महिलादिनानिमीत्त 2014 मध्ये काढलेले महत्वाचे परिपत्रक
आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा !!
----------------------------------------------
Only for working ladies....
माझी नोकरी म्हणजे .......
माझी नोकरी म्हणजे याहूनही खूप काही आहे ,
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखीमैत्रीणींचा सहवास आहे ,
जीवनविषयक अभ्यास आहे ,
तो माझा आत्मविश्वास आहे ,
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
चार भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे ,
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे
तरी मला नोकरीची आस आहे .
----------------------------------------------
नवरात्र....
पहिला रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.
दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.
तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ॲसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.
चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.
पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.
सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.
सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.
आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.
नववा रंग "स्त्री पुरुष समानता" ह्या विषयावर फक्त टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख न लिहिता ते अंगी बाणवण्याचा.
जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचेच सोने होईल !
----------------------------------------------
चला होऊयात पुन्हा सज्ज !!
जागतिक महिला दिनाच्या सर्व समतावादी स्त्री-पुरुषांना मन:पूर्वक शुभेच्छा !! आपण सर्व स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्नशील आहात, यात गेल्या वर्षीपेक्षा दोन पावलं पुढे गेला असाल अशी आशा करते.
हा दिवस स्त्रियांच्या संघर्षाचा इतिहास सांगणारा दिवस आहे. खरंतर संघर्ष हा स्त्रियांच्या रोजच्याच जगण्याचा भाग आहे. १९०८ च्या ८ मार्चला न्यूयॉर्क शहरात पंधरा हजार कामगार स्त्रिया आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या. काय होत्या त्यांच्या मागण्या?? कामाचे तास सुसह्य , म्हणजे आठ करा, पुरेसा पगार द्या आणि मतदानाचा हक्क द्या.....त्यानंतर दरवर्षी संघर्ष आणि आंदोलने करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढतच गेली. मागण्याही अधिक स्पष्ट होत गेल्या. त्याचबरोबर हळूहळू महिला दिनाचे स्वरूपही बदलत जातेय. आज १०८ वर्षानंतरही महिला दिनाचे महत्त्व कमी झालेले नाही. जगभर आणि भारतात काही मोजक्या ठिकाणी या संघर्षाची आठवण केली जाते.
भारतात मात्र बहुतेक ठिकाणी गेल्या दहा वर्षात हा दिवस “साजरा” करण्याची पद्धत जास्त प्रचलित होतेय. हेही चांगलं आहे. बऱ्याच ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होतो, यशाची कहाणी सांगितली-ऐकली जाते, संपूर्णपणे स्त्रियांचाच सहभाग असलेले संगीत, नाटक, चित्रकला, नृत्य, इत्यादी कलांचे आगळेवेगळे कार्यक्रम होतात. असं सगळं स्त्रियांसाठी प्रेरणादायी, भारावलेलं वातावरण महिनाभर राहतं. भास होतो की अरे वा!! छान झालं...किती चांगले दिवस आले बायकांना!! उत्सवाची रंगीत धूळ खाली बसायला लागली कि एकेक अस्वस्थ करणाऱ्या बातम्या दिसायला लागतात. छेडछाड, बलात्कार, अपहरण, या बरोबरच आताच्या दुष्काळात तर स्त्रियांचाही धीर सुटत चालल्याच्या बातम्या येऊ लागतात. मग या बातम्या वर्षभर चालूच राहतात. आम्हा बायकांना अस्वस्थ करत राहतात. वर्षभराच्या या अस्वस्थतेवर आम्ही पुन्हा ८ मार्चला उतारा शोधतो.... उत्सव साजरा करून.... म्हणजे तसे वर्षभरात आम्ही भाऊबीज, राखीपौर्णिमा, नागपंचमी, वटसावित्री, हरितालिका, शिवाय जास्तीतजास्त संख्येने वेगवेगळी हळदीकुंकवं, सगळे उपवास करून उत्सव साजरे केलेलेच असतात तरीही आम्हाला अजून एक उत्सव करायला मिळतो ह्याचं समाधान वाटतं. खरंतर इतके उत्सव करूनही आमची भीती, असुरक्षितता अजिबात गेलेली नसते. आमचे प्रश्न सुटलेले नसतात. पण आम्ही स्वत:ची तशी समजूत करून घेतो आणि दिवस ढकलत राहतो. कारण आम्ही तसंच वागणं समाजाकडून अपेक्षित आहे. मग लोक नावं ठेवत नाहीत. हे नावं ठेवणं फार वाईट असतं बरंका!!!! प्राण गेला तरी हरकत नाही पण लोकांनी नावं ठेवायला नकोत. तो घरच्या पुरुषांचा अपमान ठरतो, असं आम्हाला पिढ्यानपिढ्या सांगितलं गेलंय.
कोणताही प्रश्न स्वतःसमोर येऊन उभा ठाकल्याशिवाय त्याचं असणंच आम्ही मान्य करत नाही. मान्य केलं तरी ते घरातल्या घरात राहावं, जाहीर चर्चा करू नये असं आम्हाला वाटत. स्त्रियांचे प्रश्न सोडवायला “महिला संघटना” आहेतच की! महिला मंडळ ही भजन, मंगळागौरीच्या खेळाच्या स्पर्धा, रांगोळीच्या स्पर्धा, अशा पारंपारिक कलागुणांना वाव देण्यासाठी असतात. तिथे असे प्रश्न वगैरे कशाला आणायचे? आणि स्वत:चं डोकं वगैरे कशाला चालवायचं? असा आपला उलटा कारभार सध्या चालू आहे.
कधी बदलेल हे सगळं? विरंगुळा म्हणून आम्ही उत्सव साजरे करू. नक्कीच!! पण महिला दिनाच्या निमित्ताने तरी महिलांच्या आयुष्याचा समग्र विचार आम्ही करणार का? आजपर्यंतच्या चळवळीला कष्टाने जोपासलेल्यांची आठवण करणार का??
१. आमच्या पुरुषकेंद्री सणावारांना बदलून लिंगनिरपेक्ष, निसर्गवादी, पर्यावरण जपणारे, सामाजिक न्यायाला वाव देणारे आणि आरोग्यदायी कधी बनवणार?
२. स्वतःच्या स्त्री शरीराचा दुस्वास न करता सन्मान करायला कधी सुरुवात करणार?
३. स्त्रिया पुरुषांप्रमाणे विचार करत नाहीत. त्यांचे विचारविश्व वेगळे आहे, जास्त सर्वसमावेशक आहे, सांभाळून घेणारे आहे, व्यापक बुद्धीचे आहे हे जगाला सांगायला कधी सुरु करणार?
४. स्त्रियांचं जग हे नुसतंच प्रश्नांनी भरलेलं नाहीय, तर ते वेगळे मानवतावादी, सहृदय आणि अत्यंत कृतिशील, सर्जनशील आणि स्पर्धाविरहित जग आहे हे पुरुष कधी समजून घेतील?
५. स्त्रियांचे विषय स्त्रियांनीच बोलावेत ( आणि इतर विषयात बोलूच नये ), अशी सर्वांची मानसिकता कधी बदलेल?
अशा टिप्पण्यासहित आपण महिला दिन “साजरा” केला तर तो नुसता उत्सव न राहता जास्त अर्थपूर्ण होईल!! आपलं काय मत आहे??
----------------------------------------------
स्रियांच्या परिस्थिती वर अमृता प्रीतमची खूपच बोलकी कविता
वह कहता था,
वह सुनती थी,
जारी था एक खेल
कहने-सुनने का।
खेल में थी दो पर्चियाँ।
एक में लिखा था ‘कहो’,
एक में लिखा था ‘सुनो’।
अब यह नियति थी
या महज़ संयोग?
उसके हाथ लगती रही
वही पर्ची
जिस पर लिखा था ‘सुनो’।
वह सुनती रही।
उसने सुने आदेश।
उसने सुने उपदेश।
बन्दिशें उसके लिए थीं।
उसके लिए थीं वर्जनाएँ।
वह जानती थी,
'कहना-सुनना'
नहीं हैं केवल क्रियाएं।
राजा ने कहा, 'ज़हर पियो'
वह मीरा हो गई।
ऋषि ने कहा, 'पत्थर बनो'
वह अहिल्या हो गई।
प्रभु ने कहा, 'निकल जाओ'
वह सीता हो गई।
चिता से निकली चीख,
किन्हीं कानों ने नहीं सुनी।
वह सती हो गई।
घुटती रही उसकी फरियाद,
अटके रहे शब्द,
सिले रहे होंठ,
रुन्धा रहा गला।
उसके हाथ कभी नहीं लगी
वह पर्ची,
जिस पर लिखा था, ‘ कहो ’।
-Amrita Pritam
----------------------------------------------
🙏तू स्वतःशीच धोकेबाज...🙏
दगडाच्या नागोबाला पुजणारा
जीवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असे का करतो...||1||
हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हकलुन देतो
कसलं हे तंत्र...||2||
उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मारतो
माणूस असतो स्वार्थी...||3||
कुत्रा म्हणे खंडोबा
चित्रापुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेचताना
कुठे जातो भक्त...||4||
दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जीवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी...||5||
दगडाला देव मानणारा
माणसात मानतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद....||6||
जीवंत माणसालाही माणूस म्हणन्याची
माणसालाच वाटतेय लाज
माणसा रे भोंदु माणसा
तु स्वतःशीच धोकेबाज...||7||...
----------------------------------------------
*अधुनिक स्त्री चे शपथपत्र*
मी 'मी'आहे... 'मी' च राहणार
मी *राधा* नाही होणार
माझ्या प्रेमकहाणीत
दुसऱ्या स्त्रीचा पती नसणार
रुक्मिणीच्या डोळ्यांत
काटा बनून मी नाही सलणार
मी राधा नाही होणार
मी *सीता* नाही होणार
माझ्या पावित्र्याचं
प्रमाणपत्र नाही देणार
अग्निपरीक्षा नाही देणार
तो काय मला त्यागणार
मीच त्याला सोडणार
मी सीता नाही होणार
मी *मीरा*ही नाही होणार
कुठल्याही मूर्तीच्या मोहाने
घर संसार नाही सोडणार
साधुंबरोबर नाही फिरणार
हातात एकतारी घेऊन
जबाबदाऱ्या नाही टाळणार
मी मीरा नाही होणार
मी *यशोधरा* नाही होणार
जो सोडून निघून गेला
सारी कर्तव्ये सोडून
स्वतः देव बनला
कितीही ज्ञान मिळवू दे
पण अशा पतीसाठी
मी पतिव्रता नाही होणार
मी यशोधरा नाही होणार
मी *उर्मिला*ही नाही होणार
पत्नीच्या सहवासाची
ज्याला कदर नाही
तिच्या त्रासाची ज्याला
जरासुद्धा जाणीव नाही
तिला एकाकी करून
जो भावासह राहणार
अशा पुरुषाला मी नाही वरणार
मी उर्मिला नाही होणार
मी *गांधारी* नाही होणार
आपले डोळे मिटून
अंधार स्वीकारून
अर्थहीन त्याग मी नाही करणार
अंध पतीचे डोळे होईन
माझ्या डोळ्यांनी तो बघेल
असे प्रयत्न करणार
मी गांधारी नाही होणार
मी त्याच्यासह जगेन,
ज्याला मनाने वरेन
पण म्हणून त्याचा अन्याय
मी नाही सहन करणार
कर्तव्याला नाही चुकणार
सारी निभावणार पण
बलिदानाच्या नावाखाली
यातना नाही सोसणार
*मी 'मी' आहे आणि 'मी'च राहणार*
----------------------------------------------
*(एक अस्वस्थ करणारी कविता)*
*.....चिठ्ठी.....*
*तो फक्त बोलायचा*
*ती फक्त ऐकायची*
*एक खेळ सुरू होता*
*बोलण्या-ऐकण्याचा*
*खेळात होत्या दोन चिठ्या*
*एकात लिहीले होते 'बोला'*
*एकात रालिहीले होते 'ऐका'*
*आता हे प्राक्तन होते*
*की फक्त योगायोग?*
*तिच्या हाती यायची तीच चिठ्ठी*
*ज्यावर लिहीले होते 'ऐका'*
*ती ऐकत राहीली*
*कोणाचे तरी हुकूम,*
*कोणाचे तरी उपदेश.*
*बंधने तिच्यासाठी होती*
*तिलाच होते सर्व नकार*
*तिला हेही माहीत होते*
*'ऐकणे आणि बोलणे'*
*या नाहीत फक्त क्रिया.*
*राजा म्हणाला, 'विष पी'*
*ती मीरा झाली.*
*ऋषि म्हणाले, 'शिळा हो'*
*ती अहिल्या बनली.*
*प्रभू म्हणाले, 'चालती हो'*
*ती सीता झाली.*
*चितेतून आली किंकाळी*
*अनेक कानांनी ऐकली नाही*
*ती सती बनली.*
*दबले तिचे गा-हाणे*
*अडकले तिचे शब्द,*
*शिवलेले गेले ओठ..*
*दाटून आलेला गळा..*
*तिच्या हाती मात्र कधीच*
*नाही लागली ती चिठ्ठी*
*ज्यावर लिहीले होते 'बोला'.*
*कवयित्री : अमृता प्रितम्*
*अनुवाद : राधा देसाई*
----------------------------------------------
*तु खुद की खोज में निकल*,
*तु किस लिए हताश है*।
*तु चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है*,
*समय को भी तलाश है*।
*जो तुजसे लिपटी बेडियां*।
*समजना इनको वस्त्र तु*,
*ये बेडियां पिघलाके*,
*बना ले इनको शस्त्र तु*,
*तु खुद की खोज में निकल*
*तु किस लिए हताश है*,
*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,
*समय को भी तलाश है*,
*चरित्र जब पवित्र है*,
*तो क्या है दशा तेरी*,
*ये पापियों को हक़ नहीं*,
*की ले परीक्षा तेरी*,
*तु खुद की खोज में निकल*
*तु किस लिए हताश है*।
*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,
*समय को भी तलाश है*।
*जला के भस्म कर उसे*,
*जो क्रूरता का जाल है*,
*तु आरती की लव नहीं*,
*तु क्रोध की मशाल है*,
*तु खुद की खोज में निकल*
*तु किस लिए हताश है*।
*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,
*समय को भी तलाश है*।
*चुनर उड़ाके ध्वज बना*।
*गगन भी कपकपायेगा*।
*अगर तेरी चुनर गिरी*,
*तो एक भूकंप आएगा*,
*तु खुद की खोज में निकल*
*तु किस लिए हताश है*।
*तु चल*, *तेरे वजूद की समय को भी तलाश है*,
*समय को भी तलाश है।*
*-पिंक (movie)*
----------------------------------------------
सौ. सुधा मुर्ति म्हणतात .........
बऱ्याच स्त्रियांना शारिरीक
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,
मी समाजात, वावरत असतांना
माझ्या निरीक्षणात येतो...
पण, खर सांगू मैत्रिणींनो...
पुरूषांना कांय आवडेल,
याचा विचार करून स्वतःला
घडवू नका...
पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य
तोलणं, म्हणजे स्वतः मधील
स्त्रीत्वाचं अधःपतन करवून
घेणं आहे...
सकाळी उठून सडा-संमार्जन
झाल्यावर स्वतःच्या हातानं
काढलेली रेशीमरेषांची रेखीव
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...
स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!
तुम्ही शिक्षिका असाल, तर
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे
लिहिलेल्या अक्षरात असेल.
विषयाचं आकलन झाल्यावर
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे,
ही तुमचीच सुंदरता आहे...
सौंदर्य कपड्यात नाही,
कामात आहे....
सौंदर्य नटण्यात नाही,
विचारांमधे आहे...
सौंदर्य भपक्यात नाही,
साधेपणांत आहे...
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे...!!
आपण करत असलेलं
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच
सादरीकरण असतं...!!
आपल्याला आपल्या कृतीतून
सौंदर्याची निर्मिती करता आली
पाहीजे...
प्रेमानं बोलणं
म्हणजे सुंदरता...!!
आपलं मत योग्य रीतीनं
व्यक्त करता येणं
म्हणजे सुंदरता...!!
नको असलेल्या गोष्टीला
ठाम नकार देण्याची हिंमत
म्हणजे सुंदरता...!!
दुसर्याला समजावून घेणं
म्हणजे सुंदरता...!!
आपल्या वर्तनातून, विचारातून
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.
हाती आलेला प्रत्येक क्षण
रसरशीतपणे जगण्यांत
खरी सुंदरता आहे...!!
आपण करीत असलेल्या
कामात कौशल्य प्राप्त झालं,
की आपोआपच आत्मविश्वास
वाढतो, आत्मसन्मानाची
जाणीव येते...
अशी आत्मविश्वासानं
जगणारी स्त्री आपोआप
सुंदर होते, हा माझा
स्वानुभव आहे...
इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर
निर्णयक्षमतेत होतं,...
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या
ठोशात आहे...
बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या
असामान्य प्रतिभेत होतं...
लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...
वेळ प्रसंगी या सर्वजणींची
आठवणच आपलं जगणं
सुंदर करायला मदत करेल...
आपण जशा जन्माला आलो
आहोत, तशा सुंदरच आहोत,
ही खूणगाठ मनाशी बांधून
टाकली, की सौंदर्याकरीता
दुसर्या कुणाच्या पावतीची
गरज पडत नाही आणि
अवघं विश्व सुंदर भासतं...!!!
----------------------------------------------
*'तिचे शूज'*
तिचा हात हातात घेऊन चालता चालता
तो म्हणाला, *"मला एकदा तुझे शूज घालून चालायचंय•••"*
*"नको रे, सोपं नाही ते•••*
*तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना,*
*आपला प्रवास सुखात चालला आहे ना",*
ती म्हणाली.
त्याचा *हट्ट* म्हणून तिने *तिचे शूज* त्याला दिले•
*तिच्या शूज*मधला
त्याचा प्रवास सुरू झाला•
*हिरवळीवर चालता चालता*
*अचानक खडे टोचू लागले*
*करियरसाठीचा विरोध,*
*नोकरीची वणवण,*
*लग्न ठरल्यावरची द्विधा अवस्था,*
*माहेर सुटल्याचं दुःख,*
*आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला•*
*गरोदरपणातील अस्वस्थता,*
*बाळंतपण*,
*अन् नंतर तो गोंडस स्पर्श•••*
*रात्रीची जागरण,*
*नोकरीतली ओढाताण,*
*तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न,*
*त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड,*
*कधी टोमणे कधी कौतुक,*
*जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवत होतं थोडं थोडं•••*
केवळ तिचे शूज घालूनसुद्धा काही अव्यक्त सलदेखील आता टोचत होते पायाला•••
कधी चटकेदेखील बसले•••
त्याने झटकन शूज काढले• म्हणाला, *"कसं चाललीस एवढं•••!*
ती हसली• म्हणाली, *"तुझ्यासाठी••• माझ्यासाठी••• आपल्यासाठी•••!!!"*
-
---------------------------------------------
*"स्री"*
एका संध्याकाळी सूर्य डूबत असतांना तिला तिच्या नातीने विचारले आज्जी,
स्त्री म्हणजे काय असते गं ?
सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झट्कन बोलली,
स्री सुद्धा मनुष्य असते तिला तिचे आयुष्य असते
तुडवली तर नागीण असते
डिवचली तर वाघीण असते
कडाडली तर वीज असते
तान्ह्या बाळाची नीज असते
आणि बरं का पोरी ,
*तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते* !
----------------------------------------------
Courtsey Adv. Nilima Kanetkar, mother of Urmila Kothare
प्रत्येक स्त्रीने शिकावं असं काही.....आता
खूप झालं, बास झालं
थकले आता म्हणायला शीक
केलं तेव्हढं पुरे झालं
आता थोडं थांबायला शीक
नाती गोती कुटुंब कबिला
बाजूला जरा ठेवायला शीक
इतरांसाठी आयुष्य वेचलं
स्वतःसाठी जगायला शीक
विसरून रोजची कामं खुशाल
उशिरापर्यंत लोळायला शीक
संसाराचं ओझं आपलं
थोडं share करायला शीक
कसं होईल, काय होईल
चिंता सर्व टाकायला शीक
माझ्याविना घर हे चालेल
असा विश्वास ठेवायला शीक
जॉब, घर, मुलं आणि बिलं
यांची कसरत विसरायला शीक
Superwoman व्हायचं सोडून
दमानं जरा जगायला शीक
घड्याळाची endless टिकटिक
दुर्लक्षित तू करायला शीक
उठल्यापासून झोपेपर्यंतच्या
कामाचे हिशोब विसरायला शीक
आपल्या उरावर घेतलेली कामं
आतातरी टाकायला शीक
गेलं उडत काम म्हणून
निवांत पुस्तक वाचायला शीक
पाय पसरून, पेपर धरून
चहाचे घोट घ्यायला शीक
Calorie count विसरून जरा
आयतं food मागवायला शीक
याचं जेवण त्याचा डबा
कपडे याचे नि औषध काढा
घर पसारा भाजी पाला
सगळं सगळं सोडायला शीक
कोणासाठी न थांबता
Steering हाती धरायला शीक
नियम सारे मोडून कधी
सुसाट गाडी पळवायला शीक
सगळ्यांसाठी सगळं केलं
कामचुकारपणा करायला शीक
अर्ध अधिक आयुष्य सरलं
आतातरी बाई जगायला शीक
आतातरी बाई जगायला शीक
----------------------------------------------
कामवाली आहे मी !!
कामवाली आहे मी कडाडती वीज आहे
घरमालकिनीनो एक गा-हान गानार आहे
आमच्यामुळे नोकरी तुमची पाचपन्नास हजाराची
त्यातले दोन-अडीच मला दिलेत
तरच मी टिकनार हाय
एक गा-हान गानार हाय
"सिक" म्हणून "लीव्ह" काढता
घरातुनच "शी-एल" कळवता
मी जेव्हा खरीच तापान फणाफणते
पगारी खाडा करनार हाय
एक गा-हान गानार हाय
गॕस दुध पेट्रोल वाढल
गाडी टॕक्शी परवडेना
आम्हाला सादी कापडचोपड
चटणी भाकरी बी मिळना
महागाईचा कहर हाय
एक गा-हान गानार हाय
तुमचा फंड बिंड पेन्शन
आमच्या नशिबी हलक रेशन
ते आनायला बी पैका नाय
बचत ? छे ! ती उरतच न्हाय
उधार उचल मागनार हाय
एक गा-हान गानार हाय
ज्याला त्याला मानस लावुन
तुमचा संसार निटनेटका
पोरांना महागड शिक्षान
फारीनचा खो-यान पैका
माजबी पोरगं आता शाळत जातेय
त्याला मी इंजिनियर करनार आहे
फाटक्याला ठिगळ मी शिवनार हाय !
म्हणुनच हे गा-हान गानार हाय !
----------------------------------------------
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्या कानी
हे गार्हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनून हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-९९ २३ ८४७ २६९
साविञीमाईस अभिवादन....!
----------------------------------------------
*बालिका दिन विशेष*
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (जानेवारी ३ , इ.स. १८३१ – मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
चरित्र
सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्या नागाला त्यांनी ठेचून मारले.
फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.
‘त्यांनी करेल ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला
. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’…. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली . ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला . त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की “गोर्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील”. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले .
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले . सनातन्यांनी विरोध केला . अंगावर शेण फेकले . काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली . अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत .
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून द िला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगाच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १० , इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
*शिक्षक संदेश समूह*
---------------------------------------------- ---------
*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर *
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर, हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले.
कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या अहिल्या बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.
आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.
अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार? ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी? शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल, त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.
महेश्वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धाम या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.
अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले, मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
जिजाबाई
जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) ([[इ.स. १५९८)]- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशीदौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाई भोसलेराजमाताशिवरायांसमवेत जिजाबाईंचा पुतळापूर्ण नावजिजाबाई शहाजीराजे भोसलेजन्मजानेवारी १२ इ.स. १५९८सिंदखेडराजा,बुलढाणा.मृत्यूजून १७, इ.स. १६७४पाचाड, रायगडचापायथावडीललखुजीराव जाधवआईम्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाईपतीशहाजीराजे भोसलेसंततीछत्रपती शिवाजीराजे भोसले
संभाजी शहाजी भोसले- (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)राजघराणेभोसलेचलनहोन" इतिहासा ! तू वळूनी पाहती पाठीमागे जरा ,झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा "
भोसले व जाधवांचे वैर
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या माहेराशी संबंध तोडले . नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
जिजाबाईंची अपत्ये
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
जीवन
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकरयांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
----------------------------------------------
*८ मार्च*
*जागतिक महिलादिन*
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
*इतिहास*
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
*भारतात* मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.
----------------------------------------------
ती सध्या काय करते......
उड्डाणाच्या वेळी
फ्लाईट कॅप्टन म्हणून
तिच्या नावाची उद्घोषणा झाल्यावर
तिच्या उड्डाण कौशल्यावर मनात किंतु येऊ न देता
निश्चिंत मनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची
................... ती वाट बघतेय.
काळा कोट घालून तिनं
कितीही धडाडीने युक्तिवाद केला
कितीही केसेस जिंकलेल्या असल्या तरी
मनात किंतु न ठेवता तिच्या हातात
विश्वासाने केस देणाऱ्या पक्षकाराची
................... ती वाट बघतेय.
सारी तयारी करून
सहायक सर्जन म्हणून नव्हे तर
मुख्य सर्जन म्हणून
ऑपरेशन थिअटरमध्ये जाताना
डॉक्टर यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडतील
या नातेवाईकांच्या विश्वासाने भरलेल्या नजरेची
................... ती वाट बघतेय.
अंगावर युनिफॉर्म चढून
कायद्याचे समर्थपणे रक्षण करणाऱ्या आणि
धाडसाने गुन्हेगारांशी दोन हात करून
त्यांना जेरबंद करणाऱ्या
युनिफॉर्ममधील तिच्या देहाकडे न बघता
तिच्यातील आत्मविश्वास, धडाडी आणि
खांद्यावरील स्टार याकडे लोकांनी बघण्याची
................... ती वाट बघतेय.
कठीणातील कठीण प्रशिक्षण पूर्ण करून
संरक्षण दलात पूर्ण क्षमतेन काम करून
स्वतःला सिद्ध करत कॅप्टन पदावर पोहोचून
सारा मानसन्मान मिळाल्यावरही
सीमेवर प्रत्यक्ष लढून पराक्रम गाजवण्याची
................... ती वाट बघतेय.
सुट्टी काढून आणि वाट्टेल ते करून
दिवसभर स्टेडीयममध्य वा टीव्ही पुढे बसणाऱ्या
क्रिकेटवेड्या प्रेक्षकांच्या या देशात
तिच्या ‘टीम’ची मॅच पाहण्यासाठी
प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडीयमची
................... ती वाट बघतेय.
दिवसभर अविश्रांत प्रवास करत
प्रामाणिकपणे पै ना पै चा हिशोब ठेवत
खचखचून भरलेल्या बस मध्ये
तिकीट काढण्याची दररोज कसरत करत असताना
गर्दीचा गैर फायदा घेत लगट न करता
सौजन्याने वागणाऱ्या प्रवाश्यांची
................... ती वाट बघतेय.
कारकून असो वा अधिकारी
बुद्धिमत्ता आणि कामातील प्रामाणिकपणामुळे
ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाल्यावर
सहकाऱ्यांनी नाकं न मुरडता वा असूया न दाखवता
मोठ्या मनाने तिचा अभिनंदन करण्याची
................... ती वाट बघतेय.
दमदार अभिनयाच्या जोरावर
फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर
केवळ तिच्या सौंदर्याकडे न बघता
तिच्यातील अभिनयाच्या जोरावर
कसदार भूमिका मिळण्याची
................... ती वाट बघतेय.
आर्किटेक्ट असूनही
फक्त इंटेरिअर डिझाईनचे काम
घेऊन येणाऱ्या क्लायंटपेक्षा
तुम्हीचं माझ्या इमारतीचा प्लॅन काढून द्या
असे म्हणून विश्वासाने काम देणाऱ्या क्लायंटची
................... ती वाट बघतेय.
कोणताही वारसा, पार्श्वभूमी नसतानाही
कोणाच्याही पाठींब्याशिवाय केवळ स्व:कर्तृत्वाने
राजकारणातील सर्वोच्च पदावर पोहचल्यावर
तिच्या चारित्र्यावर शिंतोडे न उडवण्याची
................... ती वाट बघतेय.
क्षेत्र कोणतेही असो
ते क्षेत्र मोठ्या हिमतीनं पादाक्रांत करून
तिने निर्विवाद यश मिळवल्यावर
‘ती’च्या बुद्धिमत्तेवर शंका न घेण्याची
‘ती’च्या विषयी गॉसिप न होण्याची
‘ती’च्या चारित्र्यावर संशय न घेण्याची
तिने कितीही यश मिळवले तरी
तिला ‘अक्कल’ नसते हे न म्हणण्याची
किंवा तू स्त्री आहे म्हणून हे करू शकणार नाही
असे म्हणून तिचे पाय न खेचण्याची
................... ती वाट बघतेय.
ती वाट बघतेय ...................
‘ती’ म्हणून तिच्या क्षमतेविषयी
कळत नकळत मनात ‘किंतु’ न येण्याची
आणि ‘ती’ म्हणून तिच्या कामगिरीवरवर
जाणते अजाणतेपणे ‘अविश्वास’ न दाखवण्याची
ती वाट बघतेय ...................
‘ती’च्या कर्तृत्वावर
‘ती’ म्हणून लेबल न लावता
एक ‘व्यक्ती’ म्हणून,
एक ‘माणूस’ म्हणून
‘ती’च्या कर्तृत्वाला
निर्विवादपणे दाद देण्याची
ती वाट बघतेय.
----------------------------------------------
*आज महिला दिवस आहे. मस्तच!*
*नवरा बायको छापाचे आचरट विनोद वाचणारे आणि ते हसत शेयर करणारे आज नारी शक्तीचे गोडवे गातील...*
*एक्सरे नजरेने निर्लज्जपणे बायकांना स्कॅन करत मान खाली घालायला लावणारे स्त्रीमुक्तीचे गोडवे गातील...*
*गर्दीच्या ठिकाणी कोपर आणि हात चालवणारे स्त्रियांच्या शील रक्षणाचे बिगुल फुंकतील...*
*घराबाहेर जगाची हाजीहाजी करून घरात राज्य करणारे नरकेसरी आज स्त्री समानतेचे व्याख्यान झाड़तील...*
*स्त्री म्हणजे फक्त "काम" आणि घरकाम करणारे शरीर असे मानणारे शील नामक विषयावर उद्बोधक चर्चा घडवतील...*
*वंशाला दिवा हवा म्हणून दिवा लागेपर्यंत "तेल ओतत रहाणारे" आज बेटी धनाची पेटी असे संदेश देतील...*
*गर्भजल चिकित्सा करून स्त्रीभ्रूण हत्येचे पातक करणारे पापी मातृसेवेतून पुण्यसंचायाची महती सांगतील...*
*घरात बायकोला मारहाण करणारे पशु, स्त्री सबलीकरण नामक विषयावर ज्ञानामृत पाजतील...*
*आपल्याच नात्यातील लहान मुलींचा विनयभंग करणारे, परस्त्री मातेसमान अश्या आरोळ्या देतील...*
*ट्रायल रूम मध्ये कॅमेरे लावून MMS बनवणारे आणि ते लाळ घोटत पहाणारे नारीला सलाम करतील...*
*बलात्कारासारखी क्षुल्लक "चूक" केलेले "बालगुन्हेगार" आणि कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुटलेली बलात्कारी जानावरे न्याय"देवतेला" वंदन करतील...*
*बायको कितीही शिकलेली असली, कर्तृत्ववान असली तरी, “घरकाम” हेच तिचे मुख्य काम असे मानणारे आधुनिक पुरुष स्त्री शिक्षणाचे महात्म्य कथन करतील...*
*मेन विल बी मेन म्हणत स्त्रियांना कास्पटासमान मानणारे निगरगट्ट MCP स्त्रियांना सन्मान देण्याबद्दल बौद्धिक घेतील...*
*ह्या सर्वाची खरे तर गरज नाहीये. गरज आहे ती स्त्रीला फक्त सन्मान द्यायची, तिचा आदर मनात बाणवायची! तो मनात बणला की विचारात आणि आचरणात आपोआप येईल. मग वर्षातील प्रत्येक दिवस महिला दिवस असेल! तो वेगळा साजरा करायची गरज नसेल!*
----------------------------------------------
*रखमाबाई राऊत*
हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वत: उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापकहोते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेलं सापत्यविधवेसोबतचं लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचंही धाडसाचं पाऊल होतं.
रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावं लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेलं असतं तर असा - सासरी जाणं हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (१८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मतं स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणं धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरूण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकानं आणि आदरानं पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ऍलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.
त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow' ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्हेनं उत्तीर्ण झाल्या. 'Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons' ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झालं.
रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आलं. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.
त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामंही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्यत्यांनी सहज पेललं होतं. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्या शिवून ठेवत.)
एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामंही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.
स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमालाचालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं, तिला लिहायला वाचायला शिकवणं, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.
जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणार्या होत्या, तसंच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणार्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणार्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.
रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचं मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्यानं देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवानं रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.
----------------------------------------------
*आनंदीबाई गोपाळराव जोशी*
*भारतातील पहिल्या महिला डॉक्टर*
*जन्मदिन - ३१ मार्च, इ.स. १८६५*
आनंदीबाई गोपाळराव जोशी (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २७, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी आजोळी, पुण्यात त्यांचा जन्म झाला.आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुने कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षे खूप थोरले असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीचे जुने यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.
गोपाळराव कल्याण ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत . आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते . लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.
भारतात आगमन
एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनंदन झाले. त्यांना कोल्हापूर मधील अल्बर्ट एडर्वड हॉस्पीटल मधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला.
मृत्यू
वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे २६ फेब्रुवारी, इ.स. १८८७ रोजी त्यांना पुण्यात मृत्यू आला.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुदैर्वानं आनंदीबाईंच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र 'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असं समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्त्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही . समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे, असे आनंदीबाईंच्या आयुष्यावरून उमजते.
स्वतः डॉक्टर होऊनही कुणा देशभगिनीवर उपचार करण्याची संधी तिला मिळालीच नाही. तिकडे अमेरिकेत मात्र कार्पेटर यांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) तिचं लहानसं थडगं बांधलं. त्यावर ‘आनंदी जोशी, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरं कोरून तिचं स्मारक केलं.
----------------------------------------------
छोडो मेहँदी खडक संभालो
खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाये बैठे शकुनि,
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे|
कब तक आस लगाओगी तुम,
बिक़े हुए अखबारों से,
कैसी रक्षा मांग रही हो
दुशासन दरबारों से|
स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं
वे क्या लाज बचायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयंगे|
कल तक केवल अँधा राजा,
अब गूंगा बहरा भी है
होठ सी दिए हैं जनता के,
कानों पर पहरा भी है|
तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे,
किसको क्या समझायेंगे?
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|
----------------------------------------------
अरे कोण कुठली असिफा...
मुस्लिम मुलगी...
झाला तर होउदे ना बलात्कार...!
मंदिरात झाला का...?
इतिहासात आमची मंदिरे नाही का यांनी पाडली...
आठ वर्षाच्या मुलीवर सहा दिवस झाला...!
अरे मग होउदे ना...
आमच्या काश्मिरी पंडित बायकांवर झाला तेंव्हा कुठे होतात...?
अरे या लोकांनी किती अत्याचार केलेत आपल्यावर...!
यांच्या पोरीसाठी कशाला काळे dp लावता...?
अरे कोपरडीच्या भगिणीवेळी कुठे होतात...?
त्यापेक्षा भगवे लावा dp...!
मी चुकीचा नसेन तर खरं सांगा...
हेच चित्र दिसतंय ना बऱ्यापैकी सगळीकडे...?
प्रत्येक प्रखर भावना स्वतःची एक 'रम्य कथा' रचताना दिसते. ही भावना जर एकट्या माणसाचा विशेष गुण असेल तर त्या माणसाने कितीही रम्यकथा उभारल्या तरी त्याला वैयक्तिक पागलपणाच म्हणणार...! पण, काही वेळा एखादी भावना सामुदायिक भावना बनते...! आणि ही सामुदायिक भावना सामूहिक पातळीवर एक रम्य आकार तयार करू लागते...!लढाया,युद्धे यांच्यात अशा रम्यत्व पावलेल्या भावना मोकाट सुटलेल्या दिसतात. ही 'मिथ मेकिंग'ची वृत्ती अनेकदा माणसाच्या दुष्टव्याच्या मुळाशी असते...! नाझी लोकांचा ज्यूंबद्दलचा दुष्टावा या कपोलकल्पित कथांचाच परिणाम होय... अशा कथा असल्या म्हणजे सामुदायिक दुष्टपणा हा मोठा भव्य भासू लागतो व या रम्य कथांनी ही दुष्ट प्रवृत्ती 'सभ्य' बनविली जाते... हे खरं...!
असिफा नावाच्या मुस्लिम मुलीवर बलात्कार झाला... ही गोष्ट या बलात्कारात निराळी नव्हती...
तर त्या बलात्कारांच्या समर्थनार्थ तिरंगे घेऊन रॅली काढली गेली...
थोडक्यात... दबाव टाकला गेला...
याला सामूहिक झुंडशाही म्हणतात...
ही झुंडशाहीच मग न्यायालय बनते... ती जातीचा- धर्माचा आधार घेते...
एखादे मत कितीही अयोग्य असले तरी बहुसंख्यांकांचा त्याला पाठींबा मिळताच ते मत मान्य होऊ लागते...
मग द्वेषापोटी अनेक रम्य कथा जन्माला घातल्या जातात... त्या कथांचे चर्वण सतत केले जाते...
"अमुक अमुक वर्षानंतर मुस्लिम लोकांची संख्या हिंदुपेक्षा वाढून भारत इस्लाम राष्ट्र होणार...!"
अशा आशयाचा मॅसेज वाचला असेलच तुम्ही...!
याच त्या रम्य कथा...!
सतत एका समाजाला शत्रू म्हणून उभं केलं जातं...
आपला समाज धोक्यात आहे असं सतत बिंबवलं जात...
आपण गांडू राहिलो म्हणून आपण मागे राहिलो अस उगाच बिंबवले जातं... ते आक्रमक आहेत... ते बघा कसे धर्मनिष्ठ आहेत... आपलं काय...?
अस सांगूनच दोन्हीकडून ह्या झुंडी तयार केल्या जातात...
हेच जर्मनीत झालं...!
आणि हे घडतं धर्माच्या- जातींच्या अशा झुंडशाहीतून...
या द्वेषभक्तीलाच देशभक्तीचा मुलामा दिला जातो... नव्हे तीच देशभक्ती बनते...
झुंड बहुसंख्यकांची मते बनवते...
आणि आता सोशल मीडियामुळे हे फार सोपं बनलंय..
ह्या झुंडी प्रश्नांची उत्तरं देत नाहीत...
ती एक गेम खेळतात... 'व्हॉट अबाउटरी'चा गेम...
म्हणजे आपण म्हणालो की 'मोदी सरकारने 4 वर्षात काय केलं...? तर ते म्हणतील 'काँग्रेसने साठ वर्षात काय केलं...?'
आपण म्हणलो 'असिफाला न्यायासाठी निषेध म्हणून काळे dp लावा' तर ते म्हणतील 'काश्मिरी पंडितावरील अत्याचाराच्यावेळी कुठे होतात...? भगवे dp लावा'
या गेमला म्हणतात व्हॉट अबाउटरी...
यातले युक्तिवाद वरवर योग्य वाटतात... पण ते टोकाच्या निष्कर्षांवर आधारलेले खोटे असतात...
त्यातून खरे प्रश्न सोडवले जात नाहीत... ना खऱ्या प्रश्नांना त्यातून वाचा फुटते...
असिफावर बलात्कार झाला आणि तिला न्याय मिळाला पाहिजे...
याला धर्माचा मुलामा दिला गेला... बलात्काऱ्यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली... तेही तिरंगे घेऊन...!
अरे आपण माणूस म्हणून मेलोय रे...! कधीच...!
हे झालं एक ताजे प्रकरण...
गेले काही वर्षे आपण याच 'मिथ मेकिंग'ने तयार झालेल्या रम्य कथेमध्ये अडकलो आहोत...
याच 'व्हॉट अबाउटरीने' आपले पोटापाण्याचे प्रश्न बाजूला ठेवले गेलेत...
चर्चेत काय येतंय, तर हिंदू-मुसलमान,बीफ,भगवा-निळा,लव्ह जिहाद आणि बरच काही...
नोकऱ्यांचं काय झालं...?
नोटांबंदीच काय झालं...?
काळ्या पैशाचं काय झालं...?
अच्छे दिनाच काय झालं...?
विकासाचं काय झालं...?
यावर कधी बोलणार आपण...?
इथे लहान मुलीवर बलात्कार झाला... तो सहा दिवस सलग तेही एका मंदिरात म्हणजे धार्मिक स्थळामध्ये झाला... त्यात एक पोलिसही सहभागी झाला...
हे आपल्यासाठी महत्वाचे ठरलं नाही...
त्या चिमुरडीवरचा बलात्कार आपल्याला हलवून सोडला नाही...
आपण बघितली ती मुस्लिम आहे...
कारण आपण वरवर सभ्य वाटणाऱ्या एका रम्य कथेत आहोत सध्या...
आपण वास्तवात नाही...
आपण कधीच मेलो आहोत... कारण आपले मेंदू आपल्या हातात नाहीत... ते या झुंडीच्या हातात गेलेत...
मेंदू गहाण टाकलेत आपण...
गहाण...
विनायक होगाडे
----------------------------------------------
आसिफा ने लिखा निर्भया को खत,
तुम कहां हो? दीदी मैं तुम्हें ढूंढ रही हूं क्योंकि मुझे समझ नहीं आ रहा कि मैं किससे अपना दर्द कहूं। हम सगी बहनें तो नहीं लेकिन हमारे बीच दर्द का रिश्ता है। इसलिए मैं तुम्हीं से कहती हूं। दीदी 16 दिसंबर 2012 को तुम्हें 6 लोगों ने कुचला। तुम चली गईं तो खूब शोर हुआ। लगा कि अब लड़कियों के लिए ये देश ज्यादा सेफ होगा। लेकिन दीदी ऐसा नहीं हुआ। देखो तुम्हारे जाने के 6 साल बाद मेरे साथ क्या हुआ?
दीदी मैं सिर्फ आठ साल की हूं। मेरा नाम आशिफा है। मेरा घर जम्मू में कठुआ जिले के रसाना गांव में है। दीदी मैं अपने घोड़े को ढूंढते-ढूंढते इंसान के रूप में जानवर के चुंगल में फंस गई। इन लोगों ने मुझे एक कमरे में बंद कर दिया दीदी। फिर लोग आते गए और मुझ पर जुल्म करते रहे। वो आठ लोग थे। दीदी मुझे बहुत दर्द हुआ। खाली पेट मुझे ये लोग कोई नशीली दवा देते थे। दीदी जो लोग आते थे उनमें पुलिस वाले भी थे। इनमें से एक पुलिस वाला तो वो था जिसे मुझे ढूंढने के लिए लगाया गया था। मुझ नन्हीं सी जान को कुचलने के लिए इन लोगों ने यूपी के मेरठ से भी किसी को बुला लिया। दीदी मुझमें जान तो बची नहीं थी फिर ये लोग मुझे मारने के लिए जंगल ले गए। वहां मुझे मारने ही जा रहे थे कि एक पुलिस वाले ने कहा रुको। मुझे लगा कि शायद उसे दया आ गई। लेकिन दीदी उसने जो कहा उसे सुनकर मुझे जीने की इच्छा भी नहीं रही। उसने कहा - रुको, इसे मारने से पहले मुझे एक बार और रेप करने दो। सबने मुझे फिर नोंचा।
और मैं तो इतनी छोटी हूं कि मुझे जाति, बिरादरी और धर्म में फर्क तक नहीं पता। मैं बेहद डरी हुई हूं दीदी। कुछ वकील और नेता मेरे गुनहगारों को बचाने के लिए शोर कर रहे हैं। डरी इसलिए हूं क्योंकि अगर ये लोग बच गए तो फिर किसी मासूम को मार देंगे। हां कुछ लोग हैं जो मेरे लिए इंसाफ मांग रहे हैं लेकिन तुम्हें तो मालूम है दीदी ये सब कुछ दिन की बात है। ये सब अपने-अपने घर चले जाएंगे। सब भूल जाएंगे। कुछ नहीं बदलेगा। तुम्हारे जाने के बाद कुछ बदला क्या। कभी बंगाल, तो कभी उन्नाव, तो कभी असम, हर दिन रेप होते हैं। बच्चियों के साथ, बूढ़ी औरतों के साथ।
*Justice for AASIFA*
----------------------------------------------
'ति'ला कळतचं नाही ती 'बंधनात' आहे
दागिन्यांच्या 'बेड्या' घालून
'ती' 'आनंदी' कशी राहू शकते ?
'त्या'च्यासाठी देह सजवून
'ती' 'मुक्त' कशी वावरु शकते?
'ति'ला कळतचं नाही ती 'अंधकारात' आहे
व्रत-वैकल्यांचे तप करून
'ती' सहनशील कशी होऊ शकते ?
रीती-रिवाजांच्या चक्रात अडकून
'ती' तृप्त कशी होऊ शकते ?
'ति'ला कळतचं नाही ती 'गुलामित' आहे
रांधा, वाढा, उष्टी काढा
ही तिची दिनचर्या कशी ठरू शकते ?
पतीदेवाची (?) सेवा करून
'ती' स्वतःसाठी कसं जगू शकते ?
*- मर्जिना मणेर*
*हरिती स्त्रीदास्यांतक संघर्ष सभा*
----------------------------------------------
*हिरकणी गड उतार झाली होती*
पहाटे डोईवर दोन दुधाच्या घागरी घेऊन ती गड चढली होती .
सर्व दूध विकून आता परती च्या वाटेला लागली होती .
तिला घाई होती.
तिच तान्ह लेकरू उपाशी असेल . पावलं पटापट अंतर कापत होती .
पण आज नशीब सोबत नव्हत तिच्या.
गडाचे दरवाजे बंद झाले होते.
विनवण्या करून करून ती मेटाकुटीला आली.. काय कराव उमजेना . गडाची दार कुणी उघडेना .
आपलं इथं काही चालणार नाही याचा अंदाज तिला आला .
आता थांबणे नाही आणि विनवणे तर नाहीच नाही.
ती मार्ग शोधू लागली . अंधार वाढत चालला होता. आजूबाजूची झाड अक्राळ विक्राळ राक्षसाप्रमाणे वाटत होती.
तेव्हड्यात एक अरुंद पायवाट दिसली तिला . तिथून रास्ता खाली जात असावा . पण फारच कठीण अश्या कड्या ची उतरती वाट होती ती. मागचा पुढचा विचार न करता अंधारात झोकून दिल तिनं स्वतः ला . काटेरी झुडपांचे ओरखडे बसत होते अंगावर . वाट निसरडी होती. एक जरी पाऊल वाकडं पडलं तरी कपाळमोक्ष निश्चित होता.
पण डोळ्यासमोर एकाच लक्ष आपल उपाशी तान्ह बाळ . ....
अखेर जिवावर उदार होऊन *हिरकणी गड उतार झाली.*
पहाटे पाच ला सुरु झालेला तिचा दिवस .
सर्वांचा चहा नास्ता डबे आणि बरेच काही करून तिने पळत पळत ८. १० ची फास्ट लोकल मिळवलीच .
दिवसभर फाईलींचे गट्ठे उपसले ... दिवस मावळतीला लागला पण काम काही संपेना . शेवटची फाईल तपासून ती भराभर पावल टाकत स्टेशन कडे निघाली . वाटेत उद्याची भाजी आणि थोडा बाजार हाट हे सुद्धा लगेहात उरकले .
धक्कबुक्क्यांचा , अचकट विचकट नजरेचा स्पर्शाचा राक्षस टाळत ती लोंढ्या बरोबर पुढे पुढे जात राहिली . नेहिमीची डोंबिवली फास्ट मिळवली ....आणि
....हूश्शह्ह ... *हिरकणी गड उतार झालीच* .... पिल्लं वाट पहात होती घरी...
मीटिंग संपली , सर्वांशी हस्तांदोलन झाले, तिनं लॅपटॉप बंद केला, projector बंद केला . कॉन्फेरंस रूम मधले लाईट बंद झाले. सर्वांचा मोर्चा डाईनिंग हॉल कडे वळला . फ़ेसाळत्या ग्लासांची किणकिण झाली ...
मल्टि कुझीन जेवणाची टेबलं भरली ... बऱ्याच जणांनी तिच कौतूक केल . ..बरीच जणं तिचं कर्तृत्त्व पाहून जळफळलें सुद्धा. हिला खाली कस पाडायचं ह्याचे प्लांनिंग पण झाले.. ...
पण तिच लक्ष घडाळ्यात होतं .
९ चं विमान होतं तिचं .
ती कशीबशी सर्वाना चुकवून cab मध्ये बसली . ट्राफिक , गर्दी , गाड्या सर्वाना चुकवत ती कशी बशी airport ला पोचली . मुलं घरी काय करत असतील , अभ्यास झाला असेल का, प्रोजेक्ट संपवल असेल का ? अनेक विचार .
विमान आकाशात उंच उडालं . दोन तासात मुंबईला पोचल......
*हिरकणी गड उतार झाली....*
तिची लेकरं एव्हाना वाट पाहून झोपली ...
काळ बदलला , जागा बदलल्या , आव्हानं बदलली ...
पण कधी जीवाचा आटापिटा करून किंवा उदार होऊन *हिरकणी गड उतार होतच आहे.....*
*आजच्या अनेक हिरकणींना मानाचा मुजरा...
----------------------------------------------
#ME TOO के साथ ना जोडे ...
कवयित्रि महादेवी वर्मा
मै हैरान हूं यह सोचकर
किसी महिला ने उंगली नहीं उठाई,
तुलसीदास पर जिसने कहा:-
"ढोल,गवार, शूद्र, पशु, नारी
सब है तड़न के अधिकारी।
मै हैरान हूं यह सोचकर
किसी ओरत ने नहीं
जलाई मनुस्मृति
जिसने पहनाई
उन्हें गुलामी की बेड़ियां।
मै हैरान हूं,यह सोचकर
किसी औरत ने धिक्कारा नहीं
उस "राम" को
जिसने गर्भवती पत्नी को
अग्नि परीक्षा के बाद भी
निकाल दिया घर से बाहर
धक्के मारकर
मै हैरान हूं यह सोचकर
किसी औरत ने
नहीं किया नंगा, उस कृष्ण को
चुराता था जो नहाती हुई
बालाओं के वस्त्र
योगेश्वर कहलाकर भी
जो मनाता था रंगरलियां
सरे आम!
किसी औरत ने लानत नहीं भेजी
उन सबको,जिन्होंने
और त को समझकर "वस्तु"
लगा दिया, जुए के दाव पर
होता रहा जहां"नपुंसक"
योद्धाओं के बीच
समूची और त जात का चीर_हरन!
में हैरान हूं ये सोचकर
किसी महिला ने नहीं किया
संयोगिता_अंबालिका के
अपहरण का विरोध
आज तक!
और मै हैरान ही ये सोचकर,
क्यों इतना होने के बाद भी,
उन्हें अपना श्रद्धेय मानकर
पूजती है मेरी मां,बहन, बेटियां
उन्हें देवता भगवान मानकर
आखिर क्यों?
मै हैरान हूं
उनकी चुप्पी देखकर
इसे उनकी सहनशीलता कहूं या
अंध श्रद्धा या फिर
मानसिक गुलामी की पराकाष्ठा !
महादेवी वर्मा।
----------------------------------------------
कृष्ण तू पाठीशी नको, सोबतीला हवा!
कृष्णा तू आता पाठीशी नको राहुस कारण मग आम्ही तुला गृहीत धरतो. काही संकट आलं की , तू आहेस पाठीशी हा विश्वास असतो पण मग आम्ही आमच्यात असलेल्या क्षमतांचा वापर करायचा, हेच विसरून जातो. अनेक वेळा आम्हीच तुला पाठीशी घालतो , तूझ्या चुका लपवण्यासाठी.
तू वडीलधारा होऊन आम्हाला पंखाखाली घेतोस, पण किती युग हे असच चालू द्यायचं? तुझ वडीलधारेपण मान्य केलं जातं, तुझ कर्तेपण पाहिलं जात, नकळत तुझ्यातला अहंभाव वाढवण्यात आमचाही हातभार लागतो....आम्ही पण विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, चुकांमधून काही शिकू शकतो हा आत्मविश्वास आता वाढू दे.
तेव्हा कृष्णा तू आता पाठीशी नको, सोबतीला रहा! मित्र हो! मैत्र जप! सखा हो, सख्य जप! मनातल सांगण्यासाठी एक हक्काचा सवंगडी हो! तूझ्या हातात निःसंकोचपणे हात देताना तो स्पर्श निर्मळ असू दे.
कृष्णा तू सोबतच रहा. टाकू पावले सोबतीने, मित्रत्वाने.आम्हालाही चार गोष्टी तुला हक्काने सांगू देत, ऐकवू देत! आमच्याही विचारांना, कल्पनांना फुटू देत धुमारे.
वाहू देत आम्हाला नदी सारखं कधी खळाळत तर कधी संथ गतीनं आमच्याच नादांत! येऊ देत आमच्याही आयुष्यात वादळ, भरकटू दे आमचं ही सुकाणू....होऊ आम्ही थोड्या हतबल, जाऊ थोड्या गोंधळून पण निश्चितच काढू त्यातून मार्ग! घेऊ मोकळा श्वास, मिळवू नवी उभारी! तू विश्वास ठेव आमच्यावर आणि रहा सोबतीला , पाठीशी नको!
तुझ अस्तित्व मान्य आहे आम्हाला, तुझ दातृत्व, कर्तृत्व ....अभिमान वाटतो तुझा. पण आता आम्हालाही आमाच्यातल "मी" पण सिध्द करायची संधी दे. आम्हालाही फुलू दे , फुलवू दे, हसू दे , हसवू दे, मिळालेला हा स्त्री जन्म मनासारखं जगू दे. दुष्टांचा संहार करण्याची शक्ती दे आणि अनाथ असणाऱ्या अनेकांवर माया करण्याची बुध्दी दे. कर कौतुक आमचं मनापासून आणि चुका दाखव. अरे चुका दाखवच, पण चुका दुरुस्त करण्याची संधी दे. आम्ही पण माणूस आहोत, वागव तूझ्या बरोबरीने. आणि म्हणूनच म्हणते कृष्णा, तू पाठीशी नको....सोबतीने रहा, सोबतीने रहा!!🍃
शुभांगी मांडे खारकर फेसबुक
*।। आपडी-थापडी..।।*
परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या होत्या. मुलांना त्या बहुधा गोष्टी सांगत असाव्यात. गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकच गिल्ला सुरू केला... आजी, आजी ऽ आपडी- थापडी खेळू ना गं.
रस्त्याने चाललेला मी 'आपडी थापडी' ऐकताच थबकलो. ही आपडी-थापडी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बालमुठीतून घरंगळून गेली होती. मधल्या काळात मोठे होणे काय असते, ते पुरेपूर अनुभवले, त्याचे चटके सोसले. हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवले, पण ही ‘आपडी थापडी’ मेंदूच्या कोठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली. मधल्या काळात माझे लग्न झाले. मला मुले झाली, पण त्यांच्याशी मला कोठे खेळता आली ही ‘आपडी-थापडी’सारखी अवीट जोडीची 'खेळगाणी'? मी मला काळाच्या बदलात केवळ ढकलत राहिलो, पुढे पुढे; पण बालपणीचे किती मोठे वैभव, त्या फुलपंखी दिवसांतील गमतीजमती, ते खेळ, ती गाणी, सारे तेथल्या तेथे सोडून आलो.
त्या 'आपडी-थापडीच्या' खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. रस्त्याने जात होतो, पण माझा पाय जागेवरून हलेना. मला त्यांची ‘आपडी-थापडी’ पाहायची होती. बिनपैशांचा तो आनंद माझ्या
आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे. मी लहान होऊन तो पकडू पाहत होतो.
कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी-नातवंडांच्या खेळाकडे बघू लागलो. मुलांनी कोंडाळे केले होते. आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हातांचे पंजे एकमेकांवर पालथे ठेवले होते अन् सुरू झाली...
'आपडी-थापडी.... गुळाची पापडी
धम्मक लाडू.... तेल पाडू
तेलंगीच्या.... तीन पुऱ्या
चाकवताचं.... एकच पान
धर गं बेबी.... हाच कान'
आजी मुलांच्या पालथ्या हातांवर क्रमाक्रमाने उलटापालटा हात थोपटत गाणे म्हणत होती. 'धर गं बेबी हाच कान' म्हणताच त्या छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले, आजीचेही पकडले. कान धरून, ते सारे कोंडाळे झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले.
'च्याऊ म्याऊ
पितळीचं पाणी पिऊ
भुर्रकन उडून जाऊ'
असे म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले. मी तल्लीन झालो होतो. माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे याचे भानही उरले नव्हते. मला माझे निसटून गेलेले बालपण त्या खेळगाण्यांतून पुन्हा मिळाले होते. माझ्यातील लहान मूल त्या ‘आपडी-थापडी’ने जागवले होते. माझ्या डोळ्यांपुढून माझे खेड्यात गेलेले बालपण सरकू लागले. संध्याकाळी शाळेतून आले, पाटी-दप्तर घरात भिरकावले, की आम्ही खेळायला मोकळे! गरिबी सगळ्यांच्याच घरी होती. आजूबाजूचे सगळे मित्रही त्याच परिस्थितीतील. आमचे खेळही खर्चिक नव्हते. सगळे तोंडभांडवल किंवा अंगमेहनत असा व्यायाम घडवणारे.
ओट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची अन् म्हणायची.
‘आया भोया
पाटीभर लाह्या
वाघाचं पिल्लू
छुट गया.....'
मग सुरू व्हायची त्याच्या लपलेल्या सवंगड्यांची लपाछपी. वाघाच्या पिल्लावर राज्य आलेले. तो मग इकडे तिकडे कानाकोपऱ्यात शोधीत फिरे. पहिल्यांदा जो सापडला त्याच्यावर राज्य. पुन्हा त्याचे डोळे झाकून 'आया भोया' सुरू! एका खेळाने कंटाळले, की दुसरा खेळ. असेच अन् या सगळ्या खेळांभोवती काही काही गाणी असतच. त्याचे तेव्हा काही वाटत नसे - आज आठवून मोठी गंमत वाटते. आराधरीचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत. जाळी धरली, की कोणावर राज्य येणार यासाठी मग...
'इरिंग मिरिंग
लवंगा तिरिंग
लवंगा तिरीचा
डुगडुग बाजा
गाई गोपी उतरला राजा...
उतरला राजा'
आणि गंमत अशी, की जो राजा बनून उतरायचा त्याच्यावरच राज्य आलेले असायचे. आराधरीत खूप पळापळ व्हायची. हुलकावण्या देत पळणाऱ्यांपैकी कोणा एकाला पकडलं, की त्याच्यावर राज्य!
मुलींची गाणी आणखी वेगळीच असत- 'इत्ता इत्ता पाणी गोल गोल राणी' म्हणत मुलींचे खेळ रंगत. एरवी भित्र्या, काकूबाई असणाऱ्या मुली खेळताना किती धीट होत!
'कोरा कागद निळी शाई
आम्ही कोणाला भीत नाही
दगड का माती?'
हा दगड-मातीचाही खेळ छानच होता. दगड म्हटले, की मातीवर उभे राहायचे अन माती म्हटले, की दगडावर! धमाल यायची.
आकाशात विमानाचा घरघर आवाज ऐकू येऊ लागला, की सगळी बच्चेकंपनी विमान पाहायला अंगणात जाई. आभाळात विमानाचा शोध सुरू होई. ते विमान साखळी सोडून लहान मुलांना विमानात बसवून घेते असाही काहीतरी समज होता... आम्ही 'ईमाईन ईमाईन साखळी सोड...' असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानकडे पाहून म्हणत असू. जेव्हा एसटीतही क्वचितच बसायला मिळे त्या काळातील ती कल्पना!
संध्याकाळी आभाळातून बगळ्यांची माळ हमखास उडताना दिसे, मग आम्ही 'बगळ्या बगळ्या कवडी दे, धारणगावची नवरी दे' असे नखांवर नखे घासून गाणे म्हणत असू. नखांवर तेव्हा तांदळाच्या कणीसारखे काहीतरी डाग असत. अनेक मुलांच्या नखांवर ते असत. त्यालाच आम्ही कवड्या म्हणत असू. बगळे आपले उडत जायचे, पण आम्हाला मात्र कवड्या मिळालेल्या असत, नखांवर...
पुढे आमच्या मित्राला... प्रकाशला धारणगावची नवरी मिळाली. त्याला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. लहानपणी कवड्या अन् मोठेपणी धारणगावचीच नवरीही... आम्ही त्याची खूप मजा घेतली.
आकाशात ढग भरून आले, की पावसाचे वातावरण तयार होई. मातीचा मस्त सुवास, गार वारा सुटलेला, अशा वेळी अंगणात गोल गोल फिरत...
'येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
येगं येगं सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून'
हे पावसाचे गाणे तर त्या पिढ्यांतील प्रत्येकानेच त्या त्या वेळी म्हटले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू होई. पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभाळाला वाकुल्या दाखवत वाळूची घरे बनवत असू. घर हळूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई, तर कधी कधी खोपा बने. तो आनंद शब्दांपलीकडचा.
आम्ही नवरात्रात गावाबाहेरच्या वडजाई देवीला जात असू. रस्त्यात आजूबाजूला खळगी होती. त्या खळग्यांमध्ये इंगळ्यांची बिळं असत. आम्ही त्या बिळांतून विषारी इंगळ्या काढून त्यांची झुंज लावण्याचा थरारक जीवघेणा खेळही त्या नकळत्या वयात खेळत असू. इंगळी काढण्याचा आमचा एक मंत्र होता. आम्ही करवडाचा फोक हातात घेऊन तो इंगळीच्या बिळावर घासत असू. काडीने घासताना बिळातून माती-खडे आत पडत. तोंडाने मंत्र सुरू...
'इंगळी का पिंगळी सलाम करती
सलाम करती
आणाजी पाटलाला बोलीती
बोलीती
सुया मारुनी मंत्र फुकिती
मंत्र फुकिती.....'
मंत्र म्हणून पुरा होण्याच्या आतच चवताळलेली इंगळी काडीला डंख देत बाहेर येई. कमरेचा करगोटा तोडून, फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बिळात सोडण्यात येई. पहिली इंगळी दुसरीला बाहेर काढून बरोबर घेऊन येई. तो थरारक खेळ आठवून अंगावर काटा येतो.
थोड्याच दिवसांत दिवाळीची नवलाई येई. हातात सुरसुऱ्या घेऊन...
'दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या
लक्षुमणाच्या'
असे म्हणत सुरसुऱ्या ओवाळीत दिवाळीचे गाणे म्हटले जाई. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी सहामाही परीक्षा असे. तिचे ओझे वाटायचे. दिवाळीच्या आनंदापूर्वी केवढा मोठा अडथळा!
शाळा नेहमी खेळण्याच्या आड येते असे वाटायचे. मग शाळा सुटली की कोण आनंद... 'शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भज्यानं मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं' आम्ही लहानपणी असे एक रडगाणेही म्हणत असू. घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीभावांकडे असे. तशा वेळी मोठी बहीण आईची जागा घेत असे. ती तिच्या भावंडांना खेळवताना...
'इथं इथं नाच रे मोरा
बाळ देई चारा
चारा खा... पाणी पी भुर्रकन उडून जा...'
अशी गाणी म्हटली जात. लहानग्याचे कौतुक करताना, त्याला तीट लावताना...
'अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीटट् लावू'
असे छान गाणे म्हटले जाई. लहान मुलांचे संगोपन करताना अशी अनेक गाणी गात त्यांचे बालपण फुलवले जाई. खेळगाण्यांनी तेव्हाचे आमचे बालपण व्यापून टाकलेले होते. ती गाणी एका पिढीकडून दुसरीकडे आपोआप हस्तांतरित होत होती. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते.
मोठी ताई लहानग्या भावाला खेळवताना उताणी झोपून त्याला पायावर बसवी व पायाला झोका देत, खालीवर करत त्याच्याशी ‘हाट घोडा हाट’ खेळू लागे...
'हाट घोडा हाट
बाजाराची वाट
बाजाराला कोण जातं
दादा वहिनी
घरी कोण राहतं
आम्ही दोघी बहिणी'
असे खेळता खेळता बहिणी भावांचे मेतकुट जमे. ब-याचदा लहान मुले मुलींमध्येच खेळत. बहिणीच्या मैत्रिणींमध्ये मुलगा खेळू लागला, की 'पोरींमध्ये पोरगा भाजून खातो कोंबडा...' असे त्याला चिडवले जाई. कधी एकमेकांना पाठीवर घेत 'वऱ्हाटा का पाटा गोल गोल वाटा' असा वऱ्हाट्या-पाट्याचा खेळ सुरू होई. मुलींचे अंपल-चंपल, सागरबिट्ट्या, ठिकरा-ठिकरी असे खेळही रंगत. ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी हीच आमच्या पिढीची बडबडगीते होती. ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले. पण आम्ही तो वारसा पुढील पिढीकडे पोचवायला कमी पडलो. ती साखळी आमच्या पिढीशी काळाच्या बदलांमध्ये येऊनच तुटली त्याचे दुःख मोठे आहे.
मला त्या आपडी-थापडीवाल्या आजींचा हेवा वाटला. कौतुकही वाटले. त्यांनी त्यांचं हरवलेलं बालपण मुलांत मूल होऊन आपडी-थापडी खेळताना पुन्हा जिवंत केले होते. मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली.
'बगळ्या बगळ्या नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूल चुकलं, छडी खाली लपलं, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम'
मला छमछम छडी आठवली, चिमुकल्या हातांवरचे ते छडीचे वळ घमघमणाऱ्या विद्येकडे घेऊन गेले. प्रतिकूलतेतून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते! बदल होणार आहेतच. मात्र आमच्या पिढीने जे अनुभवले, ते नव्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो. आम्ही पुढच्या पिढीला भौतिक सुखे मनमुराद देऊ केली. आम्हाला बालपणी जे मिळाले नाही, ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितके देण्याचा प्रयत्न केला - पण देण्याजोगे बरेच काही न देताच. त्यातील ती खेळगाणी राहूनच गेली द्यायची.
----------------------------------------------
मित्रहो...
*पुनीत मातकर* या कवीची ही कविता वाचून मी निःशब्द झालो...अस्सल स्त्रीवादाचा हुंकार या पोराने दिला आहे...आपणही ही कविता वाचावी आणि त्याचे कौतुक करावे.
कवितेच्या तळाशी अशा निखळ मायेचं, हळवं प्रामाणिक मन असेल तर कविता किती प्रभावी पणे बोलते याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे.
*अपूर्ण कविता*
शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा
आवाज विरत नाही तोच
सुसाट वेगानं मी पोहोचायचो
घराच्या दारात...
पाठीवरलं दप्तर फेकून
घोड्यागत उधळत
पोहोचायचो मैदानात,
मस्तवाल बैलासारखा
धूळमातीत बेभान होऊन
मिरवत राहायचो स्वतःचं
पुरूष असणं..
तीही यायची शाळेतून..
चार रांजण पाणी...
घरअंगणाची झाडलोट...
देव्हा-यातला दिवा लावून
ती थापायची गोल भाक-या
अगदी मायसारखीच
अन् बसून राहायची उंब-यावर..
रानातून माय येईस्तोवर
ती चित्र काढायची..
रांगोळ्या रेखायची..
भुलाबाईची गाणी अन्
पुस्तकातल्या कविता
गोड गळ्यानं गायची....
धुणंभांडी..सडा सारवण
उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची
मी पाय ताणून निजायचो,
ती पुस्तक घेऊन बसायची....
दिव्याच्या वातीत उशीरापर्यंत...
एकाच वर्गात असून मास्तर
माझा कान पिळायचे
कधीकधी हातानं....
कधी शब्दानं ...
"बहिणीसारखा होशील तर
आयुष्य घडवशील..."म्हणायचे,
मग करायचो कागाळ्या
मायजवळ...
मॕट्रिकचा गड
मी चढलो धापा टाकत..
तीनं कमावले मनाजोगते गुण,
बाप म्हणला
दोघांचा खर्च नाही जमायचा
त्याला शिकु दे पुढं...
टचकन डोळ्यात आलेलं पाणी
तसच मागं परतवत
ती गुमान बाजुला झाली
पाठच्या भावाच्या रस्त्यातून...
ती शेण गोव-या थापत राहिली..
मायसंग रानात रापत राहिली
काटे तणकट वेचत राहिली...
बाईपण आत मुरवत राहिली
तिच्या वाट्याचा घास घेऊन
मीही चालत राहिलो
पुस्तकांची वाट...
कळत गेलं
तसं सलत राहिलं
तिनं डोळ्यातून परतवलेलं
पाणी...
तिला उजवून बाप
मोकळा झाला..
मायला हायसं वाटलं..
मी मात्र गुदमरतो अजुनही
अव्यक्तशा
ओझ्याखाली...
दिवाळी..रसाळी..राखीला
ती येत राहते
भरल्या मनानं..
पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..
बोटं मोडून काढते दृष्ट..
टचकन आणते डोळ्यात पाणी..
पाठच्या भावासाठी
जाताना पुन्हा सोडून जाते..
मनभरून आशीर्वाद...
ती गेल्यावर मी हूरहूरत राहतो
ज्योतीसारखा
जिच्या उजेडात ती
उशीरापर्यंत वाचायची पुस्तक,
पाठ करायची कविता...
*जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण....*
*पुनीत मातकर*
गडचिरोली
----------------------------------------------
मला आवडते तुमची...... colourful generation.
नात: नानी, तू किती generations बघितल्या ?
मी : मी न.......५. बघ हं...माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात...तू.
नात: यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?"
मी : तुझी.
नात : वॉव....पण का ?
मी : कारण ती सर्वात जास्त colourful आहे.
नात: म्हणजे कशी ?
मी : म्हणजे असं.....की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता...'घर...घर काम, घरच्यांची सेवा आणि घरी येणार्यांचे आदरातिथ्य.
मग माझी आई...या घरकामाच्या रंगात अजुन एक रंग वाढला...तो म्हणजे शिक्षणाचा....आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज...यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.
मग माझी पिढी...माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज या मुळे आमचं क्षितिज बरचं रुंदावलं...नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या... generation colourful होऊ लागली.
मग
तुझ्या आईची generation.. ......technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला....'स्पर्धे' चा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला....नवनवीन पाश्र्चिमात्य रंग डोकावू लागले...जागतिकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला.
आणि त्यानंतर...
नात : मी.....पण माझीच generation तुला का आवडते ?
मी : कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळुन 'आत्मविश्र्वासा' चा प्रसन्न रंग लेवून जन्मलेली तुझी पिढी.... technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं.
जग तुमच्या बोटांवर नाचतं...ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं
समानता खर्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे....
माझ्या आजीच्या 'घर आणि संस्कार' पासुन ते तुमच्या 'अवकाश' या प्रचंड कक्षेतील सगळे 'सुखद' रंग जपण्याचा आणि 'दु:खद' रंगांशी झुंजण्याचा तुमचा 'Cool' रंग मला फार आवडतो......तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात...
*BE BOLD FOR CHANGE*....
*व्हा धाडसी...बदलासाठी*.........
----------------------------------------------
मी..स्त्री
नाकारते मी अहिल्या होण्याचे... एक भोगून गेला, एक शापून गेला तरी मी उद्धारासाठी का वाट पहायची अजून एकाच्या पायाची!
नको पदस्पर्श कोणाचा मला परत माणसात येण्यासाठी.. नाही होऊ देणार मी शिळा माझ्या आत्म्याची!
नाकारते मी सीता पण होण्याचं... मोह नाही टाळता आला कांचन मृगाचा..पण त्याची शिक्षा मी दुसऱ्याच्या घरातून सुरक्षित येऊन पण हक्काच्या घरी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन नाही घेणार..
त्यापेक्षा नाकारेल मी अस्तित्वच त्यांचे, ज्यांनी उंचावल्यात भुवया माझ्या चारित्र्या वर!!
नाही व्हायचं मला ऊर्मिला पण, जिच्या
लक्ष्मण ने मागे ही न पाहता आयुष्य दुसऱ्याच्या नावे केलंय.. आणि थांबलीय ती राजवड्यातील अंधाऱ्या कोपऱ्यानशी आपलं दुःख वाटत..
मी नाही संपणार अंधारात, घेईन मी शोध प्रकाशाचा आणि जाणवून घेईन माझेच अस्तित्व जे अपूर्ण आहे माझ्याच शिवाय!
नाकारते मी द्रौपदी ला पण... नाही मला गरज माझ्या लज्जारक्षणे साठी कोणत्या श्री हरीचा धावा करण्याची...
मी बनवतेय स्वतःला इतकी मजबूत की नाही कोणता दुशा:शन माझ्या सावलीला उभा राहणार!
नाकारतेय मी वृन्दे ला... नाही मान्य मला ज्याने अस्मितेवर घाव घातलाय.. वर्षानुवर्षे त्याच्याशी लग्न करून आयुष्य जाळून घेण्याचं..
मी होतेय इतकी सशक्त की नाही गरज कोणत्याही विष्णू ची माझ्या अस्तित्वासाठी त्याचं कुंपण माझ्या भोवताली बांधायला!!
मला आवडेल गार्गी, मैत्रेयी होऊन सभामंडप गाजवायला... मंदोदरी होऊन चुकीच्या गोष्टी ना परखड पणे विरोध करायला..
शकुंतले सारखी धीट होऊन माझे अधिकार मागायला..अंबालिका होऊन स्वतः वर झालेल्या अन्यायाची परतफेड करायला, मनू होऊन रणांगणात तळपायला,तारा होऊन स्वतःच्या राज्याचं रक्षण करायला ,आणि जिजाऊ बनून एका शिवाजी ला घडवायला..
हो.. नाकारतेय मी सगळे देवत्व जे मला बहाल केलेय. ज्याची किंमत मला माझे स्वातंत्र गमावून, विचारशक्ती हरवून, निर्णय क्षमता संपवुन मिळालंय.. नाही व्हायचं मला औट घटकेची देवी आणि अनंत काळाची मुकी बाहुली!
त्यापेक्षा होईन मी स्त्री माझ्या अस्तित्वाची.माहीत आहेत मला माझी
शक्तीस्थानं त्याच वेळी दुबळ्या पैलूंची पण जाणीव आहे.नाही मिरवत प्रौढी माझ्या शक्ती स्थानांची, त्याचवेळी नाही करत अवास्तव भांडवल माझ्या दुबळेपणाची!!
मी आहे, माझ्या दुबळेपणासह..माझ्या
सशक्तपणासह..जगतेय आयुष्य परिपूर्ण! मीच आहे एकमेवाद्वितीय!!
माझ्यातला प्रेमाचा झरा भिजवतोय रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला.. निघाली आहे मी प्रवासाला.. सगळे अडथळे पार करतेय कारण लांब उडीची हिम्मत आहे. मी स्वीकारलेय स्वतःला एक परिपूर्ण स्त्री म्हणून!
नकोय मला तो देव्हारा.. आणि सोन्याची, चांदीची एक मजबूत चौकटी!.कारण सोन्या चांदी ची असली तरी ती चौकटच..त्या चौकटी बाहेर राहायचंय मला भक्कम पाय रोवून, माझ्या पाऊलखुणा उमटवून ठेवायच्या त्या माझ्या अवकाशात..
----------------------------------------------
LET HER TAKE HER TIME
*When she takes her time* to drink a barely warm cup of tea, let her. She's given her time to cook your meal and serve it to you before she sat to drink her tea.
*When she takes time* to select a dish from the menu, let her. Every day, for every meal she has prepared she has given her time to think about what to make, how much, and for whom.
*When she takes time* to dress up to go out with you, let her. She has given her time to make sure that your ironed clothes are in their place and knows better than you, where your socks are. She has dressed up her child thoughtfully, to look like the most smartly dressed up child around.
*When she takes time* to watch TV mindlessly, let her. She is only half concentrating and has a clock ticking in her head. As soon as it's nearing dinner time, you'll see her disappear to get things ready.
*When she takes time* to serve you breakfast, let her. She has kept aside the burnt toast for herself and is taking the time to serve her family the nicest ones she could manage.
*When she takes time* after her tea to just sit by the window and stare into nothingness, let her. It's her life, she's given you countless hours of her life..
Let her take a few minutes for herself.
_She's rushing through her life, giving chunks of her time whenever needed, wherever needed._
_Don't rush her more than she rushes herself._
_Don't push her harder than she pushes herself._
Tribute to all Women
----------------------------------------------
निःशब्द...
*पान्हा...*
हातातला पेन जरा बाजूला ठेवला. सारखे बसून बसून पाठीला कळ लागली होती. दुपारचे तीन वाजले होते. बाहेर प्रचंड उन्ह होते. फॅन पाच वर असूनही गरम होत होते. दोनला ओपीडी बंद करण्याची वेळ असते पण पेशंट होते त्यामुळे जरा लेटच झाले होते.
जेवण बाकी होते म्हणून आईचा दोनदा फोनही येऊन गेला. येतो पेशंट आहे, असे सांगून मी आपला पेशंट बघण्यात रमलो. बाहेर वेटींगमध्ये अजून तीन पेशंट होते. तेवढे बघावेच लागणार होते. इतक्यात बाळाचा कर्कश कानठळ्या बसावा इतक्या काकुळतीने रडण्याचा आवाज माझ्या कानी पडला.
"साहेब याला बघा ना आधी, रहातच नाही तो..."
केबीनच दार उघडून तीशीतली ती बाई विनवणी करत होती. लाल कलरची मळकट साडी घातलेली. केस भुरकट काळ्या रंगाचे. रंगाने सावळी. कपाळावर आणि हातावर गोंधलेले. खाद्यांवर महीनाभरच बाळ. दार उघडताच घामाचा उग्र वास तिच्यासोबतच आत आला.
बाहेर बसलेले इतर पेशंट तीच्याकडे कुत्सित नजरेनं बघत होते. सोशल डिस्टन्सिंग मुळे आधीच तिच्या पासून चार हात दूर बसलेले तिच्या अशा वागण्यामुळे ते अधिकच तिरस्काराने तिला बघू लागले.
आम्ही आधी आलोय डॉक्टर, असा भाव त्यांच्या डोळ्यात जाणवला पण तरीही या बाळाची अवस्था बघून मी बाळाला आत घेतले.
तरीही बाळ सारखे रडतच होते...
"टेबलवर ठेवा त्याला", मी त्या बाईला सांगितले.
"काय झालं ? कधी पासून रडतोय हा ?"
"त्यो रडतोच हाये सारखा."
"डिलीव्हरी कधी झाली ?"
"महिना झाला".
व्यवस्थित चेकअप केले पण बाळाला बाकी काही लक्षणे जाणवली नाही. पोटात दुःखत असेल म्हणून पॅलपेट करुन बघितले पण तसलं ही काही जाणवेना. "भूक लागली असेल, त्याला पाजून बघा जरावेळ", तिच्याकडे बघत मी म्हणालो.
"कुठून पाजू ? दुधच नाही उतरत", ती बाळाला कडेवर घेत बोलली.
"महिना झाला ना ! मग, दुध तर यायलाच हवं"
"इथं माह्या पोटाला काही भेटना साहेब, फकस्त तांदूळ खाऊन कुठून दुध उतरनार हाये".
तिला समोर बसवले आणि "नीट सांग काय काय होतय बाळाला ? कधी पासून नीट दुध मिळत नाहीये त्याला ? मग दुध नाही तर वरचे दुध, पावडर काही देता का तुम्ही त्याला ?
सगळं सांगा, खरं खरं सांगा.
काय सांगू साहेब !? नशीब करंट आहे माझं. दोन पोरीच्या पाठीवर हे पोरग झालं. पण ह्यो आला आणि तोंडाची भाकरच तुटली बघा आमची.
"फुटक्या पायाच वांग कुठलं !!", त्याचा राग राग करत ती सांगत होती.
एक आई आपल्या पोटच्या मुलाला असे बोलताना पहिल्यांदा बघितले होते मी. त्यामागे निश्चितच तिची निराशा, हताशपणा होता. हे कारण होते तरी एक आई असे बोलते हे मनाला पटत नव्हते. ती पुढे बोलत होती -
"रोजंदारी करतो साहेब आम्ही. घरात दोन पोरी. त्यांचा बाप, सासू - सासरे आणि आता हे पोरं. असे सहा जण एका खोलीत हायेत.
महिना झाला आता हाताला काम नाही. घरात व्हत नव्हतं समद कव्हाच संपलं. हंडाभर पाण्याला वनवन करत फिराव लागतं. छतावर पञा तापतो. घरात टेबल फॅन हाय पण त्योबी एकच. कुणा - कुणाला वारं लागलं त्याचं !?
दर वरीस उन्हाळा लागला की ह्याचा आज्जा - आज्जी मंदिराच्या वसरीत झोपायला जात्यात. पण त्यांना बी बाहेर पडता येइना झालय. आता ते बी नाय. वर पञा तापतो, बाहेर उन्ह मोकार चटके देत्यात. खोलीत जाम उकडतं. मधी घामान जीव कसनूसा होतो. बाहेर जाता येत नाय. पंखा हाय पण याचं म्हातारं चिटकून बसतय त्याला.
"दिस उजाडला की हंडा घेऊन पाणी भरायला कोसभर दुर जाव लागत तेबी लपून छपून. त्यात घरात पोटभर खायला नाय. घाम फुटतो पण पान्हा फुटना. त्याला मी काय करु साहेब. मग तुम्हीच सांगा कुठून ह्याची भूक भागू ?"
तिचे बोलणे ऐकून मी क्षणभर स्तब्धच झालो.
ओली बाळंतीन ती. पोटभर जेवण नाही म्हणून पान्हा फुटत नाही. बाळ भूकेने रडरड रडतयं. पण खायला काही नाही.
कुठले औषध देऊ मी त्या बाळाला ?
माझा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, माझी बौद्धिकता, सायकोडायनामाईकची थेरी, मानसशास्त्र, सर्वच फोल ठरले होते आज. पेन हातात घेतला खरा पण हात थरतरत होता. कुठले औषध लिहावे समजत नव्हते.
घरात आईने स्वयंपाक बनवला होता. ओपीडी झाली कि मस्त जेवणार होतो. माझ्यासारखेच आपणही पुढचा महिनाभराचा किंबहुना जास्त किराणा भरुन ठेवला असेल. खायला कमी पडणार नाही महिना दोन महिने याची सर्व तरतूद करणे फक्त ह्याच एका गोष्टीसाठी आपण बाजारपेठत गर्दी करतोय.
आपल्याला छान कपडे आहेत, खायचीही चंगळ आहे. करमणूक म्हणून टीव्ही, फोन, नेट अशी सर्व साधने उपलब्ध आहेत. फॅन, कूलर, एसी, उन्हाची झळ आपल्यापर्यंत पोहचू देत नाहीये. कमी-जास्त फरकाने आपले सर्वांचेच आयुष्य असे सुरु आहे सध्या. पण या बाहेरही एक दुसरे जग आहे, जिथे सकाळी भेटलेल अन्न पुरवून पुरवून खाल्ले जाते कारण परत मिळेल का नाही याची शाश्वती नाही. हाताला काम नाही म्हणून पुरेसा पैसाही उपलब्ध नाही. बाहेर पडायला भीती वाटते. घरात भूक बसू देत नाही. खूप सारे प्रश्न आहेत पण उत्तर मला सापडत नाहीये.
हातात पेन तसाच होता. बाळ अजूनही रडतच होत. ती माझ्याकडे आशेने बघत होती.
पण ........
औषध नक्की कुणाला देऊ ?
बाळाला !? ज्याला भूक लागलीय म्हणून तो रडतोय, की आईला !? तिला दुध येत नाही म्हणून बाळ उपाशी आहे, की परिस्थितीला !?
आणि .....
मनातली नीस्तब्धता क्षणात बाजूला सारून आईला फोन करून ताबडतोब जेवणाचा डबा कोणाच्या तरी हाती पाठवुन द्यायला सांगितले व तिला थोडावेळ बाहेर बसावयास सांगून दुसऱ्या पेशंटला तपासण्यास सुरवात केली. दरम्यान मेडिकल मधून एक दुधाच्या पावडरचा डबा मागविला. इतर पेशंट तपासून होईपर्यंत घरून डबाही आला.
तोपर्यंत वाटीत दूध करून बाळाला पाजायला दिल्याने बाळही शांत झाले होते आणि मग, डब्यातील जेवण तिला दिले. दूध पिल्याने रडायचे थांबलेले बाळ आणि पोटात गेलेल्या अन्नामुळे मुलाचा रागराग करणाऱ्या आईच्या मनात एक वेगळीच करुणा दिसू लागली होती मला.
आणि असे असूनही तिने फी म्हणून देऊ केलेल्या पैशांपेक्षाही तिच्या डोळ्यातली कृतज्ञता अधिक काही सांगून आणि शिकवून गेली होती मला.
कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या दाहक वास्तवतेमध्येही सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून स्वतःला झोकुन देऊन कार्य करणाऱ्या सर्वांनाच मनापासून अभिवादन
----------------------------------------------
आसान नहीं होता
प्रतिभाशाली स्त्री से प्रेम करना,
क्योंकि
उसे पसंद नहीं होती जी हुजूरी,
झुकती नहीं वो कभी
जबतक न हो
रिश्तों में प्रेम की भावना।
तुम्हारी हर हाँ में हाँ
और
ना में ना कहना वो नहीं जानती,
क्योंकि
उसने सीखा ही नहीं झूठ की डोर में रिश्तों को बाँधना,
वो नहीं जानती
स्वांग की चाशनी में डुबोकर अपनी बात मनवाना,
वो तो जानती है
बेबाक़ी से सच बोल जाना।
फ़िज़ूल की बहस में पड़ना
उसकी आदतों में शुमार नहीं,
लेकिन
वो जानती है,
तर्क के साथ अपनी बात रखना।
वो
क्षण-क्षण गहने- कपड़ों की माँग नहीं किया करती,
वो तो सँवारती है
स्वयं को अपने आत्मविश्वास से,
निखारती है
अपना व्यक्तित्व मासूमियत भरी मुस्कान से।
तुम्हारी गलतियों पर
तुम्हें टोकती है,
तो तकलीफ़ में तुम्हें
सँभालती भी है।
उसे
घर सँभालना बख़ूबी आता है,
तो
अपने सपनों को पूरा करना भी।
अगर नहीं आता
तो
किसी की अनर्गल बातों को मान लेना।
पौरुष के आगे
वो नतमस्तक नहीं होती,
झुकती है
तो तुम्हारे निःस्वार्थ प्रेम के आगे।
और
इस प्रेम की ख़ातिर
वह अपना सर्वस्व न्यौछावर कर देती है।
हौसला हो निभाने का
तभी ऐसी स्त्री से प्रेम करना,
क्योंकि
टूट जाती है वो धोखे से,
छलावे से,
पुरुष अहंकार से,
फिर
जुड़ नहीं पाती किसी प्रेम की ख़ातिर...
- *डोमिनेर*
( पोलैंड की प्रसिद्ध कवयित्री )
----------------------------------------------
*सौ. सुधा मुर्ति* म्हणतात .........*
बऱ्याच स्त्रियांना शारिरीक 💕💕
सौंदर्याचा न्युनगंड असलेला,💕💞
मी समाजात, वावरत असतांना💕💕
माझ्या निरीक्षणात येतो...💕💕
💕💕
पण, खर सांगू मैत्रिणींनो...💕💕
पुरूषांना कांय आवडेल, 💕💕
याचा विचार करून स्वतःला 💕💕
घडवू नका...💕💕
💕💕
*पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य*💕💕
*तोलणं, म्हणजे स्वतः मधील* 💕
*स्त्रीत्वाचं अधःपतन करवून*💕💕💕
*घेणं आहे...*💕💕
💕💕
सकाळी उठून सडा-संमार्जन 💕💕
झाल्यावर स्वतःच्या हातानं 💕💕
काढलेली रेशीमरेषांची रेखीव 💕💕
रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला 💕💕
तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल...💕💕
💕💕
स्वच्छ- सुंदर आवरलेलं, स्वच्छ 💕💕
स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या 💕💕
गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल...!💕💕
💕💕
तुम्ही शिक्षिका असाल, तर 💕💕
तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे 💕💕
लिहिलेल्या अक्षरात असेल. 💕💕
विषयाचं आकलन झाल्यावर 💕💕
दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, 💕💕
ही तुमचीच सुंदरता आहे...💕💕
💕💕
सौंदर्य कपड्यात नाही, 💕💕
कामात आहे....💕💕
सौंदर्य नटण्यात नाही, 💕💕
विचारांमधे आहे... 💕💕
सौंदर्य भपक्यात नाही, 💕💕
साधेपणांत आहे... 💕💕
💕💕
सौंदर्य बाहेर कशात नाही, 💕💕
तर मनांत आहे...!!💕💕
💕💕
आपण करत असलेलं 💕💕
प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच💕💕
सादरीकरण असतं...!!💕💕
💕💕
आपल्याला आपल्या कृतीतून💕💕
सौंदर्याची निर्मिती करता आली💕💕
पाहीजे...💕💕
💕💕
प्रेमानं बोलणं 💟💕
म्हणजे सुंदरता...!!💕💕
💕💕
आपलं मत योग्य रीतीनं 💕💕
व्यक्त करता येणं 💕💕
म्हणजे सुंदरता...!!💕💕
💕💕
नको असलेल्या गोष्टीला 💕💕
ठाम नकार देण्याची हिंमत💕💕
म्हणजे सुंदरता...!!💕💕
💕💕
दुसर्याला समजावून घेणं 💕💕
म्हणजे सुंदरता...!! 💕💕
💕💕
आपल्या वर्तनातून, विचारातून 💕💕
आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.💕💕
💕💕
हाती आलेला प्रत्येक क्षण 💕💕
रसरशीतपणे जगण्यांत 💕💕
खरी सुंदरता आहे...!!💕💕
💕💕
आपण करीत असलेल्या 💕💕
कामात कौशल्य प्राप्त झालं, 💕💕
की आपोआपच आत्मविश्वास💕💕
वाढतो, आत्मसन्मानाची 💕💕
जाणीव येते...💕💕
💕💕
*अशी आत्मविश्वासानं*💕💕
*जगणारी स्त्री आपोआप*💕💕
*सुंदर होते, हा माझा* 💕💕
*स्वानुभव आहे...*💕💕
💕💕
इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर💕💕
निर्णयक्षमतेत होतं,...💕💕
💕💕
मेरी कोमचं सौंदर्य तिच्या 💕💕
ठोशात आहे...💕💕
💕💕
बहिणाबाईंचं सौदर्य त्यांच्या💕💕
असामान्य प्रतिभेत होतं...💕💕
💕💕
लतादीदींचं सौंदर्य त्यांच्या 💕💕
अप्रतिम, दैवी आवाजात आहे...💕💕
💕💕
वेळ प्रसंगी या सर्वजणींची 💕💕
आठवणच आपलं जगणं 💕💕
सुंदर करायला मदत करेल...💕💕
💕💕
*आपण जशा जन्माला आलो* 💕💕
*आहोत, तशा सुंदरच आहोत,* 💕💕
*ही खूणगाठ मनाशी बांधून* 💕💕
*टाकली, की सौंदर्याकरीता* 💕💕
*दुसर्या कुणाच्या पावतीची* 💕💕
*गरज पडत नाही आणि*💕💕
*अवघं विश्व सुंदर भासतं...!!!* 💕💕
💕💕
----------------------------------------------