तोडे करी अंगडी टोपडी भारी

बघा आणीला चांदीचा पाळणा ll 2 ll


या लाडात म्हणती साऱ्या नंदा 

वहिनी सुचत नाही काम धंदा 

खट्याळ दादाचा बाळ तुझ्या पोटी आला 

आला आला ग हा कृष्ण तान्हा ll 3 ll


म्हणे प्रेमाने बाळाचा चुलता 

असा चिमणा मी पाहिला नव्हता 

चंद्रावाणी सुकुमार राजा बिराजदार

माझ्या घरी आला ग नवा पाहुणा ll 4 ll


3) दत्ताचा पाळणा 

जो जो जो जो रे गुरुवर्या

बाळा दत्तात्रया 

जो जो जो जो रे ll धृ ll


अनुसुया माता पतिव्रता

अत्रि ऋषींची कांता 

धन्य त्रीलोकी 

गृही असता

श्रीहरी शंकर धाता 

येती अतिथी पहाया

बाळा ssssss ll 1 ll


त्रिवर्ग भुकेने पिडीलो

तुझ्या द्वारी ठाकलो 

मध्यान्ह समया 

बहु थकलो

म्हणसी माते आलो 

देई सिध्दान्न भाक्षाया 

बाळा ssssss ll 2 ll


अतिथी त्रैमुर्ती ओळखोनी 

बैसविले आसनी 

आर्ध्य पाद्य पूजा अर्पूनी

विनवी साष्टांग नमुनी

इच्छित पुरविन हो स्वामिया 

बाळा ssss ll 3 ll


भुललो तव रुपा सुंदरी

वाढी दिगंबरी 

होतो विन्मुख 

वद लौकरी

असाध्य वाटे जरी

आलो तव सत्व पहाया

बाळा ssss ll 4 ll


धन्य पतिव्रता निर्मळ

म्हणे अतिथी बाळ

प्रार्थुनी बैसाविले निश्चळ

फेडूनी वस्त्रे सकळ

आली नग्नरुपे वढाया

बाळा sssss ll 5 ll


विस्मित त्रैमुर्ती

बाळ होसी

स्तनपान मागसी

वंदी अनुसूया पायाशी

माता म्हणाविशी

सत्य करावे बोलाया

बाळा ssssss ll 6 ll


आधी गुरुदत्त अवतरला

सुरवरा आनंद झाला 

जगभ्रांती तुटली

बाळ आला

भक्तमेळा सजला

दत्तभजन कराया

बाळा ssssss ll 7 ll


दृष्ट 

कोणाची झाली दृष्ट माझ्या ग.....

लिंबलोण उतरिते ओवाळून काया ll धृ ll

 

साधुसंत येतो जाती दृष्ट त्यास लाविविती

वरियाच्या मोहनमाळा कोणाची झाली...ll 1 ll


जनाबाई काढी दृष्ट भक्तीने ती मोहरा मीठ

लावितसे गालबोट कोणाची झाली ....ll 2 ll


उखाणे

1) झुण झुण जात

झुण झुण जाते खिडकीतून पाहते

खिडकीला तीन तारा

अडकित्त्याला घुंगर बारा

तिकडून आला व्यापारी

त्याने दिली सुपारी

सुपारी देते वण्याला

हंडा आणते पाण्याला

पाणी आणते गंगेचं

वाडा बांधते भिंगाचा 

वाड्यात वाडा सात खोल्या

मधल्या खोलीत कॉट

कॉटवर गादी

गादीवर उशी

उशीवर बशी 

बशीत घड्याळ घड्याळात वाजला एक.

बशीत ओल्या नारळाचे सारण ....नावाला ....कारण

 

2) वसंताची लागता चाहूल

वसंताची लागता चाहूल 

गुढी उभी केली आणि

चैत्रागौर धावत आली 


दारी सजल चैत्रांगण

गौराईचं डाळ पन्हं

तोच झाले अक्षय तृतीयेचा येणे 


वैशाख वणव्यात दरवळला सुगंध मोगऱ्याचा 

हलकेच मनाला थंडाऊन गेला

गंध रोहिण्यातील मातीचा


लागता चाहूल मृगाची 

धरणीमाय अंकुरली

श्रावण सरीत चिंब होऊनी

सृष्टी सारी बहरली 


झिम्मा , फुगडी मंगळागौर 

नाचगाण्याना आला पूर


गणेशाबरोबर आल्या माहेरवाशिणी

त्यांची करते पाठवणी


स्वच्छ्ता करून करते

नवरात्राची तयारी 


तोच

लगबगीने धावत दिवाळी आली दारी

भाऊबीज पाडवा वाढवी नात्यातील गोडवा


कणभर तिळ मणभर गूळ 

तुमच्या माझ्यातील स्नेह असाच वाढवा


कारण अनिल रावांच नाव घेऊन सांगते कुलकर्णी-देशपांडे परिवारात आता चिमुकला पाहुणा येत आहे नवा 


🥰🤶🥰🤶🥰🤶🥰🤶


 3) कांडून कुटून केली पंचमी 

कांडून कुटून केली पंचमी 

सण आला पोळा

पोळ्याची वाटते डाळ 

तोवर आली घटाची माळ

शिलंगणाच सोन

अन दिवाळीनं केलं येणं

दिवाळीची लावते पणती

तोवर संक्रांत आली बाई नेमकी

संक्रांतीचं सुगड

आणि पूनव आली दुगड

पूनवेला केले वड्यान पाट

तेवढ्यात शिमगा आला गजानघाट

शिमग्याला केली खीर

अन रंगपंचमीन दिला धीर

रंगपंचमीचा लावते रंग 

तेवढ्यात पाडवा आला जबर दंग

पडव्याची उभारते गुढी

तोवर अक्षय तृतयेने मारली उडी

अक्षय तृतीयेचा तोरा

........रावांच नाव घेते कारवणी पर्यंत जरा दम धरा 


4)

गोठ घेतले पाटल्या घेतल्या 

घेतला राणीहार 

ठुशी घेतली चिंचपेटी घेतली

घेतला लक्ष्मीहार 

आंगठी घेतली वेल घेतले

बाजूबंद आणि वाकी 

आंबड्यातली फुलेही घेतली

राहिले नाही काही बाकी

नाकातील नथ घेतली 

तन्मणी आणि तोडे

सोन्याचांदीचे घेऊन झाले 

म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे 

जोडवी जोड मासोळ्या 

पैंजण घेतले पायी

छल्ला मेखला घेतला आता 

राहिले नाही काही बाकी

झाली सगळी खरेदी

आता मी करते नट्टापट्टा 

आगबाई घाईघाईत तर घ्यायचाच राहिला

बिंदी आणि कंबरपट्टा

तोही घेतला , बाजारात गेले आणि तोही घेतला

झाली खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली 

आणि अनिल म्हणतात कसे 

आग उठ सरिता पहाट झाली









Tuesday, November 22, 2022

रॅपिड

तुळजापूरकर

* शाळेत तुमचा सर्वात पक्का आणि सर्वात कच्चा असलेला विषय कोणता ?

* तुमच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणी मध्ये जास्त वाटा कोणाचा असे तुम्हाला वाटते 

पालक - बँक का तुम्ही स्वतः

* लोकांना भेटी द्यायला आवडतात की लोकांनी भेटायला आलेले आवडते

* मुड चांगला करण्यासाठी लाँग ड्राईव्हला जायला आवडते की संगीत ऐकायला 

* बँकिंग करियर केले नसते तर दुसरे कोणते क्षेत्र आवडले असते

* एम्प्लॉयमेंट की रिटायरमेंट जास्त आनंद कशात वाटतो

* आजपर्यंत तुम्हाला मिळालेली सर्वात बेस्ट compliment कोणती 

* कुटुंबाबरोबर केलेली शेवटची ट्रिप कोणती

* लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज लग्न करताना जोडीदारामधील कोणता गुण आवडला

* कधी सिनेमा पाहता का ? आवडती अभिनेत्री कोणती ?




धनंजय 


* अशी एखादी गोष्ट की जी आपण करायला नको होती असे वाटते

* असा एखादा शब्द की जो तुम्हाला

 अजिबात आवडत नाही 

* तुमच्या स्वभावात कोणताही एक बदल करायला सांगितल्यास कोणता कराल  असल्यास 

* सध्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना संघटना म्हणजे काय हे एका शब्दात कसे सांगाल

* संघटनेच्या भविष्यासाठी गुगल मिट का प्रत्यक्ष मीटिंग

* जास्त काय आवडते डीक्टेशन की रायटींग

* तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण किंवा गोष्ट कोणती ? 

* तुमचे सर्वात आवडते गाणे हिंदी / मराठी

* उत्तम जोडीदार की उत्तम वडील कोणते नाते जास्त भावते

* तुमच्या सौ. नी तुमच्यातील कोणता गुण पाहून तुमच्याशी लग्न केले

*  फार क्वचित काही महत्वाच्या घरगुती कामासाठी घरी येण्याची दिलेली वेळ संघटनेच्या कामामुळे पळता आली नाही तर घरी प्रवेश करताना 

दबकत दबकत करता की मी असाच आहे या आविर्भावात करता 

* घरी कधी कुकिंग करता का ? तुमच्या हातचा कोणता पदार्थ सौ. ना आवडतो ?








Sunday, October 30, 2022

अंदमान एक विलक्षण अनुभव

अंदमान एक विलक्षण अनुभव 


26 ऑक्टोंबर 2022


अशिषाचे लग्न झाल्यापासून एक फॅमिली ट्रिप काढायची अशी आमची नेहमी चर्चा व्हायची पण प्रत्यक्षात काही होत नव्हते . प्रत्येकाला आपापल्या बजेटची तयारी करायची होती . पण आता जर या दिवाळीच्या सुट्टीत प्लॅन झाला नाही तर पुन्हा सगळ्यांचा मेळ केव्हा होईल हे सांगता येणार नव्हते . त्यादृष्टीने अंदमानचा प्लॅन सुरू झाला . पण गेल्या वर्षापासून पोर्टब्लेअर एअरपोर्टचे काम सुरु असल्यामुळे ते दहा दिवसापैकी सहा दिवस सुरु व चार दिवस बंद असते असे समजले . यावर्षी आमच्याकडे दिवाळी पण नव्हती मग मुलांनी अगदी प्लॅनच केला की सगळ्यांच्या सुट्ट्यांचा मेळ बसवू आणि  लक्ष्मीपूजन झाले की आपण अगदी सहा दिवसांचा अंदमान प्लॅन करु . काढलेल्या माहितीप्रमाणे 572 बेटापैकी 36 बेटावर वस्ती आहे 6/7 बेटांवर पर्यटकांना जाता येते आणि पर्यटकांना अभ्यासकांना , निसर्गप्रेमींना कितीही दिवस राहिले तरी समाधान होणार नाही मग सगळाच विचार करून मेळ घालत सहा दिवसाचा आम्ही प्लॅन केला पोर्टब्लेअर आणि हॅवलॉक इथे राहून आसपासची बेटे पाहण्यासाठी सगळ्यांच्या सुट्ट्या , रजा पाहून आम्हाला प्लॅन करावा लागला होता त्यामुळे अगदीच पीक पिरियडमधे आमची ट्रिप निघाली होती . फ्लाईटची तिकिटे आमचे आम्ही काढली होती तर पुण्याचा दिपाली इखे यांचे लेगसी हॉलीडेज यांच्याकडून अंदमानचे पॅकेज घेतले होते . ठरलेल्या प्लॅन प्रमाणे दिवाळी पडव्यादिवाशी पहाटे आमचे विमान पुणे-चेन्नई आणि नंतर चेन्नई-पोर्टब्लेअरसाठी रवाना झाले . गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या अंदमान ट्रीपला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली . आम्ही दोघे , आशिष-कीर्ती आणि आकांक्षा केतकी असा सहा जणांचा ग्रुप होता . ऐनवेळी कीर्तीच्या आईबाबाचे येणे तब्ब्येतीमुळे कॅन्सल झाले त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच अर्र असे झाले कीर्ती तर थोडी खट्टू झाली पण त्यांची ट्रिप तिच्या आत्याबरोबर रीशेड्युल झाली  त्यामुळे ती पुन्हा खुश झाली , मग आम्ही सहाजण निघालो . दोन दिवसापासून पाऊस थांबला होता आणि आचानक थंडी पडली होती पण ट्रिपच्या उत्सहापुढे पहाटे तीनची थंडी पण जाणवत नव्हती सगळ्यांच्या मनात एक अनामिक ओढ होती . सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही सकाळी साडेसातला चेन्नई एअरपोर्टला उतरलो . पुढच्या विमानाला तीनचार तासांचा वेळ होता त्यामुळेे चहा नाष्टा करुन वेळ होता म्हणून आम्ही विमानतळावर फिरत बसलो . चेन्नई विमानतळ तसे पाहायला छान वाटले सुबक नक्षीकाम केलेल्या धातूच्या अनेक मुर्ती तिथे पाहायला मिळाल्या . सहसा कुठे पाहायला न मिळणाऱ्या मूर्ती म्हणजे उभा गणपती , शेषशय्येवरील विष्णू , कार्तिकस्वामी , कामदेवाची मूर्ती आणखी बऱ्याच मूर्ती होत्या . 

बरोबर आकरा वाजता आमचे विमान पोर्टब्लेअरकडे रवाना झाले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला . एक वाजता आमचे फ्लाईट उतरणार होते तर साडेबारापासून आम्हाला खाली पूर्ण पाणी दिसू लागले जसजसे जवळ येऊ लागले तसतशी छोटी छोटी हिरवीकंच बेटे दिसू लागली आणि खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची जाणीव झाली कारण विमान उतरण्यापूर्वी शहरावर असलेले प्रदूषण आपले स्वागत करत असते इथे मात्र आम्हाला स्वच्छ असलेले सर्वात मोठं अंदमानचे बेट सभोवती निळेशार पाणी , किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू , ऊन आणि लाटेमुळे बदलणारे रंग इतक्या उंचीवरुनही नयनरम्य दिसत होते . निसर्गाने अंदमानला बहाल केलेली देणगी पाहून हरकायला होत होते . 



आत्ता तर ही सुरुवात आहे आणखी काय काय पाहायला मिळणार असा विचार करुन लहान मुलासारखे , फुलपाखरासारखे मन भिरभिरायला लागले . एअरपोर्टला बाहेर दिखे मॅडमचा माणूस आलेला होताच . बाहेर आल्यावर एअरपोर्टला महाराष्ट्रीयन असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पाहून स्वाभिमानाने उर भरून आला दोन मिनिट तिथेच शांत उभे राहिलो आणि हॉटेलकडे रवाना झालो .



 चेकईन करून फ्रेश होऊन बरोबर अडीच वाजता आम्ही खाली आलो इथे पाच वाजता सूर्य मावळतो आणि लगेच अंधार होतो म्हणून सनसेटवाला लोकल बीच आणि 1943 मधे पाहिला तिरंगा ज्या ठिकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी फडकवला त्याठिकाणी जाण्याचा प्लॅन केला होता . वेळ जास्त नव्हता आणि सारखे खाणे सुरू होते मग आम्ही जेवण स्कीप करुन बीचवर गेलो . बीचवर स्नॅक्स घेतले , तिथले नियम पाहून ऐकून खूप छान वाटले खूप कडक नियम होते . प्लास्टिक कचरा कुठेही टाकायला पूर्णपणे बंदी होती मुख्य म्हणजे पाण्यासाठी एक लिटरवाली बाटलीच नव्हती . एकतर काचेची बाटली किंवा दोन लिटरची बाटली घ्यावी लागत असे की ज्ययोगे ती पटकन संपवून फेकून देता येऊ नये . प्रत्येकजण निसर्गाचे रक्षण काळजीपूर्वक करतात नियमांचे उल्लंघन केले जात नाही . जागोजागी कचराकुंड्या आहेत आणि त्यातच कचरा टाकायचा हा कडक नियम आहे त्यामुळे इथले बीच अगदी चकाचक आहेत . कुठूनही पहा माणसांची गर्दी असली तरी समुद्र एकदम स्वच्छ आहे . ही खरोखर समाधानाची गोष्ट आहे . रिलॅक्स मूडमध्ये आम्ही बीचवर वेळ घालवला 



त्यानंतर आम्ही 

 " 1943 "

या ऐतिहासिक पॉइंटला आलो समुद्रकाठी भिंतीवर 1943 असे भले मोठे जाडजूड , उंच दगडी अंक त्याच्यासमोर उंच मोठ्ठा झेंडा फडकत होता ते दृश्य पाहून उर भरुन आला त्याक्षणी सलामी द्यावीशी वाटली आणि मी दिली .



 तिन्हीसांजेला एका बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज दुसऱ्या बाजूला झेंडा , 1943 या अंकाभोवती आणि समोर टेकडीवर हिरवळीवर भारताच्या नकाशाचे लाईटिंग बाकी सर्व शांत वातावरणात होते त्यात एक तास कसा निघून गेला समजले पण नाही .

अंदमानची राजधानी असलेले पोर्टब्लेअर हे शहर बेटावर असल्यामुळे नैसर्गिक वाटत होते . वाहनांची फारशी दाटी नाही , माणसांची उर धापापेपर्यंत धावाधाव नाही त्यामुळे रस्त्यावर फार गर्दी नाही , असलेली गर्दी मॅनेज करण्यासाठी तिथे सिग्नल नाहीत , ट्रॅफिक पोलिस हातात " स्टॉप आणि गो " या पाट्या दाखवत ट्रॅफिक मॅनेज करत होते . मनाला समाधान वाटत होते .

आमच्या प्लॅनप्रमाणे सकाळी 8.45 वाजता सेल्युलर जेल पाहण्यासाठी आम्ही निघणार होतो . भल्या पहाटे दोन वाजल्यापासून आम्ही जागे होतो त्यामुळे 8 वाजताच जेवणे आटोपून आम्ही विश्रांतीसाठी हॉटेलवर आलो . हॉटेल व्यवस्था पूर्ण आपल्यासारखी होती आम्ही लवकरच झोपी गेलो .

ट्रिप ठरली तशी दोन महिन्यापासून अंदमान विषयी माहिती वाचणे , व्हिडिओ पाहणे , ऐकणे नित्याचे होते . आता उद्या प्रत्यक्षात त्या भूमीवर पाय ठेवण्याचा योग येणार होता . स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तर लहानपणापासून ऐकलेले होते पण त्यांनी ज्या तुरुंगातील दहा बाय दहाच्या खोलीत ऐन तारुण्यातील आकरा वर्षे सजा भोगली तीही त्या कालावधीत न डगमगता , स्फुरलेले लेखन भिंतीवर कोरुन पुन्हा ते पाठ  करून ती लिखित स्वरुपत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले ते सारे विचार मनात दाटी करू लागले . मी नुकतेच योगेश सोमण यांचे 

" मी विनायक दामोदर सावरकर "

चे सतरा भाग सलग ऐकले होते तसेच सावरकरा विषयी बरेच वाचलेले होते आम्ही चर्चा पण करत होतो . त्यामुळे जेल परिसरात प्रवेश करताच सगळेचजण भावूक आणि गंभीर झाले होते . प्रवेशद्वाराजवळ नेताजी आर्ट गॅलरी आहे त्याठिकाणी अनेक परक्रमींची सचित्र माहिती वाचायला मिळते . जवळच दोन स्वातंत्र्यज्योती अखंड तेवत आहेत




 त्याठिकाणी रजकैद्याना दिली जाणारी वागणूक कसली ती पिळवणूकच होती ते वर्णन गाईडकडून ऐकताना आपसूकच हाताच्या मुठी वळत होत्या . याठिकाणी अनेक स्वातंत्र्य सेनानीना मरणयातना भोगाव्या लागल्या होत्या . ब्रिटिशांनी अघोरी अत्याचार केले होते .

   जेलमधील खोल्या त्यांची बांधकाम रचना , जाडजूड कड्या-कोयंडे , घाणे , साखळदंड , फाशीची जागा पाहताना कल्पना पण करवत नव्हती . संपूर्ण जेल परिसर , अखंड तेवत असलेल्या दोन ज्योती पाहून झाल्यानंतर जेलमध्ये सावरकरांच्या खोलीत प्रवेश केला . तिथेच शांतपणे बसून त्यांचेच

" ने मजसी ने परत मातृभूमीला "

हे गीत ऐकले , ते सुरु असताना आशिषने नेहमीप्रमाणे तिथे आलेल्या वस्तू की ज्या सावरकरांनी वापरल्या होत्या त्या म्हणजे त्यांची जेवणाची थाळी , पाण्याचा कटोरा , एक फूट उंचीचा लाकडी खाट आणि पांघरायची कांबळ एवढ्या वस्तू जतन करुन ठेवलेल्या आहेत याचा व्हिडिओ केला सगळ मनात साठवले , त्यांना विनम्र अभिवादन करून जड अंतःकरणाने आम्ही तेथून निघालो .



सेल्युलर जेल मात्र मनातून पटकन जाईना . इंग्रजांचा , ब्रिटिशांचा मनातून प्रचंड राग तर येत होताच पण त्याचवेळी कुतूहलही वाटत होते . दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी या जागा शोधून कशा काढल्या आणि इतकी बांधकामे कशी केली असतील . मुंबई , दिल्ली , गोवा ही ठिकाणे नेमकी टिपली कशी आणि त्यातही आपल्याच देशातील देशप्रेमीना शिक्षा देण्यासाठी कैद करुन अंदमान सारख्या बेटावर बंदिवान करुन ठेवले . त्यातूनही चुकून कोणी निसटले तर जिवंत राहण्याची शक्यता नाही कारण बाहेर चोहोबाजूंनी पाणी चुकून किनारा सापडलाच तर घनदाट जंगल . अंदमान आज जरी पर्यटन स्थळ वाटत असले तरी ती शंभर वर्षापूर्वी काळकोठडीच होती ती . विचार करून डोकं सुन्न झाले होते . तशातच आम्ही बाहेर पडलो . 

आता आकरा नंतरचा पूर्णवेळ रिकामाच असणार होता . सध्या जेलमध्ये लाईटचे अपग्रेडेशनचे काम चालू असल्यामुळे दोन महिन्यापासून लाईट शो बंद आहे हे ऐकून थोडासा मूड गेला . मग प्लॅनमधे नसलेले रॉस आयलॅंड आणि चिडिया टापू आम्ही मॅनेज केले . आता इथून पुढे कुठेही जायचे तर बोटीने , फेरीने प्रवास असणार होता आणि प्रत्येकवेळी वॉटरप्रूफ जॉकेट घालून प्रवास असणार ती मजा घेत आम्ही बोटीने पोर्टब्लेअर ते रॉस आयलॅंड हा प्रवास केला . पूर्वी इथे ब्रिटिशांची राजधानी होती अनेक कार्यालयांचे अवशेष दिसतात एक ब्रिटिश सागरी पर्यवेक्षक डॅनियल रॉस याच्या  नावावरून या बेटाला रॉस नाव दिलेले होत त्याला आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव दिले .बेटावर उतरले की याठिकाणी मोर , हरीण आणि सांबर भरपूर आहेत . टेकडीवर बऱ्याच छोट्या छोट्या इमारती आहेत . 2004 च्या त्सुनामी मध्ये या बेटावर बरीच पडझड झाली आहे त्यामुळे आज ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष याठिकाणी दिसतात . बेटावर उंच टेकडी असून टेकडीवर जाण्यासाठी याठिकाणी गाडीची सोय आहे गाडीने आम्ही टेकडीवर गेलो तिथून पुढे दीडशे पायऱ्या उतरुन दीपस्तंभ असलेल्या पॉईंटला जाता येते त्याला . पायऱ्या संपल्या की त्या पॉइंटला जाताना लाकडी पूल आहे त्यावरुन आम्ही गेलो . तिथे पुतळा आणि उंच दीपस्तंभ आहे चोहोबाजूंनी समुद्र आहे आणि समुद्रात मोठाले खडक आहेत सतत त्या खडकावर समुद्राच्या लाटा फेसळत येऊन धडकत असतात . पाणी गेले की खडकावर असंख्य खेकडे चालताना दिसतात पुन्हा पाण्याची लाट येते त्यात ते निघून जातात पुन्हा दिसतात असा सतत खेळ सुरु असतो . कोणत्याही पॉइंटला गेलं की तिथल्या निसर्गसौंदर्याची भुरळ पडत होती . प्रत्येक ठिकाणचे वेगळेपण खुणावत होते . पुन्हा तितक्याच पायऱ्या चढून येताना मात्र दमछाक झाली पण तितकाच आनंदही होत होता . वर आल्याबरोबर मटक्यातील मलई कुल्फी खायला जी मजा आली त्याला कशाची तोड नव्हती .



तिथून आम्ही बंदरावर गेलो याठिकाणी एका गोष्टींनी चित्त वेधून घेतले ते म्हणजे माणसाला पाहून कोसो दूर पाळणारे हरीण त्याठिकाणी पक्षी व प्राण्यांशी बोलणाऱ्या अनुराधा राव यांनी हाक मारताच धावत येत होती . आरती , बाबू , रामा , पिंकी , छोटू अशा त्यांनी ठेवलेल्या वेगवेगळ्या नावांनी लाडीक हाक मारताच धावत जवळ येतात आणि त्या आपल्या हातात खाऊ देतात तो आपण हरणाना भरवू शकतो . थोडावेळ थांबून पक्षी प्राण्यांशी बोलणाऱ्या अनुराधा रावबरोबर आम्ही गप्पा मारल्या . चाळीस वर्षांपासून त्या हेच काम करतात त्यांचे वडील हेच काम करत असत . त्या रोज बोटीने पोर्टब्लेअर जा-ये करतात कधीकधी तिथेच राहतात . 2004 च्या त्सुनामीनंतर हरणांची संख्या एकोणतीस झाली होती आज ती चारशे झाली आहे . त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी त्सुनामी पाहिल्याचे सांगितले त्या करत असलेले वर्णन ऐकून अंगावर शहारा आला .



रॉस नंतर आम्ही पुन्हा पोर्टब्लेअरला आलो जेवण करुन एक तास आराम केला आणि गाडीने 30 किलोमीटरवर असलेल्या चिडिया टापू कडे रवाना झालो . रस्त्यात उंच उंच नारळाची आणि सुपाऱ्याची झाडे दिसत होती . मोठाले नारळ आणि कुतूहल म्हणजे सुपाऱ्याच्या लडीने लकडलेली नारळाच्या झाडाप्रमाणे दिसणारी सुपारीची झाडे पाहताना मजा वाटत होती . ती शेती मात्र खाजगी मालकांची होती . आम्ही बीचवर पोहोचणार तोच काठावर दलदलीत मोठी मगर आम्हला ड्रायव्हरने दाखवली . त्या बीचवर आम्हाला सनसेट दिसणार होता , निरीक्षण केले , नीट कान देऊन आवाज ऐकला तर क्वचित रंगीबेरंगी चिमण्या उडताना दिसत होत्या . आम्ही बीचवर फिरत होतो पण सूर्य ढगाआड होता पण लालबुंद सागर किनारा आणि त्याची समुद्रावर पडलेली किरणे मात्र मोहक होती . सनसेट दिसला नाही पण सुर्यास्ताच्यावेळेचा लालिमा फाकलेला समुद्रकिनारा पाहून आम्ही हॉटेलवर परतलो . दुसरे दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला हॅवलॉक साठी निघायचे होते . इकडे लवकर अंधार पडतो त्यामुळे आठ वाजताच रात्रीची जेवणे आणि पॅकिंग करुन आम्ही नऊ वाजताच झोपलो .

28 ऑक्टोंबर , आज ट्रिपचा तिसरा दिवस ! खऱ्या अर्थाने दोन दिवस आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहायला जाणार होतो ते ठिकाण म्हणजे हॅवलॉक बेट ज्याचे आताचे नाव आहे 

" स्वराज-द्वीप ".

पोर्टब्लेअरला रोडचा संपर्क तुटला होता तर याठिकाणी रोडबरोबर हवाई संपर्कपण असणार नव्हता फक्त बोटीने ( फेरिने ) प्रवास असणार होता . इथे जसा पाचला सूर्य मावळतो तसा पाचला उगवतो . लवकरच आवरुन आम्ही नाष्टा वगैरे करुन सातलाच हॉटेल सोडले आणि बंदरावर पोहोचलो . त्याठिकाणी विमानतळावर जितके सोपस्कार असतात तितकेच सोपस्कार करावे लागणार होते त्यामुळे नऊच्या बोटीसाठी आम्ही साडेसातला बंदरावर गेलो . " नौटीका " नावाची भाली मोठी फेरी आमच्या स्वागतासाठी समुद्रात हेलकावे घेत उभी होती . लाल , निळी , पिवळी , पांढरी अशा रंगीबेरंगी अनेक फेरी त्याठिकाणी उभ्या होत्या . निळाशार समुद्र , पांढऱ्याशुभ्र रेतीचा किनारा , घनदाट अशी दिमाखात डोलणारी हिरवीगार झाडी आकाशात निळ्या पांढऱ्या विविध छटांचे ढग ! सोबतीला खट्याळ वारा होताच ,आहाहा ! काय ती निसर्गाची कमाल म्हणावी , काय पहावे आणि काय नाही असे वाटत होते . दीडदोन तास या बोटीत बसून अथांग सागरात प्रवास करणार याचा विलक्षण आनंद होत होता .फेरीमध्ये प्रवेश करताच रेल्वेच्या एसी डब्यात प्रवेश केल्यासारखे वाटले ( सुरक्षित ) पण खिडकीतून बाहेर पाहिल्यावर मात्र आपण अथांग सागरात हेलकावे खाणाऱ्या मोठ्या बोटीत आहोत हे जाणवते .   दोन दिवसापासून अवतीभोवती पाणी आणि बोटी दिसत होत्या त्यामुळे पाण्याची भीती कमी झाली होती . हेलकावे खात फेरी पुढे निघाली की पाण्याची तयार होणारी वर्तुळे , पाठीमागे फेसाळत तयार होणारी रेषा , फेरीवर येऊन आदळणारी लाट पाहत कसे दिडदोन तास गेले समजले नाही . 





फेरी बंदराला लागली तेव्हा आकरा वाजून गेले होते . त्याठिकाणी आमचा माणूस गाडी घेऊन तयारच होता . आमचे रिसॉर्ट स्कुबाच्या बीचच्या काठावर होते त्यामुळे मुलांना अत्यानंद झाला . 80% लाकडी असलेल्या कौलारु रिसॉर्टमध्ये आम्ही बीचवर राहणार होतो म्हणजे केव्हाही मनात आलं की समुद्रकाठी आम्ही जाऊन बसणार होतो . 



आज आम्ही दोन वाजता राधानगर बीचवर जाणार होतो दोन तास आमच्याकडे होते आम्ही समान ठेवलं , चहा घेतला आणि रिसॉर्टच्या पाठीमागे बीचवर गेलो . तिथे रेतीत विविध आकाराचे शंख दिसत होते . शंख उचलून हातात घेतला की पटकन आतून शंखाच्या आकाराचे आणि त्याच रंगाचे किडे बाहेर यायचे , बराचवेळ सगळेजण त्यात रमले . अनेक फांद्या असलेली विशिष्ट प्रकारची झाडे पाण्यात होती . त्यामुळे पाण्यातल्या झाडावर उभे राहून विविध पोजमधली फोटोग्राफी झाली . दिडला रिसॉर्टवर आलो अर्धा तास आराम करुन आम्ही राधानगर बीचवर गेलो . 

याठिकाणी सनसेट दिसणार होता दुपारचे दोन वाजले होते सुर्य तळपत होता पण त्याचा त्रास काही जाणवत नव्हता . बीचवर विविध आकारांचे हट्स होते . लाकडी जिने , लकडाचे ओंडके असे बसायला किंवा फोटो काढायला खूप छान बॅकग्राउंड होते त्यामुळे आशिष त्याच्याबरोबर आकांक्षा , कीर्ती , केतकी आगदी चेकळले होते . समुद्रात डुंबण्याचा आनंद तर सगळ्यांनीच लुटला . समुद्राचे पाणी , पांढरी वाळू आणि बीचवरील झाडी असा लपंडाव सगळे खेळत होते . चार वाजले तसे सगळ्यांना सनसेटचे वेध लागले . आणि साडेचार वाजले की तळपणारा सुर्य मात्र ढगाआड लपू लागला त्यामुळे सगळ्यांनाच सनसेट पाहायला मिळणार नाही याची हुरहूर लागू लागली . पाच वाजता स्वच्छ सुर्य काही दिसला नाही पण मावळतीच्या दिशेला दिसणाऱ्या रक्तीमासुद्धा खूपच मोहक दिसत होत्या . तोही एकप्रकारचा विलक्षण आनंद झाला . त्यातील फोटोग्राफी झाली आणि दहा पंधरा मिनिटात तर आंधार गुडूप झाला .





 आम्ही रेसोर्टवर परत आलो तिथल्या लोकांच्या मते आम्ही प्युअर व्हेजीटीरीयन असल्यामुळे खाण्याचा फारसा आनंद घेऊ शकत नाही असे होते . पण आम्हाला त्याचे काही वाटत नव्हते . पनीरचे फार तर चायनीजचे वेगवेगळे प्रकार खाऊन आम्ही खूष असत होतो . उद्या सकाळी सर्वात मोठ आकर्षण असलेले स्कुबा डायव्हिंग आणि सर्वात सुंदर अशा एलेफंट बीचवर आम्ही उद्या जाणार होतो . एलेफंट बीच हेही एक खास आकर्षण होते . गेल्या वर्षीपासून पन्नासपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना स्कुबा करण्यास मनाई होती त्यामुळे माझा मूड गेला होता पण मुले मात्र खूप एक्साईटेड होती . ज्यांना स्कुबा करायचे आहे त्यांनी वयाच्या पन्नाशी पूर्वी प्लॅन करावा तसेच फार लहान मुलांना नेण्यापेक्षा ती कळती झाल्यावर ट्रिप करावी म्हणजे परिपूर्ण ट्रिप होऊ शकते तसेच ग्रुपने मजा येते त्यामुळे दोन फॅमिली असल्यास आनंद द्विगुणित होतो .

स्कुबासाठी सकाळी सहाच्या बॅचचे रजिस्ट्रेशन झाले होते रिसॉर्टच्या पाठीमागेच जायचे होते पण उत्साहात मुलांचे पाचपासून गुड मॉर्निंगचे मेसेज येत होते . आम्ही पण लवकर उठलो सगळेजण पावणेसहा वाजता बीचवर पोहोचलो . आधी फॉर्म भरणे , कपडे चेंज करणे सगळ्या गोष्टी होईस्तोवर पाऊसच सुरु झाला आभाळ गच्च भरुन आलं पण त्याचा काही परिणाम होत नसल्याचे समजले . अत्यंत आनंदात मुले उड्या मारत स्कुबासाठी गेली आम्ही बीचवर बसून पावसातले समुद्राचे सौंदर्य न्यहाळत बसलो आमच्यासारखे बरेचसे पालक तिथे होते थोडीशी हुरहूर प्रत्येकाच्या मनात होतीच . आकांक्षाला पाण्यात पोहायला , खेळायला खूप आवडते तर आशिषपण यासाठी आतुर होता . आशिष कीर्तीचे न्युझीलंडमध्ये बारा हजार फुटावरून स्काय डायव्हिंग झाले होते आता हा अनुभव घ्यायचा होता . केतकी पाण्याला घाबरत होती पण सगळ्यांबरोबर हिम्मत करत होती .

त्यांचा ड्रेस , पाठीवर ऑक्सीजन घेऊन बोटीतून मुले समुद्रात गेली बरच वेळ त्यांचे ट्रेनिंग सुरू होते . आम्ही चहा पीत इकडे तिकडे हिंडत त्यांची वाट पाहत होतो . काळेभोर ढग आणि कोसळणारा पाऊस पाहून अनामिक भीती वाटत होती . बोटीतून समुद्रात मुलांनी उद्या घेतल्यापासून अर्ध्या तासाने ती परत येताना दिसली . उड्या मारत आनंदाने आरडाओरडा करत ते वर आले , अनुभव सांगू लागले खाली पाऊस आहे की नाही काहीच समजले नाही म्हणाली . जवळजवळ चाळीस फूट खोल त्यांना नेलेले होते एका नवख्या युगात ते चक्कर मारुन आलेले होते सगळे फोटो व्हिडिओ मिळणार होते . प्रत्यकाचे अनुभव ऐकताना मजा येत होती आता पाऊस पण थांबला होता .

रिसॉर्ट वर आलो फार गडबड नव्हती जायची फार गडबड नव्हती थोडा आराम केला , नाष्टा केला आणि एलिफंट बीचसाठी तयार झालो सगळेच पिकनिकच्या मूडमध्ये होतो , बरोबर तरुणाई होती त्यामुळे अखंड ट्रिप म्हणजे खळाळता धबधबा सोबत आहे असे वाटत होते . आकरा वाजता आम्ही बंदरावर आलो तर तिथे अनेक वॉटर गेम्स त्यांनी आम्हाला सांगितले आम्ही सगळ्यांनी ग्लास बोटिंग आणि मी स्नाॅर्कलिंग करायचे ठरवले आणि बोटीने बीचवर आलो . याठिकाणी सगळे पर्यटक आणि अनेक गेम्स असल्यामुळे थोडी गर्दी वाटली पण बीचचे सौंदर्य वाखाणण्याजोगेच ! वेगवेगळ्या फळांच्या फ्रूट प्लेट्स आणि चाटचे स्टॉल खाचखच भरलेले होते . आम्ही एकत्र बसून काही खाल्ले नाही ज्याला जेव्हा जे खावेसे वाटते ते त्यांनी घेऊन खावं असे ठरवले आणि जेवढे प्रकार होते ते सगळे प्रत्येकाने आळीपाळीने घेतले आणि सगळ्यांनी टेस्ट केले . आता गेम्स होते मी पहिल्यांदा स्नाॅर्कलिंग केले असा भन्नाट अनुभव आला आहाहा ! आपण शोपिस म्हणून रंगीबेरंगी मासे काचेमध्ये पाण्यात बंदिस्त करून ठेवतो तसे विविध रंगी , विविध आकाराचे मासे आगदी थव्याने आपल्याला स्पर्श करुन जातात असा  भारी अनुभव होता तो . पाण्याखाली असलेल्या , किनाऱ्यालगतच्या वेगवेगळ्या वनस्पती , त्यांची घरटी अशी मस्त सफर ते आपल्याला सफाईदारपणे घडवून आणतात . ते करत असताना तिथले स्थानिक समुद्री विश्वाचे , निसर्गाचे आपल्या लेकराप्रमाणे संवर्धन करताना दिसतात . कशालाही धक्का पोहोचणार नाही याची खूप काळजी घेतात म्हणून आज ते सौंदर्य आहे तसे टिकून आहे . स्कुबा करता आले नाही तरी स्नाॅर्कलिंग केल्यामुळे माझी हौस फिटली होती मला पण आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या .  यानंतर आम्ही सगळेजण ग्लास बोटिंगसाठी बसलो यामध्ये बोटीत मधे मोठी दुर्बीण असते आणि कडेनी गोलाकार बसायला व्यवस्था असते . बोट थोडी पाण्यात गेली की खोलवर असलेले मासे , वनस्पती , जलचर आपल्याला अगदी काचेजवळ असल्यासारखे दिसते ती सफर पण खूप आनंद देऊन जाते . गेम्स झाल्यानंतर आम्ही बराच वेळ बीचवर वाळूत , पाण्यात झाडीत असे फेरफटके मारत होतो फोटो काढत होतो . साडेतीन वाजता तो बीच बंद करतात सव्वातीन वाजल्यापासून स्पिकरवर त्याप्रमाणे सूचना दिल्या जातात त्याप्रमाणे आख्खी दुपार आम्ही त्या बीचवर घालवली आणि साडेचारला रेसॉर्टवर परत आलो 



रोज वेगळाच बीच , रोज वेगळाच पॉइंट , वेगळेच ठिकाण आणि त्यामुळे येणारी मजा रोज वेगळाच अनुभव देऊन गेली . समुद्र तोच , निसर्ग तोच पण अनुभूती मात्र रोज वेगळी आली . ना प्रवसाचा थकवा जाणवला , ना आपल्या दैनंदिन जीवनाची आठवण . मस्तपैकी सहा दिवस कसे गेले समजले नाही आणखी राहायला मिळालं तर बरं तेच सौंदर्य रोज नव्याने न्याहळावे असे वाटत होते . बोटी पासून क्रुझ पर्यंत सगळ्या जलप्रवसाची हौस याठिकाणी फिटते . आता हुरहूर लागली होती पण तृप्ती होती . आता परतीचे वेध लागले , सगळ्यांच्या रजा सुट्ट्या संपत आल्या होत्या . खूप फोटोग्राफी केली पण अफाट निसर्ग तो कसा कैद होईल शक्य तेवढा नजरेत साठवून परत निघालो . ही माझी पहिली ट्रिप आहे की ज्याठिकाणी मी काहीही खरेदी केली नाही ( पोवळे सोडता ) . अंदमान हे निसर्गाने भारताला बहाल केलेलं एक सुंदर कोंदण आहे म्हणायला हरकत नाही . त्याची जपणूक तिथले स्थानिक ज्याप्रमाणे करतात त्याचप्रमाणे पर्यटक म्हणून आपण करणे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते तितकेच महत्त्वाचे आहे .












.



Thursday, September 29, 2022

बँक कल्क्चरल

 


कॉम्रेड्स

लाल सलाम !

मी कॉ. सरिता कुलकर्णी 

संघटनेच्या विविध कार्यक्रमानिमित्त आपण भेटत असतो . सातत्याने आपल्याला दर्जेदार कार्यक्रम देण्याचा संघटनेचा प्रयत्न असतो . वेध सारखे कार्यक्रम असतील , व्याख्यानमाला असतील , सामाजिक कृतज्ञता व्यक्त करणे असो , आजच्यासारखे अधिवेशन असो किंवा संघटनेचा कोणताही उपक्रम असो . आपल्यासमोर वेगवेगळी नामवंत व्यक्तिमत्वे अनफोल्ड होत असताना आपण पाहिली आहेत , ती प्रयत्न पूर्वक केली जातात . ती करत असताना महत्वाची भूमिका बजावणारे , ज्यांच्याकडे अनेक पैलू आहेत अशी दोन व्यक्तिमत्वे सतत आपल्याभोवती वावरत आहेत . या लोकांचे आपल्या आवती भोवती असणे हेच आपल्यावर पण खूप मोठे संस्कार करते . साहित्य , कला , चळवळ , सामाजिक भान असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या दोन व्यक्तींची जडणघडण कशी झाली हे जाणून घेणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .आजच्या या कार्यक्रमाचे नाव आहे 

" सृजनवेध " 

सृजनवेध या कार्यक्रमांतर्गत 

" माझी बँक माझी युनियन "

हा विषय चर्चेला घेऊन मी आपल सर्वांचं याठिकाणी स्वागत करते . या चर्चेसाठी आपल्या सोबत असणार आहेत अर्थातच बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन औरंगाबाद युनिटचे फौंडर मेंबर असलेले अध्यक्ष कॉ. देविदास तुळजापूरकर आणि जनरल सेक्रेटरी कॉ . धनंजय कुलकर्णी !

आजचा हा कार्यक्रम आपण तीन टप्प्यात घेणारं आहोत . पहिल्या टप्प्यात संघटनेचे प्रतिनिधी म्हणून या दोघानाही काही प्रश्न विचारले जातील . समोर बसलेल्या आपल्या सर्व सभासदांना विशेषतः तरुणाईला याची उत्तरे ऐकण्याची खूप उत्सुकता आहे . दुसरा टप्पा हा रॅपिड फायरचा असणार आहे आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यात संघटनेसाठी महत्वाची कामगिरी बजावलेल्या अशा दोन व्यक्तींशी फोनवर संपर्क साधला जाणार आहे की त्या आज हयात नाहीत चला तर आपण सुरुवात करूयात .

पहिल्या टप्प्याला 

सुरुवातीला कॉ. तुळजापूरकर यांच्याकडे आपण वळूयात .

1 ) सर , आपण बँकेत जवळजवळ चार दशकांची सेवा पूर्ण करुन आता निवृत्त झाला आहात . खरतर चळवळीत काम करण्याची सुरुवात आपली शालेय जीवनात झाली आहे . कॉलेज जीवनातही आपला विशिष्ठ ग्रुप होता . बँकेत नोकरी लागल्यावर सुरुवातीपासून आपण संघटनेत काम करत आहात . तुमच्याबरोबरची एक पिढी रिटायर होऊन गेली आता बँकेत यंग जनरेशन आलेलं आहे त्यांच्यासाठी आपण ऊर्जास्रोत आहात त्यांचे प्रेरणास्थान आहात .

औरंगाबाद युनिट , फेडरेशन , एमएसबीएफ , aibea मधे ऑल इंडिया लेव्हल आपण वेगवेगळ्या पदावर मोलाची कामगिरी करत आहात . बँकेच्या संचालक पदावर पण तुम्ही काम केलेले आहे .  इतक्या सर्व पातळ्यावर काम करत असताना तुमची सुरुवात नक्की कशी झाली . एकूणच तुमची लहानपणापासूनची पार्श्वभूमी ऐकायला आम्हाला आवडेल .

आस म्हटल जात की माझे प्रश्न बाजूला राहिले तरी चालतील पण पाहिले बँक ऑफ महाराष्ट्र महत्वाची या भूमिकेतून आपली वाटचाल राहिली . तर  कला , साहित्य , संघटना इतक्या सर्व पातळ्यावर काम करत असताना तुमची सुरुवात नक्की कशी झाली . एकूणच तुमची लहानपणापासूनची पार्श्वभूमी ऐकायला आम्हाला आवडेल .

2)आम्हाला AIBEA विषयी थोडंसं ऐकायला आवडेल , संघटना कार्यात आपल्याला सर्वाधिक प्रभावित करणारे नेतृत्व कोणते ?

3 ) अर्ध शतकाच्या बँकिंग क्षेत्राच्या वाटचालीबाबत आपण काय सांगाल .

4 ) असे म्हणतात की एकेकाळी अग्रेसिव असणारी AIBEA ही आजकाल कुठेतरी डिफेन्सीव्ह पोझिशनला आल्यासारखी वाटते याबाबत आपले काय म्हणणं आहे .

5 ) सध्या बँकिंग क्षेत्रात कळीचा मुद्दा उरम्हणजे थकीत / बुडीत कर्जे त्यानुषंगाने सातत्याने चर्चेत येणारा विषय म्हणजे बँकांचे खाजगीकरण . हा संघर्ष संघटना म्हणून मोडून काढण्यासाठी होणारे प्रयत्न आणि त्याबाबत नवीन सभासदांची मानसिकता आपल्याला काय वाटते . सध्या विविक्षित उद्योगपतींना सर्व राष्ट्रीयकृत बँकेतून वारेमाप कर्जवाटप सुरू आहे . साध्या अशी शंका किंवा भीती व्यक्त केली जाते की आत्ता असलेल्या बड्या भांडवलदारामधील एखादा उद्योगपती जरी दिवाळखोरीत निघाला तर भारतीय बँकांची अवस्था काय होईल सांगता येणार नाही याबाबत आपले मत काय ?

6 ) आपण MSBEF चे जनरल सेक्रेटरी आहात . महाराष्ट्र राज्य तसे आर्थिक उलाढालीत आग्रेसर आहे . पण संघटनेत संपूर्ण महाराष्ट्रात AIBEA चे पुढारी हे महाराष्ट्र बँकेतील आहेत . इतर बँकेतील कार्यकर्ते एक्सपोज होत नाहीत याचं काय कारण आसवे

7 ) संघर्षाच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र छोटा पॅकेट बडा धमाका आहे असे म्हणतात . आपल्या मते बँक ऑफ महाराष्ट्रातील AIBEA आणि बँकिंग क्षेत्रातील AIBEA संघटनात्मक कृती कशा होतात 

8 ) पूर्वी दरवर्षी एखादे तरी कार्यकर्ता शिबिर होत असे आजकाल असे होताना दिसत नाही . संघटनेला त्याची गरज वाटत नाही का सभासदांमध्ये त्याविषयी उदासीनता जाणवते . याबाबत आपले मत काय .

9 ) व्हिजन ज्याला म्हणतात ते तुमच्याकडे आहे , मला आठवत मी अगदी नवीन असताना 1992/93 मधे बँकाचे कॉम्प्युटरायझेशन याविषयी आपल भाषण ऐकलं होतं . कॉम्प्युटर आपण आपलंसं का करायला हवं याविषयी ठिकठिकाणी आपण भाषणे करत होता ते करत असताना 2010 नंतरचे बँकिंग कसे असेल याचं चित्र उभे करत होतात आणि त्यासाठी आपण कॉम्पुटरायझेशन का आणि कसं आत्मसात केलं पाहिजे आपलंसं केलं पाहिजे याविषयी जागृती करत होतात प्रामुख्याने सिनियर सभासदांना अवगत करत होता . आणि मला आज हे सांगायला आवडेल की आपण 15 वर्षांपुर्वी जे भाकीत केलं होतं ते 2008 नंतर cbs मध्ये अनुभवायला आले . तिच गोष्ट पेन्शन ऑप्शन बाबतीत झाली . तसेच पूर्वी बँकेत नोकरी लागण्यासाठी BSRB ची परीक्षा द्यावी लागे तर त्या परीक्षेपूर्वी आपण संघटनेतर्फे प्रशिक्षण शिबिर आयोजित करत होतो त्यावेळी बार्शीत तुम्ही भाषणात असे म्हणाला होतात की आज बँकेत कर्मचारी बँकेत टेबल खुर्ची डोक्यावर पंखा अशी आरामात नोकरी करताना दिसतो कस्टमर बँकेत येतो हे चित्र भविष्यात दिसणार नाही तुम्हाला कस्टमरकडे जावे लागेल . आणि 20/25 वर्षानंतर हे तंतोतंत सत्यात उतरले आहे . ही काही भविष्यवाणी नाही तर अभ्यास पूर्वक केलेली ही विधाने आहेत तर आपल्या मते येणारे बँकिंग कसे असेल .

10 ) तुमच्या एकूण कारकिर्दीमध्ये दोनवेळा आपल्याला कोर्टकेसचा सामना करावा लागला त्याविषयी थोडसं.

 11 ) संघटनेचे काम करत असताना वैयक्तिक आयुष्यावर त्याचा नक्कीच परिणाम झाला असणार . आत्ताच सांगितलेले सुप्रीम कोर्टातील केससारखे बाके प्रसंग आले . कधी असे वाटले का की मी या लष्कराच्या भाकरी का भाजतो . आपण लिखाण करता , दौरे करता , नोटाबंदीच्या काळात तर तुम्हाला ऐनवेळी टीव्हीवर लाईव्ह जावे लागले मग रजा , वेळ , पैसा या खर्ची गेल्या का काहीवेळेस वैयक्तिक बाबी नाईलाजाने बाजूला ठेवाव्या लागल्या , त्याग करावा लागला याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल .


12) आता या टप्प्यातील शेवटाचा प्रश्न मी आपल्याला विचारते कीआपल्या मते संघटनेचे कामकाज अपेक्षित उंचीपर्यंत गेले आहे का गेले नसल्यास कार्यकर्ता म्हणून आपण काय करण्यात कमी पडलो आणि सामान्य सभासदांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही का नसल्यास त्यात काय सुधारणा व्हायला हवी . इथे असणाऱ्या सभासदांना काय सांगू इच्छिता .


कॉ. धनंजय कुलकर्णी


1 ) आपणही औरंगाबाद युनिटच्या फौंडर मेंबर्सपैकी आपण एक आहात . पूर्वीपासून आपल्या जोडीला राम-लक्ष्मण म्हणले जाते . सुरुवातीच्या काळात तिकडून कॉ. तुळजापूरकर पुण्याला जाणार असे समजले की आपण लातूरहून पुण्याला जात असत . त्याचबरोबर कॉ. प्रभाकर यादव हे पण आपल्याला गुरुस्थानी होते . महबँक फेडरेशन असो किंवा युनायटेड फोरम ऑफ महाबँक असो , पद कोणतेही असो पण एकूणच संघटनात्मक कृतीचा मास्टर माईंड आपण आहात हे सर्वजण जाणतात . सर्वांचा समन्वय साधत अनेक तोडगे काढण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे . आपली जडणघडण आणि संघटनेतील कारकीर्द त्याची सुरुवात , प्रेरणा किंवा आपण संघटनेत स्वतःला झोकून द्यावे असे का वाटले प्रमोशन घेऊन वरच्या पोस्टवर जावे असे कधी वाटले का किंवा गेलो नाही याचे शल्य कधी बोचले का .

2 ) आपण जवळजवळ तीन दिवस कॉ. डी पी छड्डा यांची मुलाखत घेत होतात . कॉ. छड्डा , कॉ. तारकेश्वर चक्रवर्ती , कॉ. सुरेश धोपेश्वरकर आणि आता कॉ. सी एच व्यांकटाचलन या लोकांच्या जवळून संपर्कात आलात तर या जुन्या नेत्याविषयी आपल्याकडून थोडंसं जाणून घ्यायला आवडेल . रसिकतेचा वारसा कोणत्या संघटना नेत्याचा अनुकरणीय वाटतो ? 

3 ) आज आपल्याकडे कॉ. धोपेश्र्वरकर उपस्थित आहेत . कामगार संघटना म्हणजे राजकीय शिक्षण देणारी शाळा आहे असे म्हटले जाते प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही . याबाबत आपले मत काय आहे .

4 ) पूर्वीचे प्रश्न वेगळे होते संघर्ष करुन आपण सेवाशर्ती आपल्याला हव्या तशा मिळवल्या त्यात जुन्या पिढीच योगदान आहे . पण आता संघटनेसमोर प्रश्न नाहीत असे नाही उलट गंभीर प्रश्न आहेत . त्यासाठी हत्यारे पण बदलावी लागतील . याबाबत नवीन पिढी थोडी गाफील आहे असे आपल्याला वाटते का ?

5 ) वास्तविकपणे बँक कर्मचारी मीडल क्लास आहे व्होकल क्लास आहे . तरीपण बँक कर्मचारी संघटना बहुतांशी अर्थवदामध्ये गुंतल्या आहेत त्यांच्या सामाजिक जाणीवा रुंदावल्या नाहीत याबाबत आपले मत काय आहे .

6 ) असे म्हणले जाते की सर्वजण संघटनेचे सभासद होतात पण मानसिक दृष्ट्या कर्मचारी डीयुनियनाईज होताना दिसतोय . हे खर आहे का असल्यास त्याची कारणे आणि उपाय काय सांगाल . तसेच सर्वसाधारण निवृत्ती आणि संघटना नेत्याची निवृत्ती यात फरक काय ?

7 ) संघटनेने सभासदांसमोर सातत्याने काही ना काही कार्यक्रम ठेवणे अपेक्षित आहे , सामाजिक सहली नेल्या पाहिजेत पण तसे होताना दिसत नाही याबाबत आपण काय म्हणाल 

8 ) आपण महिला आणि युवा सभासदाविषयी विशेष जागरुक आहात . बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची 1980 ते 2022 या कालावधीतील संघटनेप्रती काय मानसिकता जाणवते . काळानुरूप त्यात काय बदल अपेक्षित आहे .

9 ) संघटनेचे कामकाज करत असताना पत्रव्यवहार , फोन आणि आता गुगल मिट ,व्हॉट्सॲप ही माध्यमे आपण वापरली . नवीन साधन आपण आत्मसात केली तर ही नवीन पिढी त्यासह जन्माला आली . आपण मुलांना न्यूजपेपर वाचता का आस विचारलं तर त्यांचं उत्तर पेपर वाचला नाही पण न्यूज माहित आहेत असे असते . आशा प्रकारची ही पिढी आहे तर कार्यकर्ता म्हणून तुम्ही आणि सभासद म्हणून या मुलांनी ताळमेळ कसा घालता त्यात अजून काय बदल व्हावेत याबाबत तुमचं काय मत आहे ?

10 ) " गांधी मला भेटला " आणि काय कानमंत्र मिळाला  आणि

 "सगळी कामं बिनचूक व्हायला हवीत " ते

 " ठीक आहे काही चुका क्षम्य "

 हा प्रवास कसा झाला 

 11 ) असे म्हटले जाते की रुट लेव्हलच्या कर्मचाऱ्यापर्यंत आपली नाळ जोडलेली आहे . बरेचसे वैयक्तिक प्रश्न आपल्याला माहीत असतात . बऱ्याचदा सलग दोन दिवस फोन किंवा मेसेज झाला तर आपण वेगवेगळ्या शहरात असता . वैयक्तिक बाबी थोड्या बाजूला ठेवाव्या लागल्या , कधी तब्ब्येत त्रास देते यावेळी नक्कीच घरातून या धावपळीच्या जीवनशैलीला विरोध होत असणार तर कुटुंब आणि संघटना यात आपण कसा समन्वय साधता .

12) मी आपल्यालाही शेवटाचा प्रश्न हाच विचारू इच्छितो की आपल्या मते संघटनेचे कामकाज अपेक्षित उंचीपर्यंत गेले आहे का गेले नसल्यास कार्यकर्ता म्हणून आपण काय करण्यात कमी पडलात आणि सामान्य सभासदांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही का नसल्यास त्यात काय सुधारणा व्हायला हवी . आणि इथे आसलेल्या सभासदांना काय सांगू इच्छिता


दुसरा टप्पा

रॅपिड फायर 

याठिकाणी आपण दोघानाही काही प्रश्न विचारणार आहोत त्यासाठी दोन पर्याय दिले जातील त्यापैकी त्यांनी एक उत्तर निवडायचे आहे .

कॉ. देविदास तुळजापूरकर

1 तुमच्यासाठी अधिक मार्गदर्शक बाजू कोणती कला आणि साहित्य की संघटनेतील संघर्ष ?

2 आवडते कार्यक्षेत्र कोणते औरंगाबाद की 

पुणे-मुंबई

3

4

5 खूप राग येतो तेव्हा मी 


कॉ. धनंजय कुलकर्णी

1 संघटना कार्यात कोणता नेता अधिक अनाकलनीय वाटला 

कॉ. प्रभाकर यादव का कॉ. तुळजापूरकर

2 रसिकतेचा वारसा कोणत्या संघटना नेत्याचा अनुकरणीय वाटतो ? 

3

4

5 गांधी मला भेटला आणि काय कानमंत्र दिला 


आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत .संघटनेतील तुमच्या आयुष्यातून अचानकपणे निघून गेलेली व्यक्ती आहेत की ज्याच्याशी तुम्हाला खूप चर्चा करायची होती ती राहून गेली तर त्यांना आता डायरेक्ट फोन लागणार आहे .

1 ) कॉ. धनंजय कुलकर्णी

कॉ. नंदू दिवाण

2 देविदास तुळजापूरकर.   

कॉ. प्रभाकर यादव

समारोप :-   













Tuesday, September 27, 2022

Aaku

 कु. आकांक्षा

गोड गोड आशीर्वाद

सर्वप्रथम तुला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !

आग कित्ती भन्नाट उपक्रम राबवला तू !

या चंदेरी दुनियेत फेमस होण्यासाठी लोक जंग जंग पछाडतात तुला एक कल्पना सुचली आणि याआधी कधीही न झालेला एक उपक्रम करायचे  तू अचानकपणे ठरवले , प्रत्यक्षात राबवला आणि तो इतक्या सुंदर प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला ! अर्थात यात तुला असलेली कीर्तीची साथ ही मोलाची होती तसेच आशिषचे सहकार्य यामुळे  तुझा प्रकल्प पूर्ण झाला .

 तू नवरात्रीचे नऊ रंग दाखवत नऊ दुर्गा दाखवल्यास आणि त्यातली प्रत्येक दुर्गा मला तुझ्यात दिसली बस्स .

मस्तच ! 

तुझ्यात ते टॅलेंट आहे पाहू भविष्यात कसं कसं होते हे येणारा काळच ठरवेल . पण आपली काही तत्व मनाशी पक्की करुन या क्षेत्रात काही काम करायला हरकत नाही .





Wednesday, September 7, 2022

सोन्यासारख्या दसरा

 सोन्यासारखा दसरा

परवाच गौरी गणपती झाले आणि आता नवरात्र दसरा आला . आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सणाचे खास असे वैशिष्ठ्य आहे . दर पंचवीस वर्षांनी पिढी बदलते म्हणतात आता तर ट्वेंटी-ट्वेंटीचा जमाना आहे . त्यामुळे पिढी बदलाचा कालावधी पण पाच वर्षाचा झाला म्हणायला हरकत नाही . 

माझं बालपण तसं वाडा संस्कृतीत गेलं . आता सर्रास बंगला फ्लॅट संस्कृती आहे त्यामुळे प्रत्येक सणाच्या , प्रसंगाच्या खास अशा आठवणी आहेत . प्रसंगानुरूप एखादी सुगंधी कुपी उघडावी आशा त्या भासतात . असाच एक दसऱ्याचा सोहळा !!

    घेरडी गाव बारा बलुतेदारांचा !

प्रत्येकाची कामे , सणवार , रीतिरिवाज ठरलेले असत . घेरडीत कुलकर्णी , पाटील , धनगर , सनगर जरा  जास्त आहेत तिथले पाटील हे मुसलमान  आहेत . पण सगळे गुण्या गोविंदाने राहतात धनगर समाजाची घेरडी गावाच्या चोहो बाजूंनी शेती व वाड्या वस्त्या आहेत . त्यांच्याकडे घरटी एक तरी मुलगा मुंबईला गोदीमध्ये कामाला आहे त्यामुळे घेरडीचे धनगर लोक सधन आहेत . त्यामुळेच गणपतराव देशमुखांच्या प्रयत्नांनी पंचेचाळीस वर्षांपुर्वी

" घेरडी - मुंबई "

गाडी सुरु झाली आजही छोट्याशा खेड्यातून डायरेक्ट मुंबई गाडी  मोठ्या दिमाखात चालू आहे . घेरडीत सगळ्याच सणाचे , उत्सवाचे विशेष वैशिष्ठ्य आहे त्याचप्रमाणे  दसऱ्याचं पण खूप प्रस्थ आहे . बदामीची देवी हे आम्हा कुलकर्ण्यांचे कुलदैवत , त्यामुळे वाड्यात पण नवरात्र आणि दसरा मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो .  

     तशी तर दसऱ्याची पुर्वतयारी पक्ष पंधरवड्यात सुरु केली जाई . नवरात्र बसण्यापुर्वी वाड्याच्या आसपासचा परिसर गवत काढून साफ करुन घेतला जाई . गावात एक मुकी होती ती आशी कामे करुन तिचे पोट भागवायची . तीला ऐकायला बोलायला येत नव्हते तरी पण अशा कामाच्या वेळी बरोबर हजर असायची . तिला पैशात रोजगार द्यायचा आणि दिवसभर आपल्याबरोबर चहा , नाष्टा , जेवण सगळं तिला आई द्यायची . इतर वेळी सुद्धा कधीकधी तिला काम नसले की तिच्याकडे पैसे , नसायचे मग बरोबर घरी यायची . उगाचच मागचे दार , परसदार साफ करायची.  आई ओळखायची आज हीच्याकडे पैसे नाहीत लगेच तिला चहा द्यायचा व काही छोटंमोठं काम सांगायची आणि जेवण करुन जा म्हणायची . तीला खूप आनंद व्हायचा . नवरात्र बसायच्या आधी ती वाड्याभोवतीचा परिसर स्वच्छ करुन जायची . घरोघरी साफसफाई , घरे सारवणे , रंग देणे अशी कामे व्हायची अशा कामात वाड्यात सगळ्यांच्या घरी नीलाबाईला हाताशी धरले जाई . 

नवरात्र सुरु झाल्या दिवसापासून रोज सकाळी साडेसातला गावात देवीचे गोंधळी होते , ते त्यांच्या खास पोशाखात , कपाळावर कुंकवाचे ठसठशीत पट्टे ओढून , गळ्यात कवड्यांची माळ घालून देवीचे भोपी होऊन पहाडी आवाजात देवीची गाणी म्हणत घरोघरी जात असत . साथीला खणखणीत संबळ आणि दिमडी वाजवत वाड्यात प्रत्येकाच्या दारासमोर गाणी म्हणत वातावरण भारावून टाकत असत . वाड्यातील सगळे लोक आंगणात येऊन ते ऐकत असत . हा कार्यक्रम नऊ दिवस रोज होत असे .

नवरात्रात बायकांचे भाजणीचे उपास आसत , मग भाजणीची पिठे दळली जायची तर रोजच्या  नैवेद्यासाठी डाळ आणि गहू भाजून पीठ दळले जाई . ते दूध-गुळात कालवून रोज त्याचा नैवेद्य केला जाई . फार खमंग चव असे त्याची . नऊ दिवस देवापुढे दिवा तर सुरुवातीला खारीक खोबरे दोऱ्यात ओवून मंडपीला बांधून ती मंडपी देवघरावर सोडली जायची . रोज धोंडी आप्पा फुले माळ देत आसत . पूजा झाली की गळ्यात कवड्याची माळ घालून दिवटीवर तेल घालून ती पेटवायची व त्या दिवटीने काका आरती करायचे . हे सगळ होत असताना सात्विक भाव असे . धूप , दीप , उदबत्ती याचा सुगंध घरात दरवळे . क्षणभर मंदिरातील गाभाऱ्यात आहोत की काय असा भास होई . स्वच्छ्ता , सात्विकता यांनी वातावरण भारावलेले असे त्यामुळे यादरम्यान काका 

 " गुरुचरित्राचे पारायण "

करत असत . पाचव्या माळेला आई , प्रभा काकू , मावशी , आमच्या काकू , उषा वहिनी , पिलू वहिनी , शांता वहिनी सगळ्या मिळून भावकी सोडून इतर पाच घरी जोगवा मागायला जायच्या . त्यात माई मावशीच्या मळ्यात , डोंगऱ्याची दोन घरे , विठू देशपांडे , देशपांडे वहिनी , महाजन वहिनी अशी घरे ठरलेली असत . सकाळी साडेनऊला जाऊ असां ठरलेला निरोप रमा काकू , वरलीकडच्या उषा काकीना गेलेला असे . गावाबाहेर ओढ्याच्या वर गेलं की माई मावशींचा मळा होता , मग सगळेच बरोबर त्यावेळेत त्यांच्या मळ्यात हजर व्हायचे . तिथे छाया ताई अंगणात मोठी सतरंजी टाकून वाट पाहत थांबलेली असायची . आम्ही मुली पण बायकांच्या मागेमागे जायचो तिथे खास आदरातिथ्य , आगत्य होत आसे . मळ्यात गच्च भरलेली चिरेबंदी विहीर होती . त्या विहिरीचं पाणी घराजवळ असलेल्या पाटातून सगळ्या मळ्यात वाहत जात असे . मळ्यात देशी केळीची बाग , विड्याच्या पानाचा मळा , विविध रंगी फुलझाडे होती . खास करून पिवळ्या धम्मक फुटण्याच्या फुलांनी झाड बहरलेले असे . एकमेकींना बसण्याचा आग्रह होई मग देवीची जोगव्याची गाणी म्हणली जायची आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चढाओढीत उखाणे घ्यायचे . गप्पागोष्टी , हास्य कल्लोळ होत असे . छोटीशी पण चविष्ट अशी देशी केळी , दूध  सगळ्यांना दिले जायचे

दोन तास कसे जायचे समजत नसे . येताना मग बायका नवरात्रात नाविन ब्लाऊज , बांगड्या घालायचं म्हणून हसन पाठणाकडे महिन्यापूर्वी टाकलेलं ब्लाऊज 

" झालं का बाबा " 

म्हणत डोकावायच्या तर हमखास ते झालेले नसे " आज दुपारी नक्की पाठवतो काकी "

असे तो सांगे 

" आज नाही दिलेस तर पुन्हा तुझ्याकडे टाकणार नाही बघ " 

असा नेहमीप्रमाणे लटकेच रागवून बायका निघायच्या .

पुढे वाड्यालगत असलेल्या मणेऱ्याच्या गल्लीत मालन , प्यारन , शहाजानची बायको अशा ठरलेल्या बांगडेवाल्याकडे सगळ्याजणी बांगड्या भरत असत . असा तो त्या दिवसाचा सकाळचा सोहळाच असे .

जोगव्यात भाजणीची मिक्स पिठे येत आसत मग त्या मिक्स झालेल्या पिठात ताक घालून आई त्याची थालीपिठं करत असे ती फार खमंग लागायची . सात दिवस झाले की अष्टमीला कडकण्या करायच्या , जवळचे देवीचे ठाणे म्हणून अष्टमीला बनाळीच्या देवीला  कडकण्याचा नैवेद्य , खणा-नारळाची ओटी घेऊन जायचं . यासाठी उषा वहिनी , शांता वहिनी , पिलू वहिनी हमखास निघत , मग त्यांच्याबरोबर आम्ही मुली निघायचो , आई क्वचित यायची . सकाळी सातला बनाळीला जायला जत-घेरडी गाडी असायची , पहाटे उठून सगळ आवरून आम्ही निघायचो . खरं तर बनाळी हे आईच आजोळ , त्यामुळे तिथे गेलो की पहिल्यांदा आम्ही आईचे मामा म्हणजे शंकर मामांकडे जायचो , अष्टमीदिवाशी त्यांचं घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं असे . घरी थोडा वेळ थांबून आम्ही सगळे बनात जायचो , तिथे देवीची यात्रा भरलेली असे . बनात चिरेबंदी दगडाचे देवीचे मंदिर आहे . त्या परिसरात दोन तीन मोठाल्या चिरेबंदी विहिरी आहेत , त्यावर रहाट बसवलेले आहेत , विहिरीत कासव आणि मासे असल्यामुळे पिण्यायोग्य स्वच्छ पाणी असे . उन्हाळ्यात गावातील सगळ्या विहिरी कोरड्या पडत , पण बनातल्या बारवेचं पाणी कधी आटत नसे . देवळासमोरच्या विहिरीत कमळाची फुले असायची . रहाट फिरताना विशिष्ट लयीत येणारा आवाज ,  विविध प्रकारची फळा फुलांची झाडे , मोर , विविध रंगी पक्षी असा खूप निसर्गरम्य परिसर आहे तो . बनात केवड्याची पण झाडे आहेत . केवड्याच्या झाडाखाली नाग असतो म्हणून तिकडे सहसा कोणाला फिरकू देत नसत . पण केवड्याची पिवळी धम्मक कणसे मात्र तिथे मिळत आसत . आख्ख कणीस विकत घेऊन त्याची पाने घरोघरी बायकांना दिली जायची . बायका पण त्याची विशिष्ठ प्रकारे घडी घालून पिनेतूने वेणीत किंवा अंबड्यावर घालत असत खूप सुगंध दरवळे त्याचा . खूप गर्दीतून सगळ्यांनी एकत्र राहून देवीचे दर्शन घेऊन परत गाडीच्या वेळेपर्यंत शंकर मामांच्या घरी थांबायचो . देवीला आलेले भरपूर पाहुणे घरी येतात म्हणून मामींनी मोठ्या पातेल्यात भगर , आमटी ,खिचडी केलेली असे . प्रत्येकाने आपल्याबरोबर फराळाचं काहीतरी , फळे आणलेली असायची . लीला मावशी , सुमा मावशी , सुंता मामी आलेल्या सगळ्यांना केळीच्या पानावर फराळ वाढायच्या . हरी मामा , विद्या मामी ,  मुरला मामा , शामा मामी  पुण्याहून आलेले असत . आईचे एक ब्रम्हचारी मामा होते त्यांना इसू मामा म्हणत त्यांच्याकडे एक घड्याळ होते

 " हे शंभर वर्षांपूर्वीचे घड्याळ आहे "

असे ते सांगत असत . कुलुपे , दिवे अजून  बऱ्याच जुन्या वस्तू त्यांच्या ट्रंकेत असत . आम्ही मुले गोलाकार बसून त्या पाहण्याची मजा घ्यायचो . विशेष करून पपीच्या म्हणजे त्यांच्या भाचीच्या मुली म्हणून आमचा लाड जास्त होत असे . या मामाकडे गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जायच्या त्याचे साचे , वेगवेगळे रंग , ब्रश असे बरेच साहित्य त्यांच्याकडे असे .

    डिकसळ , बनाळी आणि घेरडी या तीन गावात सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते . जवळजवळ सगळ्यांच्या त्याठिकाणी गाठीभेटी होत असत मग भरभरून गप्पांना उधाण येतं असे . प्रत्येकाने बरोबर काहीतरी फराळाचं आणलेलं असे केळी , रताळी बाकी फळांनी टोपली भरलेली असे . पका मामाचे निर्जळी उपवास असत . शेवटचे तीन दिवस तो फक्त नारळाचे दूध घेत असे . पाच वाजले की सगळे परत घेरडीला यायला निघायचे सकाळचीच गाडी पुन्हा मुक्कामाला घेरडीला येत असे त्यांनी आम्ही परत यायचो . येईस्तोवर संध्याकाळ होई . दुसरे दिवशी नवमी किंवा दासरा असायचा .

" दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा "

या उक्तीप्रमाणे आमच्या गावचा दसरा होत असे . वाड्यात आमच्या घरासमोरच्या आंगणात मधल्या मोठ्या आंगणातून दोन पायऱ्या वर चढून यावं लागे . आमच्या पाचही घरांचा हा दसऱ्याचा संध्याकाळचा कार्यक्रम एकत्र होत असे . मग आमच्या आंगणाचा स्टेज सारखा उपयोग केला जाई . काका चार वाजताच आंगणात आधी चवाळ त्यावर घोंगडी मग मोठी सतरंजी त्यावर लांबट दोन गाद्या अंथरुन पाच तक्के मागे भिंतीला लाऊन पांढरे शुभ्र भट्टीचे बेडशीट आणि तक्क्याला कव्हर घालून बैठक तयार करून ठेवायचे . आंधार पडला की आंगाणात उजेड दिसायला पाहिजे म्हणून दोनशेचा बल्ब लावायचे .  वाड्यात सगळ्यांची एकत्र खरेदी केली जायची . मग विड्याच्या पानाची आख्खी करंडी , किलोभर सुपाऱ्या , आकरा नारळ , भिजवलेली हरभऱ्याची  डाळ , हे सगळं तयार करुन ठेवलेलं असायचं . वस्तीवरच्या लोकांना लागते म्हणून दोनचार तंबाखूच्या पुड्या , एखादे बिडीचे पुडके , काडेपेटी , अडकित्ता , सुपारी हे एका ताटात घालून ठेवलेलं असायचं .

     दसऱ्यादिवशी घेरडीत दुपारी दोन वाजल्यापासूनच आसपासच्या वस्त्यावरुन मानाचे ढोल यायला सुरुवात व्हायची . बिरोबाची पालखी असायची , प्रत्येक ढोलाबरोबर लेझीम किंवा पितळी झांज आणि रुमाल हातात असलेल्या वीस-पंचवीस लोकांच पथक असायचं . अंगात शर्ट विजार किंवा धोतर डोक्याला टोपी किंवा बहुतेक गुलाबी रंगाचे पागोटे , हातात मोठे गमशे असा पेहराव या लोकांचा असे . यात रंगा माळी आणि बुरंगेच्या ढोलाची चढाओढ असे . जवळजवळ पाच वाजेपर्यंत शाळेजवळच्या चौकात पाळीपाळीने प्रत्येक पथकाचा ढोलाच्या तालावर लेझीमवर गोलाकार नाच व्हायचा .

पंधरा दिवस आधी प्रत्येक पथकाची प्रॅक्टीस सुरु झालेली असायची . पहायला तुंबळ गर्दी व्हायची बहुतांश पुरुष असायचे आम्ही छोट्या मुली पहायला जायचो . आणि पाच वाजता  सिमोल्लंघनासाठी एकामागून एक ढोल निघायचे ,  त्यांच्या पाठोपाठ गावकरी निघत असत . मारुतीला जाऊन पुढे ओढ्याच्या वर ते ठिकाण होतं . त्याला गावातून घराघरातून पुरुष मंडळी घटातलं उगवलेलं धान्य टोपीत खोचून आपट्याची फांदी हातात घेऊन सामिल व्हायचे .

घरी आईचा पण उत्साह भारी असायचा . दुपारी जेवायला पुरणा वरणाचा स्वयंपाक करुन सगळ आवरुन पुन्हा चार वाजताच ती स्वतः आवरायला घ्यायची . मोठ्या निळ्या पेटीत सुती कपड्यात गुंडाळून ठेवलेली खास काठपदर असलेली जरीची साडी ती नेसाण्यासाठी काढे . त्यात मधेच कधीतरी केवड्याचं पान ठेवलेलं असे , ते वाळलं तरी पण साडीला कसा वास येतो म्हणत घडी उकलून स्वतः हुंगुन पही मग आम्हीपण 

" मला मला "

करत तीच्या भोवती जाऊन वास घ्यायचो .  नीटनेटकं आवरुन नऊवार साडी छान काठ काढून ती नेसत असे . मग पितळेच्या डबीत कापसात गुंडाळून ठेवलेले दागिने काढून गळ्यात अष्टपैलू मण्याचं मंगळसुत्र , टपोऱ्या मण्याची एकदाणी , श्रीमंत हार , पाटल्या , बिलवर , नाकात नथ आणि लांबट डाळींबी खडा व त्याच्या भोवती सोन्याचे बारीक बुंदके असलेली आंगठी घालून आंबाडा वर गजरा असं तिच सोज्वळ रुप नटून थटून तयार होत असे .  काकांचा पण दसऱ्यादिवशीचा ठरलेला पोशाख असे . पांढरंशुभ्र ब्रासलेटचं धोतर , वर भट्टीचा कडक पांढरा शर्ट व डोक्यावर टोक काढून टोपी . आणि बोटात डाळींबी रंगाचा ठसठशीत गोल खडा आसलेली आंगठी असा त्यांचा रुबाब असे . मग आवरुन सगळे सिमोल्लंघनाला निघत .

वाड्यातील प्रत्येकाचा रुबाब वेगळाच असे . सगळ्यात जेष्ठ पण एकदम तुडतुडीत शरीरयष्टी असलेले पंत काका , शुभ्र धोतर-शर्ट काळी टोपी घालून पाठीमागे हात बांधून दोन बोटात पेटलेली बिडी असे , मग मधूनच त्याचा झुरका घेत वाड्यात नरसोबाच्या दारापासून ते मोठ्या दारापर्यंत वडिलकीच्या नात्याने सगळी तयारी नीट झाली न असे पाहत चार वाजल्यापासून हेलपाटे घालायचे . त्यांच्याकडे सगळेजण आदरयुक्त भीतीने पाहत असत . मोहन अण्णा , रमेश अण्णा , नंदू इस्त्रीचे पँट शर्ट तर राजा भाऊ दादा विजार शर्ट घालून तयार होत असे . सगळ्यात शेवटी पाच नंतर मस्त झोप काढून फक्कड काका त्यांच्या पाठोपाठ सुधीर बाहेर यायचे . सुनील , सचिन , पंपु , बबलू , छाबलू , सख्याहरी ही मुलं पण पळापळी करायची . पण प्रत्येकाच्या कपाळावर कुंकवाचा नाम, डोक्यावर टोपी आणि त्यात देवापुढे उगवलेल्या धान्याचा तुरा आणि हातात आपट्याच पेंडक मात्र असायचं . आम्ही मुली नवीन कपडे घालून तयार व्हायचो , कुणाला लहर आली तर उगाच साडी नेसायची , सगळं आवरुन सावरुन आम्हा मुलांची पळापळी सुरू असे . बायका सगळ्या छान नवीन साड्या गजरे किंवा शेवांतीच्या वेण्या घालून नटून थटून तयार होत असत . तिकडे आपट्याची आणि सौंदडाच्या झाडाची पूजा व्हायची त्यासाठी डोंगरे दादा , पोलीस पाटील , तलाठी , ग्रामसेवक अशा लोकांचां मान असायचा . बऱ्याचदा काका घेरडीत ग्रामसेवक असायचे तेव्हा ते तीन वाजताच तयार होऊन बाहेर जायचे .

सीमोल्लंघन करुन सगळे पुरुष आले की कोणीतरी एखादी काकू वाड्याच्या दरवाजातच भाताची मूद त्यावर गुलाल घालून ओवाळून टाके . गुलाब आण्णांनी रामायणातील सांगितलेल्या गोष्टी ऐकलेल्या असत , त्यामुळे सगळे पुरुष  दरात आलं की प्रत्येकाच्या पायावर पाणी घातले जाई . मग जस काही युद्ध जिंकून आले असे वातावरण वाटायचे . मग घरात आलं का प्रत्येकीने औक्षण करायचं , कडकण्या खायला द्यायच्या . सगळे एकमेकांच्या घरी जाऊन सोनं देऊन किंवा घेऊन आंगाणात टाकलेल्या बैठकीवर येऊन बसत . आपापल्या पायरीवर बायका बसत . आम्ही लहान मुलं वाडाभर फिरायचो . 

  मग तिकडून येताना ढोल ठरलेल्या क्रमाने गावात कुलकर्णी वाडा , डोंगरे वाडा , सोनार वाडा,  दिवाण वाडा अशा बऱ्याच मानाच्या ठिकाणी जायचे . वाड्यात ढोल आले की मधल्या आंगणात त्यांचा खेळ रंगे . रंगा माळ्याच्या पथकामध्ये वाड्यातील अगदी मोहन आण्णापासून छोट्या मुलापर्यंत सगळे सामील व्हायचे . या ढोलाबरोबर डोंगऱ्याचा सुरेश आवर्जून येत असे आणि मग तो नाच जो रंगे त्याला तोड नसे . त्यावेळी काही टेपवर गाणी लावली जात नसत . ढोल , ताशा , लेझिम , झांज याचे आवाज निघत असत .

" आडीपांग डीप्पांग "

अशा ढोलाच्या तालावर गोलाकार उभे राहिलेले लोक डावा पाय जागेवर नाचवत , उजवा पाय एकदा मागे एकदा पुढे करत नाच सुरु होई . मधूनच उलटी सुलटी गिरकी घ्यायची , मधूनच जोर काढायचा असे करताना प्रत्येकाच्या  हातात असलेल्या पितळी झांजेचा , लेझिमचा आवाज कमीकमी करत न्यायचा आणि पुन्हा एकदम आवाज वाढवत तालाची लय वाढवत न्यायचा आणि त्याच कैफेत रंगा माळ्याने पोटावर बांधलेल्या ढोलावर दांड्या बडवत उड्या मारत जो नाच केलेला असे त्याला तोड नसे . कमरेला बांधून हातात गमशे घेऊन तालात त्यांचा रंगलेला सोहळा पाहून क्षणभर गोकुळात कृष्ण सवंगड्याबरोबर दंग झाला की काय असे दृश्य दिसे . खेळून झालं की प्रत्येकाने बैठकीवर यायचे ,  सगळ्या काकांना सोनं द्यायचं , त्यांना सगळ्यांना पानसुपारी द्यायची , मानकऱ्याना नारळ द्यायचा आणि उभे राहून प्रत्येकाच्या गळाभेटी व्हायच्या . अगदी नयनरम्य सोहळा असे तो . गावातील प्रतिष्ठित लोक , सोनार मंडळी , डोंगरे दादा , अरविंद काका , आंता काका , बाळू काका , सगळी शिक्षक मंडळी येत असत . गप्पा गोष्टी होतात तोवर दुसरा ढोल वाजत गाजत वाड्याबाहेर आलेला असे . रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हा उत्सव सुरु असायचा .

       ढोलवाल्याला नारळ बाकी सगळ्यांना पान सुपारी सोनं दिलं जायचं . बरेचशे लोक आईला पण सोन देऊन नमस्कार करुन जायचे . शेवटी सगळे आंगणात बसून गप्पा मारायचे . त्यावेळी वाड्यात देशपांडे सर राहायचे त्यांची मुलं सख्याहरी , उन्नती आणि भारती ही पण सामील व्हायची . तर वाड्याबहेर एक नर्सबई राहत असत त्यांची मुलं पिंट्या , पाप्या आणि पिंकी ही वाड्यातलीच मेंबर असल्यासारखे वाटत असे . फक्कड काकांची बहिण ताई आत्या त्यांच सासर घेरडीच होत , त्यापण वाड्याशेजारी रहायच्या , पतकी वाड्यातील मंडळी असे सगळेजण आशावेळी वाड्यात येऊन बसत . आमच्या वाड्यात बरीच मुलं मुली असल्यामुळे डोंगऱ्याची मुलं-मुली  , अवी-रवी , आमच्या वाड्यात यायची आम्ही त्यांच्याकडे जायचो रात्री बराच उशीरपर्यंत हे चालायचे . 

   लहानपणी आमच्या वाड्यात , गावात सण असे माणसांच्या गर्दीने आणि उत्साहाने बहरलेले असत त्याची ऊर्जा पुढे पंधरा पंधरा दिवस मनाला प्रफुल्लित ठेवत असे हे सगळं वैभव आम्हाला घेरडी गावाने दिले त्यामुळे आई-वडील यांच्याइतकेच त्या गावचे आमच्यावर ऋण आहे हे नक्की !!


सौ. सरिता अनिल कुलकर्णी 

मो . 9421607248

saritakulkarni67@gmail.com

बार्शी