Sunday, June 29, 2025

आत्रेय

27/062025


 गोड गोड पिल्लू आत्रेय 

तुला गोड गोड पापा 

पिल्ल्या तू आज दोन वर्षांचा झालास म्हणून तुला आभाळभरुन शुभेच्छा!

तुला सुखी , समाधानी , आनंदी , निरोगी आणि भरभराटीचे सुंदर दिर्घायुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना .

आत्ता आत्ता जन्मलेला तो लाल गोळा डॉक्टरनी तुझ्या बाबाच्या हातात दिला . ते गोंडस बाळ म्हणून आम्ही पाहतोय असं वाटतं तोवर तू दोन वर्षाचा झालास सुद्धा . तोंडाकडे बघून हसायला बोळकं पसरलं की भरुन पावल्यासारखं झालं रे . हळूहळू रांगत रांगत उभं राहिलास पळायला लागलास आता तर तुझ्यामागे पळून दमायला होतं . 

तुझे बोबडे बोल ऐकायला कान नेहमीच आतुरलेले असतात .

तुझी 

" शलू "

ही हाक ऐकली की काय सुख वाटतं म्हणून सांगू तुला . रोज एक तुझी करामत बघताना , ऐकताना फार मजा येते रे ! बघत बघत तू असाच मोठा होशील थोड्याच दिवसात लिहायला वाचायला शिकशील . 

पण खरं सांगू का तू आत्ता आहेस ना तसा तुला डोळ्यात साठवत असते मी . हे दिवस हातातातून फार पटकन निघून जातात . मला तर माझ्या मुलांचे लहानपण आता तुझ्यात परत दिसू लागलेय . दुधावरची साय म्हणतात ते अगदी खरं आहे . आमची मुलं लहान होती त्याकाळात आम्ही खूप बिझी असू कदाचित त्यामुळे ते उपभोगता आलं नाही ते तुझ्यात पुर्ण करुन घेते असे वाटते .

दुग्धशर्करा योग म्हणजे आमच्या सहजीवनाला चौतीस वर्षे पुर्ण झाली आणि तुझा जन्म झाला म्हणजे 27 जून ही तारीख आपल्या घराण्यात 150 वर्षे राज्य करणार बघ

❤️❤️🥳🥳 😍😍

असो आत्ता आणखी काय लिहू खूप काही वाटतं पण सगळच शब्दात नाही ना रे येत लिहिता .

अजून एकदा तुला खूप खूप आशीर्वाद जगातील सगळी सुखं तुझ्या पायाशी लोळण घेवोत , आयुष्यात यशाच्या शिखरावर आरुढ हो , तुझ्या मनाप्रमाणे तुला जगता येवो . सगळ्यात महत्वाचे म्हणजे तू एक चांगला माणूस हो . 

डीगचंद तुला खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद .

तुझ्यासाठी लाऊ , मलिदा , शीला , साखरबंबा ....... 

असा सगळा खाऊ करुन ठेवते बरं का ?


तुझीच 

शलू आज्जी

No comments:

Post a Comment