Tuesday, January 19, 2021

कोरोना आणि ती ( खाजगी क्षेत्रात काम करणारी )

 कोरोना आणि ती 


3) खाजगी क्षेत्रात काम करणारी



 संसाराला हातभार लावायचा म्हणून , काळाची गरज म्हणून , जाणीवपूर्वक शिक्षण घेऊन ,  केल्याशिवाय पर्यायच नाही म्हणत आणि आपल्याकडे ही कला आहे तर का नाही करायचं असं म्हणत प्रत्येक स्त्रीचा काहीना काहीना उद्योग असतोच . त्याच स्वरुप घारगुती , फावल्या वेळातलं , व्यावसायीक आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे काहीही असू शकतं . मग यामध्ये घरगुती पापड , लोणची , चटण्या , मसाले पुरविण्यापासून , शिवण शिवणे , ज्वेलरी शाॕप , घरगुती साडी व्यवसाय ते मोठ्या शाॕपपर्यंत काहीही असू शकते . कोरोनाचा परिणाम तर प्रत्येकावर झालाय पण त्याच्या झळा कमीजास्त प्रमाणात सर्वांनाच बसल्या . काहीजण होरपळून निघाले तर काहीजण पाॕज घेऊन रिफ्रेश झाले . याचा थेट संबध हा प्रत्येकाच्या आर्थिक  कुवतीशी होता .

     सुजाताची मुलं मोठी व्हायला लागली मग घरखर्च , सासुसासऱ्यांच औषधपाणी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतांना नाकी नऊ आले . संसाराला हातभार लागावा यादृष्टीने तिने घरगुती शिवण करायला सुरुवात केली . त्यात तिचा बऱ्यापैकी जम बसला होता . कोरोनाच्या कालावधीत सुरुवातीचे चार महिने गिऱ्हाईक फिरकलेच नाही . काम नाही पैसा नाही ! पदरमोड करत दिनक्रम सुरु होता . पण सुरळीत चालू असलेल्या गाडीला खड्डा पडला . पुर्वाची परिस्थिती अजूनच केविलवाणी होती नवरा फिटींगची काम करत होता .दोन हुशार मुली मग त्यांनी शिक्षिणात मागे पडू नये म्हणून तिने सुजातासारखेच शिवणाकाम सुरु केलं होतं स्वतःच्या कौशल्याने तिने चांगला जम बसवला होता . मग जास्तच शिवण येत होतं म्हणून तिने मोक्याच्या ठिकाणी भाड्याने गाळा घेऊन व्यवसाय वाढवला . थोड्याच कालावधीत कोरोनाच संकट आलं या परिस्थितीत मात्र एकीकडे उत्पन्न बंद तर दुसरीकडे घर भागवणं अधिक गाळ्याचं भाडं फुकट भरावं लागलं असे दुहेरी नुकसान झाले . गाळा सोडायचा तर पुन्हा तीच जागा मिळणे कठिण त्यामुळे आता सुरु होईलच या आशेवर अनेक महिन्याचे भाडे ती भरतच राहिली शेवटी शेवटी भाडं थकल्यामुळे बचत गटाकडून कर्ज काढून ते देणं भागवलंय . आता काम सुरु झालंय पण तितकासा जोर नाही मग चालू खर्च भागवणे व गटाचे हप्ते भरणे यातच कमाई संपते म्हणजे कामसुरळीत सुरु झालं तरी परिस्थिती आजून

" ना नफा ना तोटा "

अशीच आहे . पण भविष्यात जम बसवू या विश्वासावार पुन्हा तिने कंबर कसली आहे .





No comments:

Post a Comment